" चिंचवड मध्ये भटक्या कुत्र्यांचा तब्बल १७ जणांवर हल्ला "
अरे बापरे म्हणजे " पुणे " या जगापासून वेगळ्या असलेल्या शहरात देखील भटके कुत्रे मानव प्राण्यांना चावतात ? मागे एका वृत्तवाहिनीच्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासावरील थेट प्रक्षेपणाच्या कार्यक्रमात पुण्याच्या एका श्वानप्रेमी डॉक्टरांनी माझा मुद्दा खोडताना असे सांगितले होते कि त्यांना भटके कुत्रे हे मानव प्राण्यांना चावतात हे माहीतच नाही . त्यांच्या म्हणण्यानुसार निदान पुण्यात तरी अश्या श्वानदंशाच्या घटना घडतच नाहीत .
असो , हि बातमी बुधवार, २४ जानेवारी, २०१८ च्या " नवाकाळ " या एका सुप्रसिद्ध मराठी दैनिकांमध्ये मुखपृष्ठावर छापून आली आहे .
गम्मत म्हणजे श्वानदंशग्रस्त अगदी शांतपणे हे असे अनेक श्वानदंश मुकाट्याने सहन करीत आहेत.
काय म्हणालात ? तुम्हाला अजूनही श्वान दंश झाला नाही ? अहो या भ्रमात राहू नकात . भरमसाठ संख्येने वाढलेल्या श्वान संख्येकृपेने व स्थानिक शासनाच्या निष्क्रियतेमुळे तुम्हाला , तुमच्या कुटुंबाला , तुमच्या मुला बाळांना , तुमच्या आप्त स्वकीयांना देखील हा श्वान दंश रुपी प्रसाद कधीही मिळू शकेल .
मानव प्राणी मरो , भटका कुत्रा मात्र जगो !
No comments:
Post a Comment