Saturday, April 30, 2016

" १०८ " रुग्णवाहिका ( AMBULANCE ) सेवेला " जागरूक डॉक्टर " चा दणका

नमस्कार आणि सुंदर सकाळ ,

" १०८ " रुग्णवाहिका ( AMBULANCE ) सेवेला " जागरूक डॉक्टर " चा दणका

२९.०४.२०१६ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या वृत्त पत्रातील बातमी येथे देत आहे. हि बातमी वाचून अनेकांनी “ अरे भारत देशात हे सगळ नेहमीच होतंच असते “असे म्हणून हे नेहमीप्रमाणे सोडून दिल ही असेल.

" चलता है ! " हे जे भारतीयांच्या रक्तात भिनले आहे ते अतिशय घातक असे आहे . या मुळेच शासकीय कर्मचाऱ्यांना कोणताच धाक राहिलेला नाही.

" चलता है ! " प्रमाणे " मीच का करू ? " हे एक पळपुटे पणाचे गोंडस कारण ( EXCUSE ) भारतीय प्रत्येक दुरावस्थेवर देत असतो.

डॉक्टर आनंद हर्डीकर हे वैद्यकीय व्यवसाय ( MEDICAL PRACTICE ) करतात. त्यांचे स्वतःचे रुग्णालय ( HOSPITAL ) डोंबिवली येथे आहे . तेही तुमच्या आमच्या सारखे त्यांच्या व्यवसायात मग्न असतात . त्यांनाही संसार ( बायको , मुल बाळ ) आहे . पण ते एक " जागरूक नागरिक " म्हणून जगतात त्याच प्रमाणे अनेक प्रश्नांवर लढतात देखील . दुसरा कोण तरी लढेल , माझ्या बापाचे काय जातील असे सोयीस्कर पणे म्हणून , पळवाट काढून प्रश्नांवर शांत रहात नाहीत .

त्यांना कधीही FB वर GOOD MORNING , GOOD EVENING , GOOD NIGHT करताना नाही पाहिले. त्यांना कधीही FB वर रोज नित्य नियमाने " सुविचार " टाकताना नाही पाहिले . हो पण त्यांना अनेकदा " सु आचार " करताना पाहिले . ते कधीही वारंवार FB वर PROFILE PICTURE बदलत नाहीत , तर " भारत " या देशाचे PICTURE बदलण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. ते शक्यतो प्रतिक्रिया न देता क्रिया करण्यावर भर देतात.

खालील दोन ओळी जरूर वाचा आणि तुम्हीच ठरवा .

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !


कल्याण डोंबिवली - ६ महिन्यात २ लहानग्यांचा श्वान दंशाने मृत्यू

नमस्कार आणि सुंदर सकाळ ,
कल्याण डोंबिवली - ६ महिन्यात २ लहानग्यांचा श्वान दंशाने मृत्यू
२९.०४.२०१६ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या वृत्तपत्रातील हि बातमी कृपया वाचा.
डॉक्टर आनंद हर्डीकर , डोंबिवली यांचे स्वतःचे रुग्णालय आहे . वैद्यकीय व्यवसायात मग्न असून देखील ते गेली अनेक वर्षे या भटक्या कुत्र्यांच्या संख्येच्या अमर्याद अश्या वाढीवर लढत आहेत. हा प्रश्न त्यांनी देखील गल्ली ते दिल्ली सगळीकडे नेला आहे.
बाकी अनेक प्रश्नावर देखील ते वारंवार लढत असतात.
हेच खर " जागरूक नागरिक " असल्याचे लक्षण आहे.
" १०० वर्षे बकरी होऊन जगण्यापेक्षा १५ वर्षे वाघ होऊन जगा " अश्या प्रकारचे एक वाक्य मी कोठेतरी वाचले होते.
प्रत्यकाने ठरवायचे आहे कि त्याने " वाघ " व्हायचे का ............... व्हायचे ?


Monday, April 25, 2016

अडीच वर्षाच्या मुलाला भटक्या कुत्र्याचा चावा - ANOTHER INCIDENCE OF STRAY DOG BITE

नमस्कार ,

अडीच वर्षाच्या मुलाला भटक्या कुत्र्याचा चावा

आहे मी हे काही मनातले सांगत नाही . हि घटना महाराष्ट्र राज्यातील  डोंबिवली मधील गांधीनगर या भागातील आहे.

२४.०४.२०१६ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या वर्तमान पत्रातील हि बातमी वाचा म्हणजे तुम्हाला माझ्या सारखी , डॉक्टर आनंद हर्डीकर - डोंबिवली यांच्या सारखी  वेडी माणसे या भटक्या कुत्र्यांच्या संख्येच्या अनिर्बंध वाढीविरुद्ध का लढत आहे हे कळेल.

कुत्र्याच्या चाव्याचा जोर ( BITE FORCE INTENSITY ) हा मानवी चाव्याच्या जोरापेक्ष्या ४ पट असतो. म्हणजे विचार करा ज्याला श्वान दंश होतो त्याचे काय हाल होत असतील.

तुम्हाला माहित नसेल पण श्वान दंशाच्या घटनांमधील ८० % घटनांमध्ये ३ ते ८ या वयोगटातील बालके सापडतात.


काय म्हणालात जोपर्यंत तुमच्या जवळच्यांपैकी कोणाला श्वान दंश होणार नाही तोपर्यंत तुम्ही गप्प बसणार ?


पाणी टंचाई तील , शहरातील पाणी नासाडी - WASTAGE OF WATER IN CITIES


नमस्कार ,

पाणी टंचाई तील , शहरातील  पाणी नासाडी

सगळा महाराष्ट्र पाणी टंचाई चा सामना  करीत आहे. सगळीकडे पाणी वाचविण्याचे प्रयत्न चालू आहेत , पण अजूनही  शहरातील अनेक इमारतींच्या गच्चीवर असलेल्या पाण्याच्या टाक्यांमधून या प्रकारे पाणी वाया  जात आहे.  शहरात पाणी जमिनीखालील टाकीत साचवीले  जाते आणि मग त्यातून गच्चीवरील टाकीत ते पंपाद्वारे चढविले जाते. खरे तर प्रत्येक गच्चीवरील टाकी मध्ये , टाकी पाण्याने भरल्यावर पाणी थांबण्यासाठी एक VALVE हवा असतो , त्याचप्रमणे पंप आपोआपच थांबला पाहिजे नाहीतर हे असे पाणी वाया जाते. अजूनही अनेक उंच इमारतींमध्ये टाकीतून पाणी वाया  गेल्यावर ( OVER FLOW )  जेम्हा ते गच्चीवरील खाली येणाऱ्या नळीतून ( PIPE ) मधून खाली येते तेंव्हा खाली असलेला पहारेकरी ( WATCHMAN ) पंप बंद करतो. पाणी वाया जाऊन ते  पंप बंद होई पर्यंत रोज भरपूर पाणी वाया गेलेले असते.   या प्रकारे आजच्या या पाण्याच्या भयानक टंचाई मध्ये देखील हजारो लिटर पाणी असेच वाया जात आहे.

नवीन इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र ( OCCUPATION CERTIFICATE ) देताना हे सगळ बहुतेक पाहिले जात नाही असेच यावरून दिसते. असह्य अनेक इमारती महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये असतील.


 या सोबत एक छायाचित्र जोडले आहे , त्यावरून तुम्हाल या  पाण्याच्या नासाडीची कल्पना येईल.

Saturday, April 16, 2016

Thane is going to the dogs! Alarming | 15,000 dog bites last year. Despite reminders, TMC fails to control dog population

Thane is going to the dogs!
Alarming | 15,000 dog bites last year. Despite reminders, TMC fails to control dog population
following news article by Arvind Walmiki @airwind05 was published by DNA on May 16, 2015 . Till date condition has not been improved.

Thane: By the end of 2021, human population and stray dogs will be at par, if proper measures are not taken on time. Thane’s alert resident Satyajit Shah, 51, has conducted a detailed survey on stray dogs in the city in close co-ordination with the Thane Municipal Corporation (TMC) for the last few years.
The figures of the last four years reveal that in 2011-12, the number of dog bite cases were approximately 11,000 compared to 15,000 in 2013-14. This year till April, 3,600 cases have been registered.
Shah has also written to the related officer regarding this, but despite several letters and reminders, no measures have been taken to control the dog population. Shah, an engineer, said, “Stray dogs should not be given food on the road, instead they should be adopted. They pose threat to commuters, especially to cyclist and two-wheeler riders, travelling in evening. They chase bikers and while in most cases the bikers escape from the dog bite, some get attacked.”
“Dog bites can cause rabies. In fact, stray dogs pose threat to the police too, who are patrolling the streets at odd hours. So, there is a need to vaccinate such stray dogs. The government should compensate victims of dog bite,” Shah added.
“Every bite is measured in PSI (pound per square inch). The human has 150 PSI whereas the dog bite has 556 PSI. Their teeth are so sharp that it takes few seconds to tear a person’s clothes and reach the flesh,” explained Shah.
Gaytri Mahale, a resident of Thane who travels to CST for work, said, “We are so scared of stray dogs that while alighting the station, we have to be careful one can find dogs in every corner of the station. Since the station sees a huge footfall, one has to stay alert and ensure they don’t step on the dog.”
“The authorities do not pay any heed to the problem. During night, we hear dog barking near our society that closing the window is also pointless. More than half of the stray dogs are not sterilised. The authority must look into the matter,” she added.
Last year in June, nine-year-old Shahid Naseem Sayyed, who was on his way to school along with his brothers around 6.45am, was attacked by around 10 dogs. The boy was hardly a few steps away from his Urdu medium school when the incident took place. Locals tried to save him, but by then the dogs are severely injured the boy. He was admitted to JJ hospital.
Another incident took place last week when a two-year-old was attacked by four to five dogs. Passersby rushed to help him, but the animal had injured the boy severely. He was rushed to a nearby hospital.
Dr Anand Hardikar from the Indian Medical Association, Maharashtra, said, “The police should inquire with those who feed stray dogs. According to the law, this is not allowed. Dog attacks leaves the residents scared and at times they start crying during the treatment. The vaccine which is given to the dogs lasts for six months, so there should be periodical check-up after every six months, which is not done.”

Published Date: May 16, 2015


Friday, April 15, 2016

कविता " आवाज उठवा , जाब विचारा " / POEM " आवाज उठवा , जाब विचारा "

नमस्कार ,

" आवाज उठवा , जाब विचारा "

माझी " आवाज उठवा , जाब विचारा "  हि स्वरचित ( FACEBOOK वरून न चोरलेली ) कविता येथे देत आहे.

कविता सगळ सांगून जाते.  

आपण प्रतिक्रिया द्याल / विचाराल कि मी असे फक्त  लिहितो का स्वतः जाब  हि विचारतो ? मी स्वतः अनेक प्रश्नांवर लढतो व अनेकांना जाब देखील विचारतो.

आपण माझा  http://fightofacommonman.blogspot.in/   हा BLOG  पाहू शकता.

Evil Triumphs When Good People Sit Quiet 


Stand up for what is right , Even if you’re standing alone !


पुणे येथे एका कुत्र्याने एका दिवसात ४६ पुणे करांना चावा घेतला .- 46 cases of Stray Dog Bite in PUNE in a single day.

नमस्कार ,

पुणे येथे एका कुत्र्याने एका दिवसात  ४६ पुणे करांना चावा घेतला .

या सोबत ३० .०९.२०१५ ची बातमी देत आहे. अश्या अनेक घटना भारत भर नित्य नियमाने  घडत असतात . काही छापून येतात तर काही छापून येत नाहीत.

आपल्याला कल्पना नसेल पण " भारत " या देशात रोज अंदाजे  १,४१,९६०  सामान्य भारतीयांना श्वान दंश होतो. 

या श्वान दंशाच्या घटनांमध्ये ८० % वेळा ३ ते ८ या वयोगटातील बालके सापडतात.

काय म्हणालात तुम्हाला अजूनही श्वान दंश झाला नाही ? अहो म्हणून निर्धास्त राहू नकात. भटक्या कुत्र्यांची संख्या एवढ्या वेगात वाढत आहे कि " ठाणे " या महाराष्ट्रातील एका शहरात २०२१ साली अंदाजे २७ लाख एवढे भटके कुत्रे असू शकतील.  ( एक कुत्री वर्षातून दोन वेळा पिल्ले देऊ शकते . प्रत्येक  वेळी तिला अंदाजे १२ पिल्ले होतात त्यातील ६ जगतात व ६ जगत नाहीत. )


या  भटक्या  कुत्र्यांच्या संख्येच्या अनिर्बध वाढीवर बहुतांश भारतीय अनभिज्ञ  आहेत.


आदरणीय राज्यसभा सदस्यांना भटक्या कुत्र्यांचा त्रास

नमस्कार , सुंदर सकाळ ,

आदरणीय राज्यसभा सदस्यांना भटक्या कुत्र्यांचा त्रास

या सोबत भारतीय संसदेच्या वतीने एक जाहिरात दिली आहे ती जोडली आहे.

या मध्ये राज्य सभा सदस्यांच्या रहिवासी भागात माकडे व कुत्रे ( भटके कुत्रे ) यांचे नियोजन कसे करायचे याबाबत सल्ला मागविला आहे.

किती गम्मत आहे ना , " भारत " देशात बहुतांश नागरिक भटक्या कुत्र्याच्या त्रासाने हतबल झाली आहे , त्याचे कोणत्याही शासन कर्त्याला काहीही पडले नाही पण राज्य सभा सदस्यांना होणाऱ्या माकडांच्या  व भटक्या कुत्र्यांच्या त्रासाबद्दल जास्त काळजी आहे.  

" भारत " या देशात रोज अंदाजे  १,४१,९६०  सामान्य भारतीयांना श्वान दंश होतो.  त्या कडे एकाही राजकीय व्यक्तीचे लक्ष नाही.

मेरा भारत महा..................न.


भारत देशात मानव प्राण्यांपेक्षा ' भटका कुत्रा " या प्राण्याचे चांगले दिवस आहेत.


“श्वान दंशाच्या जखमा” STRAY DOG BITE WOUNDS

नमस्कार ,

“श्वान दंशाच्या जखमा”

डोंबिवली येथे स्वतःचे रुग्णालय असलेले डॉक्टर आनंद  हर्डीकर , ते  सुद्धा भटक्या कुत्र्यांच्या सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाविरुद्ध गेली बरीच वर्षे लढत आहेत.

त्यांनी श्वान दंश झालेल्या जखमांची  काही छायाचित्रे  मला पूर्वी पाठवली होती , ती येथे देत आहे.  किती भयानक जखमा श्वान दंशामुळे होतात हे आपल्याला कळेल.

आपल्याला हे माहीत नसेल कि मानवी चाव्याची जेवढी तीव्रता ( FORCE ) असते त्याच्या ५ पट  तीव्रता ( FORCE ) श्वान दंशाची असते.


याची तीव्रता / भयानकता अनेकांना माहीत नाही म्हणून हा सगळा खटाटोप.



Thursday, April 14, 2016

श्वानाला ( कुत्र्याला ) हाड म्हणाल्यामुळे ( हाकलले म्हणून ) दोघांना जबर मारहाण

नमस्कार ,

श्वानाला ( कुत्र्याला ) हाड म्हणाल्यामुळे  ( हाकलले  म्हणून )  दोघांना जबर मारहाण

१४.०४.२०१६ च्या " लोकसता " या वर्तमान पत्रातील एक बातमी येथे देत आहे .

हि भविष्य काळासाठी हि फार मोठी  धोक्याची घंटा आहे.

" भारत " हा या आधुनिक जगातील असा एकुलता एक देश आहे , जेथे " भटका कुत्रा " नावाच्या चार पायाच्या प्राण्याला , " मानव प्राणी " नावाच्या दोन पायाच्या प्राण्यापेक्षाही फारच जास्त किंमत आहे.

हे सगळ मी माझ्या "भटक्या  कुत्र्यांना " राष्ट्रीय प्राणी घोषित करा या उपहासात्मक लेखात लिहिले होते.  तो लेख ७.४.२०१५ च्या " नवाकाळ " या वृत्तपत्रात छापून आला होता.

हे असेच चालू राहिले तर काही वर्षां नंतर " भारत " नावाच्या देशात अशी मारहाण करणाऱ्यांना " कुत्रा भूषण " वगैरे किताब दिला जाईल. 

Evil Triumphs When Good People Sit Quiet 


Stand up for what is right , Even if you’re standing alone !


Saturday, April 2, 2016

“ वाहतुकीचे नियम मोडणार्यांना दंडाची पावती घरपोच करणार “

“ वाहतुकीचे नियम मोडणार्यांना "ठाणे" वाहतूक पोलिस दंडाची पावती घरपोच करणार “
नमस्कार ,
बहुतेक एक वर्षाच्या वर झाले असेल डॉक्टर रश्मी ताई करंदीकर यांनी DCP TRAFFIC THANE याचा पदभार सांभाळून .
ठाणे येथील वाहतूक व्यवस्थापनाबाबत अनेक सकारात्मक गोष्टी घडत आहेत. वाहतुकीला शिस्त येत आहे . ९० % च्या वर नागरिक दुचाकीवर शिरस्त्राण घालीत आहेत. अनेक पोलिस देखील दुचाकीवर शिरस्त्राण घालीत आहेत.
वाहतूक शाखेचे आधुनिकीकरण देखील वेगाने होत आहे . या बद्दल मी रश्मी ताई व त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो.
" वाहतुकीचे नियम मोडणार्यांना दंडाची पावती घरपोच करणार " हि " पुण्यनगरी " या दैनिकात आलेले बातमी यासोबत जोडत आहे , व या खाली देखील UNICODE मध्ये देत आहे .
जर सगळ्यांनीच नियम पाळले तर , भारत देश कुठल्या कुठे पोहोचेल.


“ वाहतुकीचे नियम मोडणार्यांना दंडाची पावती घरपोच करणार “
ठाणे : ठाणे वाहतूक पोलीस आता वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहनचालकांना त्यांच्या दंडाची पावती घरपोच करणार आहेत. या कामी शहरातील सिग्नलवर बसवण्यात आलेल्या कॅमेर्यांची मदत घेण्यात येणार आहे.
ठाणे शहरातील महामार्गावर असणार्या आनंदनगर, तीनहात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी आणि कापूरबावडी या महत्त्वाच्या सिग्नलवर यापुढे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. हे कॅमेरे थेट तीनहात नाक्यावरील ठाणे वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले आहेत. येथे नियंत्रण कक्षातील कर्मचारी त्यावर लक्ष ठेवतात. येथील एलसीडी स्क्रीनवर वाहतूक पोलीस शहरातील वाहतुकीवर लक्ष ठेवतात. शहरात मोठय़ा प्रमाणात वाहतुकीचे नियम मोडण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊन त्यातून अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या कारणास्तव ठाणे वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या आधारे अशा प्रकारे बेशिस्त चालकांना दंडाची पावती थेट घरपोच पाठवण्याची योजना मागील आठवड्यापासून सुरू केली आहे.