Thursday, January 25, 2018

" R .K LAXMAN " यांची पुण्यतिथी

" R .K LAXMAN " यांची पुण्यतिथी
व्यंगचित्राचे बादशहा व COMMON MAN चे जनक R .K LAXMAN यांचे २६ जानेवारी, २०१५ रोजी दुखद निधन झाले .
व्यंगचित्रांच्या माध्यमांद्वारे, त्यांनी अनेक प्रश्नांवर ज्याप्रकारे आवाज उठवला होता त्याला तोड नव्हती.
बहुसंख्य वाचक " महाराष्ट्र टाईम्स " व " THE TIMES OF INDIA " हि वृत्तपत्रे वाचताना सर्वप्रथम R .K LAXMAN यांचे व्यंगचित्र वाचत असत .
त्यांनी त्यांच्या व्यंगचित्रात कधीही , कोणाचे पोट ट मोठ्ठे , कोणाचे नाक मोठ्ठे , कोणाचे कान मोठ्ठे , वगैरे दाखवून , ओढून , ताणून विनोद निर्मिती केली नव्हती .
त्यांच्या व्यंगचित्रांची काही मला कळलेली वैशिष्ट्ये , छोटासा आशय पण फार मोठ्ठा संदेश , त्यांच्या प्रत्येक छायाचित्रात त्यांचा COMMON MAN असणे , त्यांच्या व्यंगचित्रातील व्यक्तिरेखांच्या चेहऱ्यावरील हावभाव बऱ्याच गोष्टी सांगून जायच्या , अतिशय ताज्या अश्या राजकीय , सामाजिक घडामोडींवर ते लगेचच व्यंगचित्रे रेखाटायचे . त्यांनी कधीही व्यंगचित्र निर्माण करताना उच्च दर्जा नाही सोडला .
माझ्या मते त्यांची व्यंगचित्रे हि उपहासात्मक ( म्हणजेच आजच्या शुद्ध मराठीत satiristic / full of SATIRE अशी होती )
त्यांची व्यंगचित्रे आजच्या सामाजिक , राजकीय गोष्टींना देखील चपखल पणे लागू होतात.
त्यांच्याच काही व्यंगचित्रांनी त्यांची आठवण जागविण्याचा  एक प्रयत्न. 





No comments:

Post a Comment