नमस्कार
, आणि प्रसन्न सकाळ ,
पितृ दिन ( FATHER 'S DAY ) - एक सत्यावलोकन
आज
जागतिक पितृ दिन , म्हणजेच आजच्या शुद्ध
मराठी भाषेत ( FATHER 'S DAY ) ,
पाश्चात्य
देशात भेट वस्तू , शुभेच्छा पत्रे व अश्या
तत्सम वस्तूंची विक्री फक्त नाताळ ( आजच्या मराठीत CHRISTMAS ) मध्येच होत होती . बाकी वर्षभर फक्त वाढदिवस , लग्नाचा
वाढदिवस अ अश्या काही ठराविक दिवशीच होत होती . असे वाचण्यात आले कि पाश्चात्य देशातील हुशार व्यापाऱ्यांनी या भेट
वस्तूंचा , शुभेच्छा पत्रे व अश्या तत्सम वस्तूंची वर्षभर विक्री व्हावी म्हणून एक अफलातून युक्ती
लढवली. त्यांनी MOTHER’s DAY , FATHER’s DAY , BROTHER’s DAY , SISTER’s DAY ,
TEACHER’s DAY , ……. असे वेग वेगळे दिवस साजरे करण्याची टूम काढली व
ती तेथील जन माणसात जाहिरातींद्वारे रुजवली.
माझ्या
मते पाश्चात्य देशात बहुतेक STEP MOTHER’s
DAY , STEP FATHER’s DAY , STEP BROTHER’s DAY , STEP SISTER’s DAY , CURRENT GIRL / BOY FRIEND’s DAY , EX- GIRL / BOY FRIEND’s DAY , FIRST DIVORCE
DAY , SECOND DIVORCE DAY ......……. असेही दिवस बहतेक साजरे केले जात असतील.
असो
, भारतीय तसे अनुकरण प्रिय आहेत हे ओळखून भारतातील
हुशार व्यापाऱ्यांनी पाश्चात्यांची हि युक्ती
ताबडतोब उचलली अथवा पाश्चात्य देशातील व्यापाऱ्यांनी भारतीय व्यापाऱ्यांच्या गळी हि
संकल्पना रुजवली आणि भारतीय नागरिकांनी ती
ताबडतोब डोक्यावर घेतली.
मी
माझ्या अनुभवावरून सांगतो कि माझे वडील मी
२२ वर्षाचा होतो तेंव्हाच देवाघरी गेले , पण त्यांच्या हयातीत मी ना त्यांची कदर केली
, ना त्यांना कधी पुत्र सुख दिले . त्यांच्या पश्चात मी रोज त्यांची आठवण काढून रडतो
, पण मला हि अशी FATHER’s DAY , MOTHER’s DAY
वगैरे तोंड देखली नाटके करणे योग्य वाटत नाही.
आजच्या घडीला अनेक आई , वडील वृद्धाश्रमात रहात आहेत ,
कारण त्यांची मुले , मुली परदेशात वास्तव्य करीत आहेत. आणि गम्मत म्हणजे ती मुले ,
मुली परदेशात FATHER’s DAY , MOTHER’s DAY मात्र मित्र , मैत्रिणींबरोबर धुमधडाक्यात
साजरे करतात .
असो
या सगळ्या वर माझ्या कडून “ मातृ दिन , पितृ दिन ( MOTHER 'S DAY ,
FATHER 'S DAY ) “ पूर्वीच
लिहिली गेली ती येथे देत आहे ( मी येथे नमूद करू इच्छितो कि हि कविता मी कोणाचीही
चोरलेली नाही व स्वतः लिहिलेली आहे ) .
असे
अनेक दिन आज-काल साजरा करण्याची व पाश्चात्यांचे अनुकरण करण्याची भारतीयांना एक वाईट
सवय लागली आहे.
यातले
किती भारतीय , रोज आपल्या जन्मदात्यांच्या पाया पडतात ? ( चरणस्पर्श करून आशीर्वाद
घेतात ? )
यातले
किती भारतीय , रोज महिलांना मानाने वागवितात ?
या
सगळ्या ढोंगी पणाचा राग ( सौम्य स्वरुपात ) या कवितेत व्यक्त झाला आहे.
No comments:
Post a Comment