Saturday, June 11, 2016

भटक्या कुत्र्यांना हद्दपार करा

नमस्कार आणि सुंदर सकाळ ,
भटक्या कुत्र्यांना हद्दपार करा
अहो हे मी नाही म्हणत आहे , हे मत व्यक्त केले आहे उच्च न्यायालयाने . पण त्यासाठी सांगली येथे भटक्या कुत्र्यांनी ५ वर्षीय तेजस हालेचा बळी गेल्याची घटना घडावी लागली .
" पुढारी " या वृत्तपत्राच्या १०.०६.२०१६ च्या अंकातील हि बातमी वाचा . बहुतेक भारतीय मानव प्राण्यांचा " भटका कुत्रा " नामक एका प्राण्याच्या दंशापासून सुटका होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
भटक्या कुत्र्यांना हद्दपार करा
By pudhari | Publish Date: Jun 10 2016 1:47AM | Updated Date: Jun 10 2016 1:47AM
मुंबई : प्रतिनिधी
निर्बी र्जीकरणाने भटक्या कुत्र्यांचे प्रजनन थांबेल. मात्र त्यांची हिंसक वृत्ती कमी होणार नाही. त्यांना हद्दपार करणेच योग्य ठरेल, असे परखड मत गुरुवारी उच्च न्यायालयाने व्यक्त केले. भटके कुत्रे नागरिकांचे बळी घेतात. त्यामुळे त्यांना प्रतिबंध करायला हवा. भटक्या कुत्र्यांना प्रतिबंध करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे नेमके काय धोरण आहे, याची माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले.
सांगली येथे भटक्या कुत्र्यांनी 5 वर्षीय तेजस हालेचा बळी घेतला. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेने भटक्या कुत्र्यांना प्रतिबंध करण्यासाठी उपाय योजना न केल्याने तेजसचा बळी गेला.
त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून प्रशासनाने 20 लाख रूपये द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका तेजसचे वडील मारुती हाले यांनी अ‍ॅड. पद्मनाभ पिसे यांच्यामार्फत केली आहे. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने वरील परखड मत व्यक्त केले. न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने हा मुद्दा व्यापक जनहिताचा असल्याचे मत व्यक्त केले. भटक्या कुत्र्यांमुळे अनेकांचा बळी गेला आहे. तेव्हा यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करायला हव्यात, असे मत व्यक्त करत न्यायालयाने वरील आदेश देऊन ही सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली.


No comments:

Post a Comment