नमस्कार ,
जागरूक आणि जबाबदार वडील
शनिवार, १८.०६.२०१६ रोजी
सकाळी कार्यालयात जाताना हे छायाचित्र टिपले.
त्या दुचाकीस्वार गृहस्थांना
थाबवून स्वतः व मागे बसलेल्या मुलाला देखील शिरस्त्राण घातल्याबद्दल मनापासून धन्यवाद
द्यायचे होते , पण रस्त्यावर वर्दळ होती म्हणून
त्यांना थांबवू शकलो नाही.
त्या गृहस्थाला मी जागरूक
आणि जबाबदार वडील म्हणतो. लहानपणापासूनच मुलाला देखील नियम पाळण्याची शिस्त लागेल.
मला अनेक भारतीयांची कीव
येते कारण त्यांच्या वागण्यावरून सहज कळते कि नियम हे फक्त मोडण्यासाठीच असतात.
मी स्वतः २० ते २२ वर्षे
दुचाकी चालविली , पण एकदाही विना शिरस्त्राण नाही चालवली.
असो , देवापुढे एकाच मागणे
आहे कि भारतीयांना सगळेच नियम पाळण्याची सुबुद्धी दे.
No comments:
Post a Comment