Saturday, January 31, 2015

आगळा , वेगळा वाढदिवस .


काल माझा ५१ वा वाढदिवस थोड्या  वेगळ्या प्रकारे साजरा केला .

आपण अनेकदा वाहतूक पोलिसांना बघून म्हणतो कि अरे हे कसे काय गाड्यांच्या धुराच्या प्रदूषणात जगतात ?

SATIS  च्या खाली व GOLDEN DYES नाका उड्डाणपुलाच्या खाली काम करताना वाहतूक पोलिस कसे काय बहिरे होत नाहीत ?

आपण हे फक्त स्वतःशीच म्हणतो किंवा फार , फार तर बायकोला सांगतो , पण कधीही विचार केला आहे का कि आपण त्यांच्यासाठी काय करतो ?

आपण म्हणाल कि हे काम शासनाचे आहे . आगदी बरोबर , पण जेथे अजूनही पोलिसांना योग्य चिलखते मिळालेली नाहीत तेथे नाकाला लावण्याचा MASK , व कानात घालण्याचे ( EAR ) PLUGS कसे काय मिळतील ?

आपल्या पंतप्रधानांनी या अगोदरच सांगितले आहे कि , सगळ्या गोष्टींवर शासनावर अवलंबून राहू नकात.

आपल्या पैकी बऱ्याच जणांना फक्त असे बोलायची सवय असते कि अरे कोणी तरी त्यांच्या साठी हे करा , ते करा इत्यादी . पण उंटावरून कधीच शेळ्या राखल्या जात नाहीत.

मी ठरविले कि का नाही आपल्यापासूनच याची सुरुवात करूया .

आपणच त्यांना आपल्या कुवतीप्रमाणे या गोष्टी तरी द्याव्यात,

त्याप्रमाणे शुभस्य शीघ्रम करून मी च VAHTUK पोलिसांना MASK व EAR PLUGS दिले.

हा छोटेखानी समारंभ , काल म्हणजे , शनिवार ,  ३१ जानेवारी, २०१५ रोजी , दुपारी १२.३० वाजता , तीन हाथ नाका वाहतूक पोलिसांचे ( DCP TRAFFIC OFFICE ) कार्यालय,  ठाणे ( पश्चिम ) येथे आमदार श्री. संजय केळकर यांच्या हस्ते  संपन्न  झाला.  

या वेळेला ACP Traffic , श्री. मठाधिकारी साहेब ,  पोलिस निरीक्षक ( P.I. ) श्री. श्रीकांत सोंडे साहेब व त्यांचे सहकरी उपस्थित होते .

तसेच या कार्यक्रमात आमच्या  अनेक लढतीमधील सहकारी, लढवैय्या जागरूक ठाणेकर, RTI ACTIVIST व मित्र  निलेश आंबेकर , ठाण्यातील एक सुप्रसिद्ध RTI ACTIVIST व लढवय्यें जागरूक नागरिक श्री. चन्द्रहांस तावडे जी , माझा मुलगा सुमेध शाह , माझी शाळेतील वर्ग मैत्रीण ललिता गीते ( मुलुंड हून आली होती )  , ठाण्यातील RTI KATTA गेली अनेक वर्षे चालविणाऱ्या, व वृतपत्र स्तंभ लेखिका  शोभा ताई सुभेदार असे काही मान्यवर वेळात वेळ काढून उपस्थित होते.

ठाणे वाहतूक शाखेचे , श्री. श्रीकांत सोंडे यांनी या साठी मला प्रोत्साहन दिले.

अनेक वाहतूक पोलिसांनी या उपक्रमाचे स्वागत केले .  पोलिसांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून मला वाढदिवसाचे एक मोट्ठे  गिफ्ट मिळाल्याचे समाधान प्राप्त झाले .

याद्वारे , पोलिस व नागरिक यांच्यामध्ये असलेली दरी कमी करण्याचाही एक छोटासा प्रयत्न केला आहे.

अश्या अनेक छोट्या  व  महत्वाच्या  वस्तू  आपण पोलिसांना देवून त्यांच्या कामात हातभार लावू शकतो .

त्याच प्रमाणे आपण सफाई कामगारांना गमबूट , हातमोजे अश्या काही महत्वाच्या वस्तू हि भेट देवू शकतो .

वर्षातून एकदा जरी  असे काही छोटेसे उपक्रम हाती घेवून , सत्कार्य अनेकांनी केले तर , बऱ्याच चांगल्या गोष्टी समाजात घडू शकतील.

मी माझ्या पासून सुरुवात केली आहे . चला आपण हि असे काही वेगळे करून आपला वाढदिवस , लग्नाचा वाढदिवस असे दिवस साजरे करा.

अशानेच लवकरच सुदिन येवू शकतील.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !



No comments:

Post a Comment