Sunday, June 5, 2016

भटक्या कुत्र्यांचा हैदोस; सांगलीत 50 जणांना श्वान दंश , कोल्हापुरात 6 लहान मुले, 3 महिला आणि एका वृद्धा ला श्वान दंश


नमस्कार , आणि सुंदर संध्याकाळ ,

भटक्या कुत्र्यांचा हैदोस; सांगलीत 50 जणांना श्वान दंश , कोल्हापुरात 6 लहान मुले, 3 महिला आणि एका वृद्धा ला श्वान दंश

घ्या अजून एक महाराष्ट्र राज्यातील " भटक्या कुत्र्यांच्या हैदोसाची " दुर्दैवे व हृदयद्रावक घटना .


एक गम्मत आहे कि अश्या या  " भटक्या कुत्र्यांच्या हैदोसाच्या  "  घटना " भारत " या देशातील माननीय , सन्माननीय  प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणींना कोणत्याही वृत्त वाहिनिंवरील बातम्या दिसत नाहीत. कोणत्याही वृत्तपत्रातील  " भटक्या कुत्र्यांच्या हैदोसाच्या  " अश्या या घटना " भारत " या देशातील माननीय प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणींना वाचता येत नाहीत ही अतिशय खेदकारक बाब आहे. या वरून असे निदर्शनास येते कि अजूनही या प्रकारची मर्यादित  निरक्षरता " भारत "  या देशात आहे.

भटक्या कुत्र्यांचा हौदोस; 50 जणांना चावा घेतला

Written by  Jai Maharashtra News Sunday, 05 June 2016 18:17
·          

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर   कोल्हापूरनंतर सांगलीतही भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. सांगलीतील पलूस तालुक्यात किर्लोस्कर वाडी, रामानंद नगर या गावात 50 ग्रामस्थांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला.   शनिवारी कोल्हापुरातही  जुना वाशी नाका परिसरात 10 जणांना कुत्र्यानं चावा घेतला होता.   यात 6 लहान मुले, 3 महिला आणि एका वृद्धाचा समावेश आहे. दरम्यान या घटनांनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल आहे. -

http://jaimaharashtranews.tv/maharashtra/2013-12-19-12-39-28/item/32735-%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B8


No comments:

Post a Comment