नमस्कार , आणि सुंदर संध्याकाळ ,
सांगलीमध्ये ( महाराष्ट्र राज्य ) दोन महिन्याच्या बाळावर कुत्र्याने हल्ला केला आहे
ही खालील बातमी वाचा . अश्या वेळी प्राणी मित्र / प्राणी मैत्रिणी कोठे गायब होतात ( MR. INDIA ) हेच कळत नाही. पण त्या कुत्र्याला जर हाड जरी म्हटलं तरी कोठून पळत येत्तात व पोलिसांना बोलवतात हे देखील कळत नाही.
या घटनेस ते बाळ जबाबदार असू शकते कारण त्या बाळाने ( २ महिन्याच्या ) अगोदर कुत्र्याची छेड काढली असेल अथवा त्या कुत्र्याला दगड मारला असेल , आणि म्हणूनच मग कुत्र्याने त्या २ महिन्याच्या बाळावर हल्ला केला असे देखील प्राणी मित्र / प्राणी मैत्रिणी म्हणू शकतात. याचे कारण त्यांना हेच एक पाठ केलेले वाक्य कोणत्याही भटक्या कुत्र्यांवरील चर्चेत बोलता येते.
त्यांच्या मते भटके कुत्रे कधीच कोणावर हल्ले करीत नाहीत . कोणाच्याही दुचाकीच्या मागे धावत नाहीत.
कुत्र्याने दोन महिन्याच्या बाळाला तोंडाने ओढत नेले अन्...
Sunday, 19 June 2016
17:45
जय महाराष्ट्र न्यूज, सांगली सांगलीमध्ये दोन महिन्याच्या बाळावर कुत्र्याने हल्ला केला आहे.
या हल्ल्यात बाळाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
संजय नगर परिसरात ही घटना घडली.
परिसरातील भटका कुत्रा दोन महिन्याच्या बाळाच्या पायाला ओढून नेत होता.
यावेळी नागरिकांनी आरडाओरडा केल्याने मोठा अनर्थ टळला.
No comments:
Post a Comment