Saturday, January 31, 2015

आगळा , वेगळा वाढदिवस .


काल माझा ५१ वा वाढदिवस थोड्या  वेगळ्या प्रकारे साजरा केला .

आपण अनेकदा वाहतूक पोलिसांना बघून म्हणतो कि अरे हे कसे काय गाड्यांच्या धुराच्या प्रदूषणात जगतात ?

SATIS  च्या खाली व GOLDEN DYES नाका उड्डाणपुलाच्या खाली काम करताना वाहतूक पोलिस कसे काय बहिरे होत नाहीत ?

आपण हे फक्त स्वतःशीच म्हणतो किंवा फार , फार तर बायकोला सांगतो , पण कधीही विचार केला आहे का कि आपण त्यांच्यासाठी काय करतो ?

आपण म्हणाल कि हे काम शासनाचे आहे . आगदी बरोबर , पण जेथे अजूनही पोलिसांना योग्य चिलखते मिळालेली नाहीत तेथे नाकाला लावण्याचा MASK , व कानात घालण्याचे ( EAR ) PLUGS कसे काय मिळतील ?

आपल्या पंतप्रधानांनी या अगोदरच सांगितले आहे कि , सगळ्या गोष्टींवर शासनावर अवलंबून राहू नकात.

आपल्या पैकी बऱ्याच जणांना फक्त असे बोलायची सवय असते कि अरे कोणी तरी त्यांच्या साठी हे करा , ते करा इत्यादी . पण उंटावरून कधीच शेळ्या राखल्या जात नाहीत.

मी ठरविले कि का नाही आपल्यापासूनच याची सुरुवात करूया .

आपणच त्यांना आपल्या कुवतीप्रमाणे या गोष्टी तरी द्याव्यात,

त्याप्रमाणे शुभस्य शीघ्रम करून मी च VAHTUK पोलिसांना MASK व EAR PLUGS दिले.

हा छोटेखानी समारंभ , काल म्हणजे , शनिवार ,  ३१ जानेवारी, २०१५ रोजी , दुपारी १२.३० वाजता , तीन हाथ नाका वाहतूक पोलिसांचे ( DCP TRAFFIC OFFICE ) कार्यालय,  ठाणे ( पश्चिम ) येथे आमदार श्री. संजय केळकर यांच्या हस्ते  संपन्न  झाला.  

या वेळेला ACP Traffic , श्री. मठाधिकारी साहेब ,  पोलिस निरीक्षक ( P.I. ) श्री. श्रीकांत सोंडे साहेब व त्यांचे सहकरी उपस्थित होते .

तसेच या कार्यक्रमात आमच्या  अनेक लढतीमधील सहकारी, लढवैय्या जागरूक ठाणेकर, RTI ACTIVIST व मित्र  निलेश आंबेकर , ठाण्यातील एक सुप्रसिद्ध RTI ACTIVIST व लढवय्यें जागरूक नागरिक श्री. चन्द्रहांस तावडे जी , माझा मुलगा सुमेध शाह , माझी शाळेतील वर्ग मैत्रीण ललिता गीते ( मुलुंड हून आली होती )  , ठाण्यातील RTI KATTA गेली अनेक वर्षे चालविणाऱ्या, व वृतपत्र स्तंभ लेखिका  शोभा ताई सुभेदार असे काही मान्यवर वेळात वेळ काढून उपस्थित होते.

ठाणे वाहतूक शाखेचे , श्री. श्रीकांत सोंडे यांनी या साठी मला प्रोत्साहन दिले.

अनेक वाहतूक पोलिसांनी या उपक्रमाचे स्वागत केले .  पोलिसांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून मला वाढदिवसाचे एक मोट्ठे  गिफ्ट मिळाल्याचे समाधान प्राप्त झाले .

याद्वारे , पोलिस व नागरिक यांच्यामध्ये असलेली दरी कमी करण्याचाही एक छोटासा प्रयत्न केला आहे.

अश्या अनेक छोट्या  व  महत्वाच्या  वस्तू  आपण पोलिसांना देवून त्यांच्या कामात हातभार लावू शकतो .

त्याच प्रमाणे आपण सफाई कामगारांना गमबूट , हातमोजे अश्या काही महत्वाच्या वस्तू हि भेट देवू शकतो .

वर्षातून एकदा जरी  असे काही छोटेसे उपक्रम हाती घेवून , सत्कार्य अनेकांनी केले तर , बऱ्याच चांगल्या गोष्टी समाजात घडू शकतील.

मी माझ्या पासून सुरुवात केली आहे . चला आपण हि असे काही वेगळे करून आपला वाढदिवस , लग्नाचा वाढदिवस असे दिवस साजरे करा.

अशानेच लवकरच सुदिन येवू शकतील.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !



Thursday, January 29, 2015

मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकांना भटके कुत्रे चावतात याची दाखल घेतली.

मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकांना भटके कुत्रे चावतात याची दाखल घेतली.

हि बातमी दैनिक लोकमत च्या HELLO नागपूर च्या १५ जानेवारी , २०१५ च्या अंकात आली होती.

आता तरी शासनाने भटक्या कुत्र्यांच्या संख्येत होणाऱ्या अनिर्बंध  वाढीवर ताबडतोब आळा घातला पाहिजे.

मानव प्राणी सुद्धा मुल होण्यासाधी नसबंदी ची शस्त्रक्रिया करून घेतो . मग या " SO CALLED " प्राणी मित्रांना भटक्या कुत्र्यांच्या STRELIZATION वर देखील आक्षेप आहे.

आता वेळ आली आहे कि हा प्राणी प्रेमाचा अतिरेक so  called प्राणी मित्रांनी थांबविला पाहिजे.

उद्या हे " SO CALLED " प्राणी मित्र  डास हि मारू  नका असेही म्हणतील .

बरेच प्राणी मित्र कोंबडी , मासे , मटण ताव मारून खातात , तेव्हा त्यांचे प्राणी प्रेम कोठे जाते ?

सलमान खान , सैफ आली खान वगैरे प्राण्यांची शिकार करतात , तेव्हा यांचे प्राणी प्रेम कोठे जाते ?

भारतीयांनो उठा , काही  वर्षानंतर  प्रत्येक नागरिक मागे एक भटका कुत्रा असे हि  चित्र दिसू शकेल.


Evil Triumphs When Good People Sit Quiet 


Wednesday, January 28, 2015

आपणाला भटक्या कुत्र्यांचा त्रास हा प्रश्न महत्वाचा वाटत नाही का ?

भटक्या कुत्र्यांचा त्रास हा जवळपास सगळ्या भारतीयांना होत आहे. फक्त नेहमीप्रमाणे भारतीय गप्प बसून सहन करीत आहेत.
उंटावरून शेळ्या राखणाऱ्या काही मोजक्या प्राणी मित्रांमुळे शासन हि गप्प बसले आहे. जो पर्यंत राजकीय नेत्याला , किंवा एखाद्या अभिनेत्यला व अभिनेत्रीला भटका कुत्रा चावत नाही, तो पर्यंत शासन हालचाल करणार नाही.
आपणाला एक धक्कादायक बाब माहित आहे का ? या SO CALLED प्राणी मित्रांपैकी काही जण मांसाहार करी असतील . मांसाहार करण्यासाठी कोंबडी , बकरा , मासे यांना ठार मारव लागत. मला नाही वाटत कि या प्राण्यांच्या नैसर्गिक मृत्युनंतर त्यांना खाल्ल जात. जर मांसाहारासाठी हेच प्राणी मित्र प्राण्यांची हत्या करतात तर यांना फक्त कुत्र्यांवर प्रेम का आहे ? हे अगदी दुत्तापी धोरण नाही का ?
सहा वर्षाच्या मुलाला कुत्र्यांनी ठार मारलं तरीही चालेल , कारण तो त्यांचा मुलगा नव्हता . यालाच म्हणतात उंटावरून शेळ्या राखण .
ठाण्यात तर हा त्रास फारच झाला आहे.
गेले ३ / ४ वर्षे मी मुख्यमंत्र्यांपासून ते , ठाणे महानगर पालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांपर्यंत हि बाब नेली आहे.
आजच्या "सकाळ" या मराठी वर्तमान पत्रामध्ये आलेली बातमी पहा . मी सकाळ च्या श्री. राजेश मोरे यांचे अत्यंत आभार मानतो कारण त्यांनी या प्रःनाला वाचकांपर्यंत नेल.
या सोबत मी २ फोटो टाकत आहे ज्यात आपण बघू शकता कि ठाण्यात हे भटके कुत्रे किती आरामात फिरत आहेत.
माझे प्रामाणिक मत आहे कि या SO CALLED प्राणी मित्रांनी या भटक्या कुत्र्यांना दत्तक घ्याव व स्वतःच्या घरी नेवून सांभाळाव.
आपणाला भटक्या कुत्र्यांचा त्रास हा प्रश्न महत्वाचा वाटत नाही का ?
Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stop Feeding Stray Dogs, Rather Adopt Them .

http://fightofacommonman.blogspot.in/





 

Sunday, January 25, 2015

भटक्या कुत्र्यांचा हैदोस

आजच्या दिवशी भात्क्याकुत्र्यांनी तर सगळ्या हद्दी ओलांडल्या.

१. )  आज महेश जाधव या ६ वर्षाच्या मुलाचा , जालना , महाराष्ट्र ,  भारत  येथे , भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला .

२. )  भारताच्या राजधानीत आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना मानवंदना देण्याचा जो कार्यक्रम झाला त्यात एका भटक्या कुत्र्याने उपस्थिती लावून गोंधळ माजवून दिला . त्याला हाकलताना सुरक्षा अधिकाऱ्यांची धावपळ उडाली.

पहिल्या घटनेला काय म्हणाव ? मी नेहमी म्हणत असतो कि भारतात मानव प्राण्या पेक्ष्या भटक्या कुत्र्यांना जास्त मान दिला जातो.

ठाण्याचे उदाहरण घ्या , गेल्या अनेक महिन्यात कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची काय वस्तुस्थिती आहे हे कळायला मार्ग नाही, जसा CANCER  वेगात  वाढतो त्याप्रमाणे ठाण्यात सगळीकडे भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपणाला हे माहित नसेल , पण प्रत्यक कुत्री दर वर्षी  १२ पिल्लांना जन्म देते. त्यातील अंदाजे ६ जगतात. विचार करा किती वेगात भटक्या कुत्रांची संख्या वाढत आहे..

माझ्या अनुमानाप्रमाणे सध्या ठाण्यात अंदाजे ६०,०००  ते ७०,००० भटके कुत्रे आहेत. अशा वेगात त्यांची उत्पत्ती जर वाढली तर २०२१ साले त्यांची ठाण्यातील संख्या अंदाजे २७ लाख इतकी होणार आहे. त्यावेळेला ठाण्याची लोकसंख्या अंदाजे ३० लाख असेल.

ठाण्याची हि स्थिती तर मग आपण महाराष्ट्राती इतर गावांची , भारतातील अनेक गाव, शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या काय असेल  ह्याचा विचार करा.

ठाण्यात रोज अंदाजे १० च्या वर लोकांना भटके कुत्रे चावतात. ( हि माहिती पूर्ण नाही . भटके कुत्रे चावणार्ऱ्यांची संख्या जास्त असू शकते ) . जर ठाण्यात रोज १० जनांना भटका कुत्रा चावतो मग विचार करा कि भारतात रोज किती जणांना भटके  कुत्रे चावत असतील.

आता दुसरी घटना - जर एवधी अभेद्य  सुरक्षा व्यवस्था भेदून  भटका कुत्रा जर मानवन्द्नेच्या  ठिकाणी जावू  शकतो तर विचार करा , भविष्यात भटक्या कुत्र्यांची संख्या  हाताबाहेर गेल्यावर हे भटके कुत्रे सहजपणे EXPRESS WAY , HIGHWAY , RAILWAY , AIRPORT RUNWAY अश्या अनेक ठिकाणी प्रवेशु शकतात व अश्या ठिकाणी जर अपघात झाले तर विचार करा किती मानव प्राण्याचे जीव जातील.

परत सांगतो भारतातील मानव प्राण्याचे दुर्दैव असे कि भारतात भटक्या कुत्र्यांना मानव प्राण्यापेक्षा चांगली वागणूक मिळते.

मानव प्राणी मेला  तरी चालेल पण भटक्या कुत्र्यांबद्दल ब्र देखील नाही काढायचा .

कोठे चालला आहे भारत आपला ?

Stop Feeding Stray Dogs, Rather Adopt Them .

Make Thane – A City Free From Stray Dogs.

http://fightofacommonman.blogspot.in/





Saturday, January 24, 2015

अप्रतिम बोधकथा

आजच्या ( रविवार, २५ जानेवारी, २०१५ ) " ठाणे वैभव " या ठाण्यातील एका प्रतिष्ठित वर्तमानपत्रामध्ये आलेली बोध कथा. ( मी नाही लिहिली , गैरसमज नको . मी फक्त SHARE  करतोय )

जर आपल्या सगळ्या नेत्यांनी हे अमलात आणले तर भारत हा एक खरोखर एक समृद्ध देश होवू शकतो.

दुर्दैवाने काय सत्य आहे हे आपल्याला सांगायची गरज नाही.

सध्या जे चालले आहे त्यामुळेच मला " आजची सत्यगीते " हा काव्यसंग्रह लिहिण्याच स्फुरण मिळाले.

आपल्या राज्कारानांमुळे मी कवी झालो.

http://fightofacommonman.blogspot.in/.


Tuesday, January 20, 2015

पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहासाठी पहिला वाहिला पुरस्कार

मला सांगायला आनंद होत आहे कि , माझ्या " आजची सत्यगीत " या वहिल्या वहिल्या काव्यसंग्रहा साठी " कोंकण ग्राम विकास मंडळ " , ठाणे यांनी मला " स्वर्गीय यमुनाबाई बाजी राणे " हा पुरस्कार  दिला.

एक छानसा योगा योग झाला , माझ्या काव्य संग्रहाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहोळ्याचे सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे हे अध्यक्ष होते या मला मिळालेल्या पहिल्या वहिल्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचेही अध्यक्ष  कवी अशोक बागवे हेच होते.

मला हा काव्यसंग्रह वाचकांपर्यंत नेण्यासाठी अनेक जणांचा हात भर लागला .

मी त्या सगळ्यांचे मन पासून आभारी आहे.


अनेक नामांकित व्यक्तींनी माझ्या या काव्यसंग्रहाचे कौतुक केले आहे



Wednesday, January 14, 2015

रस्ता सुरक्षा सप्ताह , २०१५ - एक विसंगती

रस्ता सुरक्षा सप्ताह , २०१५ हा रविवार , ११ जानेवारी , २०१५ ते शनिवार , १७ जानेवारी  २०१५ या कालावधी मध्ये साजरा केला जात आहे .

हा खरच प्रशंसनिय  उपक्रम आहे .

पण , बुधवार , १४ जानेवारी रोजी एक विसंगती आढळून आली ( अशी विसंगती नेहेमीच आढळून येते ) व त्याचे फोटो हि मी घेतले कारण भारतात पुराव्याशिवाय काहीच होत नाही.

सकाळ पासून ३ ते ४ पोलिसांना ( दुचाकीवर चालवीत  असतांना ) हेल्मेट नाही घातले म्हणून त्यांना हेल्मेट घालण्याची विनंती केली . प्रत्येकाने घाईत होतो, चूक झाली अशी नित्य नियमाची कारणे सांगितली पण प्रत्येकाने हेल्मेट घालतो असे सांगितले याच अर्थ सगळ्यांना हेल्मेट घातले पाहिजे हे माहित होते.

गम्मत म्हणजे पोलिसांच्या दु चाकी लगेच ओळखू येतात कारण ते परवानगी नसतांना देखील एक वर्तुळाकार STICKER ज्यावर पोलिस लिहिले आहे तो लावतात.

असो , जेल रोड, ठाणे  हून कळवा येथे जाणाऱ्या चोव्कात एक वाहतूक पोलिस दुसऱ्या वाहतूक पोलिसाबरोबर ( दुसरा दुचाकीवर , HELMET न घालता होता )  काही बोलत उभा होता. तेथून तो दुचाकीस्वार वाहतूक पोलिस , कळव्याच्या दिशेने गेला , तेथून तो विटावा गावाच्या दिशेने गेला . गम्मत म्हणजे , तो HELMET न  घालता  अगदी बिनधास्त दु चाकी चालवत होता . कळवा चोव्कात तो बाकी गाड्यांबरोबर सिग्नल ला उभा होता तेव्हा बाकी दुचाकीस्वारांनी HELMET घातले होते पण या या वाहतूक पोलिसाने हेल्मेट नव्हते घातले . हा एक अतिशय दयनीय विरोधाभास  होता .

माजी DCP TRAFFIC, THANE  DR  SHRIKANT PAROPKARI यांनी एक पत्रक काढून सगळ्या पोलिसांना हेल्मेट घालण्याबद्दल आदेश दिले होते व POLICE असे अनधिकृत STICKERS न लावण्याबद्दल हि आदेश दिले होते .

एवढे असूनही जर अजूनही POLICE दुचाकीवर  STICKER लावतात , हेल्मेट घालत नाहीत , SEAT BELT लावत नाहीत , अनेक पोलिसांच्या गाड्यांना काळ्या काचा असतात याला काय म्हणाव ?

जर नियम बनविणारे , म्हणजेच पोलिस, नेते, राजकारणी , VIP , VVIP या सगळ्यांनी नियमांना पायदळी तुडविल्यावर जनतेकडून नियम पाळण्याची कशी काय अपेक्षा केली जाते ?

माझ्या माहितीप्रमाणे भारत देशामध्ये नियम हे सगळ्यांना समान असतात व सगळ्यांना सारखेच लागू असतात.

या विषयावर मी गेली अनेक महिने वेगवेगळ्या स्तरांवर माहिती , पुरावे , फोटो पाठवत आहे .

कोणत्याही देशात यथा राजा तथा प्रजा असा कारभार असतो .

मी सगळ्या आदरणीय , माननीय , वंदनीय सदस्यांना हा विषय तातडीने घेवून यावर त्वरित अंमलबजावणी करावी हि विनंती करीत आहे.

नेहमीप्रमाणे या बरोबर काही फोटो पाठवीत आहे .

माझी पक्की खात्री आहे कि  दिवशी पोलिस, नेते, राजकारणी , VIP , VVIP हे सगळे नियम पाळू लागतील , तेव्हा आपोआप जनताही नियम पळू लागेल .

चला "स्वच्छ भारत" या  अभियाना   बरोबर " सगळ्यांनी नियम पाळा "  हा एक उपक्रम   भारतीयांनो   राबवूया .

भारताला एक शिस्तप्रिय देश बनवूया .







Saturday, January 3, 2015

" गड्या आपलाच देश बरा.... "

"लोकप्रभा" या साप्ताहिकाच्या ९ जानेवारी , २०१५ च्या अंकात
माझा " गड्या आपलाच देश बरा.... " हा लेख छापून आला आहे.

या लेखातला फोटो मी BARCELONA येथे काढला आहे.

या फोटोतून असा कळत कि ,

१. ) तेथे लाल सिग्नल असेल तर सगळ्या गाड्या थांबतात  
२. ) पोलिस नसूनसुद्धा कोणीही सिग्नल मोडत नाही .
३.  सगळे दुचाकीस्वार HELMET घालतात
४  ) कचऱ्याच्या मोठ्या गाड्या असतात .
५. ) फोटो त एक नाका दिसतोय , पण तेथे एकही HOARDING लावलेला नाही . आपल्याकडे अश्या नाक्यावर कमीत कमी ५ HOARDINGS लावले असते .

हा अंक प्रकाशित झाला आहे व वर्तमानपत्र विक्रेत्याकडे उपलब्ध आहे.

हा लेख म्हणजे "नागरिक" या व्यक्तीं ला "जागरूक नागरिक " करण्याच्या माझ्या उपक्रमातला एक भाग आहे .
या अगोदर माझा " आजची सत्यागीत " हा सामजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कविता असलेला काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे.

हा काव्यसंग्रह आपल्याला हवा असेल तर मला जरूर कळवा .

माझा मोबा. ०९८२११५०८५८
माझा ई मेल satyajitshah64@gmail.com

चला सर्वांनी मिळून सुदृढ , शक्तिशाली भारत बनवूया .