Saturday, January 6, 2018

औरंगाबाद- भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात १८ जखमी - कोठे नेऊन ठेवलं आहे भटक्या कुत्र्यांनी महाराष्ट्राला ?


कोठे नेऊन ठेवलं आहे भटक्या कुत्र्यांनी महाराष्ट्राला

कोठे गेले प्राणी मित्र
कोठे गेल्या प्राणी मैत्रिणी
कोठे गेलय प्राणी संघटना

औरंगाबाद- भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात १८ जखमी
औरंगाबाद शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने उच्छाद मांडलाय. रहेमानिया कॉलनीत या कुत्र्याने एक-दोन नाही तर एकूण १८ जणांवर हल्ला केला. या घटनेनंतर मुलांना घाटी रूग्णालयात दाखल करत त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. दरम्यान घाटी रूग्णालयाच्या प्रशासानाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमोपचारानंतर रूग्णांना घरी सोडण्यात आलंय.
By
 -
January 6, 2018

शुक्रवारी सकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने औरंगाबादच्या रेहमानिया कॉलनीमध्ये अनेकांचा चावा घेतला. शिवाय जवळच खेळत असलेल्या लहान मुलांना देखील कुत्र्याने चावा घेतला. या घटनेनंतर मुलांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुलांवर प्रथमोपचार करून, अॅन्टी रेबीज ट्रीटमेंट सुरु करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिलीये.
संपूर्ण राज्यभरातच भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. कुत्रा चावल्यामुळे रेबीज होऊन अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आहेत नुकतचं पालघरच्या एका १० वर्षांच्या मुलाचा कुत्रा चावल्याने मृत्यू झाला.
कुत्रा चावण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत जातायत. याविषयी सामाजिक कार्यकर्ते सत्यजित शहा यांच्या सांगण्यानुसार,
·         ठाण्यात दररोज अंदाजे ७० जणांना भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची नोंद होते
·         राज्यामधील ही आकडेवारी पाहता अंदाजे ७७७७ जणांना भटके कुत्रे दररोज चावा घेतात
·         तर संपूर्ण भारतात दररोज अंदाजे ,४१,९६० इतक्या लोकांना कुत्रा चावण्याच्या घटना समोर येतात
माय मेडिकल मंत्राशी बोलताना सत्यजित शहा म्हणाले की, “भटक्य़ा कुत्र्यांनी चावा घेण्याच्या प्रकरणांमध्ये फार होतेय. यावर सरकारने योग्य ती पाऊल उचलून ही गंभीर परिस्थिती रोखली पाहिजे. यासाठी प्रत्येक भागातील कुत्र्यांनी नसबंदी केली पाहिजे. कल्याण, डोंबिवली सारख्या शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात आलेली नाही.
शहा पुढे म्हणाले की, “कुत्र्याने चावा घेतल्यानंतर रेबीज होतो. या आजारामुळे मृत्यूही होऊ शकतो. कुत्रा चावण्याच्या घटनेत जवळपास ८० टक्के ते वयोगटातील बालकांचा समावेश असतो. कुत्रा चावल्यानंतर तातडीने उपचार मिळणं गरजेचं आहे. मात्र हे उपचार प्रत्येक रूग्णायलात उपलब्ध नसल्याने रूग्णाचा मृत्यू होतो. शिवाय हे उपचार मोफत मिळणंही गरजेचं आहे.
दरम्यान राज्य़ाचे आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणं आवश्यक असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन धोरण निश्चित केलं जाईल असं सांगितलं होतं.

http://www.mymedicalmantra.com/marathi/dog-attack-on-18-people-in-aurangabad/


No comments:

Post a Comment