Tuesday, October 31, 2017

वाड्यात कुत्र्यांचा १७ जणांवर हल्ला

" वाड्यात कुत्र्यांचा १७ जणांवर हल्ला " 

" वाड्यात " म्हणजे कोणाच्या राहत्या वाड्यात नव्हे तर , ठाणे जिल्ह्यातील वाडा या गावात कुत्र्यांचा १७ जणांवर हल्ला . 

" ठाणे वैभव " या ठाणे येथून प्रकाशित होणारी एका नावाजलेल्या दैनिकाच्या १ नोव्हेंबर, २०१७ च्या अंकात हि बातमी छापून आली आहे. 

भारत देशा चे दुर्दैव असे आहे कि या अश्या मानव प्राण्यांवर भटक्या कुत्र्यांच्या  होणाऱ्या हल्ल्याच्या घटना नाही शासन कर्त्यांना ला दिसत , नाही राज्य कर्त्यांना दिसत , नाही प्राणी मित्रांना दिसत , नाही प्राणी मैत्रिणींना दिसत , नाही पोलिसांना दिसत . 

हे तुम्हाला माहित आहे का , कि जर तुमच्यावर भटका कुत्रा , भटके कुत्रे हल्ला करायला आले आणि तुम्ही स्व-सौरक्षणासाठी जर त्या भटक्या कुत्र्याला , भटक्या कुत्र्यांना दगड अथवा काठी फेकून मारली आणि एखाद्या प्राणी मित्राने , प्राणी मैत्रिणीने जर पोलिसात तक्रार नोंदवली तर तुम्हाला अटक देखील होऊ शकते . अश्या घटना घडलेल्या आहेत. 

अश्या वेळी मानव प्राण्याने " आ कुत्ते , मुझे काट " ( एक नवीन , आधुनिक म्हण ) असे फक्त म्हणायचे असते . 

नवीन , आधुनिक म्हण " माणूस मरो , पण भटका कुत्रा जगो " . 

बोला " मेरा भारत महान " . 


No comments:

Post a Comment