Thursday, January 25, 2018

" R .K LAXMAN " यांची पुण्यतिथी

" R .K LAXMAN " यांची पुण्यतिथी
व्यंगचित्राचे बादशहा व COMMON MAN चे जनक R .K LAXMAN यांचे २६ जानेवारी, २०१५ रोजी दुखद निधन झाले .
व्यंगचित्रांच्या माध्यमांद्वारे, त्यांनी अनेक प्रश्नांवर ज्याप्रकारे आवाज उठवला होता त्याला तोड नव्हती.
बहुसंख्य वाचक " महाराष्ट्र टाईम्स " व " THE TIMES OF INDIA " हि वृत्तपत्रे वाचताना सर्वप्रथम R .K LAXMAN यांचे व्यंगचित्र वाचत असत .
त्यांनी त्यांच्या व्यंगचित्रात कधीही , कोणाचे पोट ट मोठ्ठे , कोणाचे नाक मोठ्ठे , कोणाचे कान मोठ्ठे , वगैरे दाखवून , ओढून , ताणून विनोद निर्मिती केली नव्हती .
त्यांच्या व्यंगचित्रांची काही मला कळलेली वैशिष्ट्ये , छोटासा आशय पण फार मोठ्ठा संदेश , त्यांच्या प्रत्येक छायाचित्रात त्यांचा COMMON MAN असणे , त्यांच्या व्यंगचित्रातील व्यक्तिरेखांच्या चेहऱ्यावरील हावभाव बऱ्याच गोष्टी सांगून जायच्या , अतिशय ताज्या अश्या राजकीय , सामाजिक घडामोडींवर ते लगेचच व्यंगचित्रे रेखाटायचे . त्यांनी कधीही व्यंगचित्र निर्माण करताना उच्च दर्जा नाही सोडला .
माझ्या मते त्यांची व्यंगचित्रे हि उपहासात्मक ( म्हणजेच आजच्या शुद्ध मराठीत satiristic / full of SATIRE अशी होती )
त्यांची व्यंगचित्रे आजच्या सामाजिक , राजकीय गोष्टींना देखील चपखल पणे लागू होतात.
त्यांच्याच काही व्यंगचित्रांनी त्यांची आठवण जागविण्याचा  एक प्रयत्न. 





Wednesday, January 24, 2018

आरोग्य यंत्रणेने घेतला चिमुकल्याचा बळी - थरारून सोडणारी बातमी.......

थरारून सोडणारी बातमी.......
        मी आजवर अनेक थरारक बातम्या लिहल्या आहेत. अंडरवर्ल्ड, खून, बलात्कार, दरोडा, अपघात अशा घटनांचे वृत्तांकन केले आहे. परंतु कधीही बातमी लिहतांना हात थरथरला नाही की मन डगमगलं नाही. पण परवा मुंबई पोलीस दलात वाहतूक पोलीस असलेल्या संदीप सुर्वे यांची व्यथा ऐकून मन थरारून गेलं. मन थरारलं ते एक पत्रकार म्हणून नव्हे तर एक बाप म्हणून.!!!  मीच काय पण संदीप सुर्वे यांची व्यथा ऐकून कुठलाही बाप थरारल्या शिवाय राहणार नाही.
       संदीप सुर्वे यांचा सात वर्षांचा चिमुरडा नाताळाच्या सुट्टीत मामाच्या गावी जायला मिळेल म्हणून खूप आनंदी होता. एकुलता एक मुलगा असल्याने आई बाबा त्याचे नेहमीच हट्ट पुरवायचे. तसाच सुट्टीत गावी जाण्याचा हट्ट देखील बाबांनी पुरवला. बाबांबरोबर गावी जातांना त्या चिमुकल्याचा आनंद गगनात मावत नव्हता. मला मामाच्या गावी खूप खूप खेळायचंय असं म्हणत तो चिमुकला गावी पोचताच खेळण्यास अंगणात गेला. अंगणात खेळत असतांनाच एका पिसाळलेल्या कुत्र्याने त्या चिमुकल्याचा चावा घेतला अन ही छोटीशी घटनाच त्या चिमुकल्या जीवाची हेळसांड करण्यास कारणीभूत ठरली. कुत्र्याने चावा घेतल्या नंतर त्या चिमुकल्या मुलास योग्य वैद्यकीय उपचार मिळाला नाही. वेदनेने कळवळत असलेल्या आपल्या बाळास घेवून त्याचे आई बाबा अख्या मुंबईभरचे मोठमोठे हॉस्पिटल फिरत होते. मात्र त्या चिमुकल्याला कुठल्याही हॉस्पिटलवाल्यांनी दाखल करून घेतले नाही.
      देशाची आर्थिक राजधानी, जगातील आघाडीची स्मार्ट मेट्रो सिटी अशी बिरुद मिरवणाऱ्या शहरातील त्या हॉस्पिटलवाल्यांकडे एकच कारण होते ते म्हणजे आमच्याकडे रेबीज वरील औषधे उपलब्ध नाहीत तर कुणी म्हणत होते आमच्याकडे बेड उपलब्ध नाही. त्या जीवाची ही हेळसांड सतत सात तास सुरु होती. अखेर त्या चिमुकल्याने अक्षरशः आपल्या आई बाबांच्या मांडीवर तळमळत जीव सोडला....पण त्या आई बाबांची आर्तहाक त्या सफेद कापड्यातल्या डॉक्टरांपर्यंत पोहचली नाही. त्या चिमुकल्याने जीव सोडल्यानंतर देखील तब्बल अडीच तास हॉस्पिटलवाल्यांनी तो गेलाय असे सांगितले नाही. हतबल झालेले आई बाबा आपल्या चिमुकल्याच्या निर्जीव शरीरा सोबत अडीच तास बोलत होते. त्याला उठवत होते.... तुला हे घेवून देवू ते घेवून देवू असे सांगत होते. परंतु अखेर त्यांचा बाळ उठलाच नाही.
        डॉक्टर हा पृथ्वीवरचा देव असतो असे म्हणतात पण खरंच देव इतका निष्ठुर असतो का? ज्यांच्या डोळ्यादेखत एका निरागस चिमुकल्याने तळमळत जीव सोडावा अन देवाने त्यास वाचवण्यासाठी कुठलेही प्रयत्न करू नये? अशा मुर्दाड लोकांना डॉक्टर तरी म्हणावे का, असा प्रश्न पडतो. एका हॉस्पिटलने तर हे कारण सांगून टाकले कि, आमच्याकडे मुलास ऍडमिट करून घेण्यासाठी बेडच शिल्लक नाही. खरंच या बड्या शहरात एका मुलाच्या जीवाची किंमत एका बेड पेक्षा स्वस्त आहे का?
- नरेंद्र राठोड,

चिंचवड मध्ये भटक्या कुत्र्यांचा तब्बल १७ जणांवर हल्ला

" चिंचवड मध्ये भटक्या कुत्र्यांचा तब्बल १७ जणांवर हल्ला " 

अरे बापरे म्हणजे " पुणे " या जगापासून वेगळ्या असलेल्या शहरात देखील भटके कुत्रे मानव प्राण्यांना चावतात ? मागे एका  वृत्तवाहिनीच्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासावरील थेट प्रक्षेपणाच्या कार्यक्रमात पुण्याच्या एका श्वानप्रेमी डॉक्टरांनी माझा मुद्दा खोडताना  असे सांगितले होते कि त्यांना भटके कुत्रे हे मानव प्राण्यांना चावतात हे माहीतच नाही . त्यांच्या म्हणण्यानुसार निदान पुण्यात तरी अश्या श्वानदंशाच्या घटना घडतच  नाहीत . 

असो , हि बातमी बुधवार, २४ जानेवारी, २०१८ च्या " नवाकाळ " या एका सुप्रसिद्ध मराठी दैनिकांमध्ये मुखपृष्ठावर छापून आली आहे . 

गम्मत म्हणजे श्वानदंशग्रस्त अगदी शांतपणे हे असे अनेक श्वानदंश मुकाट्याने सहन करीत आहेत. 

काय म्हणालात ? तुम्हाला अजूनही श्वान दंश झाला नाही ? अहो  या भ्रमात राहू नकात . भरमसाठ संख्येने वाढलेल्या श्वान संख्येकृपेने व स्थानिक शासनाच्या निष्क्रियतेमुळे तुम्हाला , तुमच्या कुटुंबाला , तुमच्या मुला बाळांना , तुमच्या आप्त स्वकीयांना देखील हा श्वान दंश रुपी प्रसाद कधीही मिळू शकेल . 

मानव प्राणी मरो , भटका कुत्रा मात्र जगो ! 



Sunday, January 21, 2018

स्मार्ट ठाणे - सायकल सेवा - वस्तुस्थिती

" स्मार्ट ठाणे - सायकल सेवा - वस्तुस्थिती "

ठाणे हे शहर बऱ्याच गोष्टीत " SMART CITY " आहे . काय म्हणालात , मी सकाळी सकाळी मस्करी करतो ?

अहो मी अशी मस्करी का करीन ?

शनिवार, २० जानेवारी , २०१८ च्या " लोकसत्ता " या दैनिकातील हि बातमी वाचा , मगच तुम्हाला कळेल कि " SMART CITY " म्हणजे काय .

व्यवस्थित सांगतो . आहो एखाद्या योजनेचे गाजा वाजा करून जर उदघाटन झाले . प्रत्येक प्रसार माध्यमातून मोठं मोठ्या बातम्या छापून आल्या , त्यावर सामान्य नागरिकांचा कररुपी पैसे देखील खर्च झाला. राजकीय पक्ष्याने त्या योजनेचे श्रेय देखील वाजत गाजत , मोठ्ठी फलके ( HOARDINGS ) लावून घेतलं . पण आजमितीला काय वस्तुस्थिती आहे हे दाखविणारी हि बातमी .
ठाणे - एक SMART CITY मधील " आजची सत्यस्थिती "

मग काय ? आहे कि नाही " ठाणे - एक SMART CITY ? ".

बोला , मेरा भारत महान !


Son dies of rabies as cop made to run around hospitals for bed

Son dies of rabies as cop made to run around hospitals for bed
Ahmed.Ali@timesgroup.com
Mumbai: City traffic constable Sandeep Surve lost his seven-year-old son to rabies early on Friday despite ensuring he got all the vaccines after a rabid dog bit him on December 26. What came as a double-whammy for Surve was the difficulty in getting a hospital bed for his only son Arnav—in seven hours from 8.30pm on Thursday he went through four hospitals.
Surve finally called the main police control room and DCP Rashmi Karandikar intervened to get a bed for the child in the civic-run Nair Hospital, Agripada, around 3.30am on Friday. The child was declared dead half an hour later. “For the first time, I realized how difficult life is for the common man,” said Surve. “Precious time was wasted because no one detected rabies and gave different medicines. I am hurt that government hospitals such as Kasturba and Nair don’t have treatment and, above all, they refused to even admit Arnav,” said Surve who said he wants to take legal action against doctors.
Rabies is a highly infectious disease that is almost always fatal; only six patients across the world have been documented to have survived it.
Boy was bitten by dog during his Karjat visit
In fact, Nair Hospital didn’t conduct Arnav’s postmortem because of the infectious nature of the virus. “Our PICU where Arnav was admitted for a short time had to be fumigated to limit exposure to other patients,” said a senior doctor.
Arnav, a student of Thane Police school in Kalwa, was bitten by a rabid dog on his face and body when he visited his grandparents’ home in Karjat on December 26. “He was immediately taken to Khopoli public hospital, but it didn’t have anti-rabies injections,” said Surve’s friend Manoj Mane. Arnav was then taken to Khopoli Nursing Home where he stayed for a few days.
Arnav resumed school, but got fever on January 14. He was taken to Shreenika Hospital in Thane where he was given medication for viral fever. The family took him to Samarth Hospital the next day where Mane said he was treated for tonsilitis and discharged the next day. When contacted, Dr Rajan Relekar of Samarth Hospital said he had advised the family to take their child to a pediatrician. “The child had obvious bite marks on his face and we had given him a part of the rabies shot regimen as well, so why would we say tonsilitis?” he said.
The Surves took Arnav to Shreenika Hospital on January 17 (Wednesday). “This hospital also failed to identify the rabies fever and discharged him in a day and asked us to take him to some big hospital without telling us what was wrong,” said Surve. When contacted, Dr Neeta Adsul from Shreenika Hospital said the child came walking to the hospital. “The next morning, he spoke to my nurses and asked for coffee and for the bedsheets to be changed,” she said. It was only after vomiting around noon that his condition began to deteriorate. “He was increasingly drowsy, prompting us to recommend that he be moved to a big hospital,” she said, adding that her nursing home didn’t have an ICU or a ventilator facility.
It was 8.30pm on Thursday when the Surves left Shreenika Hospital for Fortis Hospital in Mulund, but they refused to admit him. A Fortis Hospital spokesperson told TOI: “Fortis does not have the facility to treat rabies. The patient was taken to Kasturba Hospital for immediate specific treatment in a private ambulance arranged by Fortis Hospital.”
At the BMC-run Kasturba Hospital near Arthur Road Jail, the doctors asked them to rush to Nair Hospital near Mumbai Central. “We rushed to Nair but they too refused. I got so tired that I called up the main control room,” said Surve. Kasturba is affiliated to Nair Hospital and all serious cases are rushed to the latter hospital, which is bigger.
When contacted, Nair Hospital dean Dr Ramesh Bharmal denied there was any delay in admitting the child. “I got a call from a former colleague about the child and had instructed my staff to attend to him immediately,” said Dr Bharmal. He said the child’s initial treatment had left a lot to be desired. Another doctor said that there had been a delay in the child getting the immunoglobulin shot.
Infectious diseases specialist Dr Om Shrivastav told TOI: “Once bitten, the virus travels from the site to the brain in a fixed period of time. It could take a few hours if it is closer to the brain or could take weeks if the bite is near the feet.”

(With inputs by Malathy Iyer)



ठाणेकर सापडले भटक्या कुत्र्यांच्या दहशतीत


" ठाणेकर सापडले भटक्या कुत्र्यांच्या दहशतीत "

STRAY DOG MENACE - NEWS ARTICLE in MAJHA MAHARASHTRA
We should understand the seriousness of this issue and help HUMANS from RABIES.




" फेसबुक , whatsapp वरील संदेश , सुविचार , POST "

नमस्कार ,
" फेसबुक , whatsapp वरील संदेश , सुविचार , POST "
फेसबुक त्याचप्रमाणे whatsapp वर येणारे अनेक संदेश , सुविचार , POST हे पाहून हि छोटीशी कविता सुचली.
माझ्या नावातच सत्य असल्याने खरं सांगतो , हि कविता मी स्वतः लिहिलेली आहे , ज्यात माझी कल्पना शक्ती आहे , व कोणाचीही चोरलेली नाही अथवा रीत ( FASHION ) म्हणून तर अजिबातच येथे देत नाही.
मी का कवितेला एक उपहासात्मक ( ज्याला आजच्या शुद्ध मराठीत SATIRE असे म्हणतात ) कविता म्हणतो.
वाचा , विचार करा .
" संदेश , सुविचार , POST "
संदेश असा असावा
जो स्वतः लिहिलेला असावा
कोणाकडून आलेला तो नसावा ।। १ ।।
सुविचार हा असा असावा
जो दुसऱ्याने पाठविलेला नसावा
रीत ( FASHION ) म्हणून तर तो अजिबात नसावा ।। २ ।।
POST हि अशी असावी
ज्यात स्वतःची कल्पनाशक्ती दिसावी
कोणाचीतरी चोरलेली नसावी ।। ३ ।।

Saturday, January 20, 2018

एका वर्षातील दुसरा " दिवाळी सण " ( दीपावली )

एका वर्षातील दुसरा " दिवाळी सण " ( दीपावली )
गम्मत पहा गणेशोत्स्तव हा दरवर्षी एकदा भाद्रपद महिन्यात साजरा केला जातो व दुसऱ्यांदा माघी गणेशोत्स्तव असा दुसऱ्यांदा साजरा केला जातो . त्याच प्रमाणे नवरात्र हा सण वर्षातून दोनदा आश्विन (शारदीय) महानवरात्र व चैत्र (वासंती) नवरात्र , असा साजरा केला जातो .
आम्ही अतिशय सुदैवी आहोत कि आम्हाला वर्षातून दोनदा दीपावली म्हणजेच दिवाळी साजरी करायला मिळते . अहो असं वैतागू नकात . मी काही खोटं नाही बोलत . दरवर्षी हिंदू कार्तिक महिन्यात दीपावली हा पारंपरिक सण साजरा केला जातो , त्याचप्रमाणे आम्ही देखील वर्षातून एकदा कार्तिक महिन्यात दिवाळी सण साजरा करतो . पारंपरिक पद्धतीने आम्ही देखील दिव्यांची आरास करतो , आकाश कंदील लावतो . सारा परिसर हा " प्रकाश " मय झालेला असतो . सगळीकडे वातावरण उत्साहवर्धक झालेले असते . पण दुर्दैवाने हा सण एका वर्षातून फक्त एकदाच येतो .
पण आम्हाला मात्र वर्षातून दुसऱ्यांदा दिवाळी साजरा करण्याची संधी आमच्या सुदैवाने मिळते . त्या दुसऱ्या दिवाळीला मात्र सारा परिसर हा " प्रकाश " मय झालेला नसतो , पण आमच्या घरातील वातावरण हे " प्रकाश भाऊ आमटे " मय व " मंदा ताई आमटे " मय झालेले असते .
या वर्षातील आमच्या घरातील दुसरा " दिवाळी " हा सण शनिवार , १९ जानेवारी, २०१८ रोजी साजरा झाला . आमच्या घरातील वातावरण " प्रकाश भाऊ आमटे " मय व " मंदा ताई आमटे " मय कसे झाले होते ते या छायाचित्रातून दिसून येते .
मला येथे आवर्जून काही गोष्टी नमूद कराव्याश्या वाटतात .
प्रकाश भाऊ व मंदा ताई , यांचे कार्य तर अफाट , अवर्णनीय आहेच , प्रकाश भाऊ यांच्यावरील चित्रपटानंतर तर ते जोडपं अगदी घरा-घरात पोहोचले आहे . प्रसिद्धीच्या एवढं शिखरावर असून देखील , हे जोडपं अजूनही जमिनीवर आहे . साधी राहणी , उच्च विचारसरणी हे तर त्यांचे आपण सर्वांनी आवर्जून अंमलात आणण्यासारखे गुण आहेत. प्रकाश भाऊ , हेमलकसा येथे ज्याप्रमाणे बनियन व एका चड्डीत राहतात ( HALF PANT ) तसेच ते राहतात . त्या दोघांच्या चपला देखील अतिशय साध्या असतात .
दोंघांचे ही खाणं एवढं साधं त्याचप्रमाणे मोजून मापून आहे कि माझ्या सारख्या खादाड व्यक्तीला लाज वाटते.
भन्नाट वाचन , अनेक विषयांवरील भन्नाट माहिती , जगात काय काय चालले आहे याची इत्यंभूत माहिती , अतिशय उच्च दर्जाची विनोद बुद्धी , भेटलेल्या व्यक्तींची नावे लक्ष्यात असणे , भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आपुलकीने बोलणे , हे व असे किती तरी गुण सांगण्यासारखे आहेत.
त्यांच्या कडून आम्ही अनेक गोष्टी शिकलो आहोत.
अजून खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत , पण पुन्हा कधी तरी .
आम्हा सगळ्यांना अश्या प्रकारे येणारी दिवाळी वर्षातून अनेक वेळा यावीशी वाटते.
साधू संत येति घरा , तो ची दिवाळी दसरा !



Sunday, January 14, 2018

" भविष्यातील मकर संक्रांतीच्या शुभेच्छा "

" भविष्यातील मकर संक्रांतीच्या शुभेच्छा " 

मराठी भाषिक व्यक्तींना मराठी संभाषनाणात इंग्रजीच्या कुबड्या घ्याव्या लागतात . हे नाही थांबले तर नजीकच्या काळात शुभेच्छा "TAKE तिळ गुळ , AND TALK SWEET SWEET" अश्या देखील दिल्या जातील .
मराठी माणसा , कोठे नेऊन ठेवलेस मराठी भाषेला ?

Monday, January 8, 2018

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा का साजरा करावा लागतो ?

प्रति , 

प्रत्येक मराठी माणूस , आकाशवाणी वर मराठी कार्यक्रम सादर करणारे मराठी भाषिक निवेदक , निवेदिका , मराठी मालिकांचे लेखक , लेखिका , मराठी वृत्त वाहिनीवर मराठी भाषेत बातम्यासादर करणारे मराठी भाषिक पुल्लीगी , स्त्रीलिंगी बातमीदार , दूरचित्रवाहिनींवरील मराठी निवेदक , निवेदिका , . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
नमस्कार , आणि प्रसन्न सकाळ  ,
माझ्या मनातील खंत मी येथे मांडत ( ओकत ) आहे .
असे कळते कि , मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी  भाषेच्या संवर्धनासाठी राज्यभर दि.  ते  १५  जानेवारी २०१८  हा कालावधी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडाम्हणून साजरा करण्याच्याशासनाने निर्णय घेतलेला आहे. (  हि माहिती  https://dioparbhaninews.blogspot.in/2017/12/1-15.html  येथे पाहू शकता ) 

माझ्या माहितीप्रमाणे दरवर्षी महाराष्ट्र शासनातर्फे दि.  ते  १५  जानेवारी  हा कालावधी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडाम्हणून साजरा केला आहे .  

लक्ष्यात घ्या कि मराठी मातीतच, मराठी भाषेचे संवर्धन करावे  लागते , यातच सगळं सामावलं आहेतामिळनाडू मध्ये कधीही तामिळ भाषेचे , गुजरात मध्ये कधीही गुजराथी भाषेचे , जर्मनी मध्ये जर्मन भाषेचे ,चीन मध्ये चिनी भाषेचे , , . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .  कधीही संवर्धन आठवडा , पंधरवडा , महिना वगैरे साजरा करून भाषेचे संवर्धन , पुनर्रुजीवन केलेले कधी ऐकिवा नाही .
मग मराठी भाषेलाच ते सुद्धा मराठीच्या मायभूमीत असे करण्याची का निकड भासते याचा कधी तरी मराठी माणसाने विचार केला आहे ? 

याचे कारण एकदम सोप्प आहे ( हेच वाक्य मराठी माणूस कसे बोलेल ते पहा " याचे REASON ( कारण ) एकदम SIMPLE ( सोप्प ) आहे " ) 

माझे हेच म्हणणे आहे की , दोन / अनेक मराठी व्यक्ती अव्यावसायि कामासाठी  एकत्र जमतात , तेंव्हा देखील ते संभाषणात शक्य तितके शुद्ध मराठी शब्दवाक्ये का नाही वापरत ? दुसरा हसेल म्हणू ? याचा अर्थ अश्या व्यक्तींना स्वतःच्या आई ची देखील लाज वाटते ? अहो मराठी हिआपली मातृ भाषा आहेया भाषेत बोलताना इंग्रजी शब्द , इंग्रजी वाक्ये याचा का हो भरमसाठ वापर करायचा ? 

आजकाल , आकाशवाणी वरील मराठी कार्यक्रम , दूरदर्शनवरील मराठी कार्यक्रम , मराठी मालिका , मराठी बातम्या , मराठी जाहिराती , या  इतर अनेक ठिकाणी इंग्रजीचे यावह असे अतिक्रमण झाले आहेजसा संगणकात जंतू ( VIRUS शिरतो अथवा शरीरात कर्करोगाचा  ( CANCER चा जंतू शिरतो ,  सगळ्याचा नायनाट करतो , तसेच  काहीसे  मराठी भाषेच्या बाबतीत हि झाले आहे.
अहो  आकाशवाणी वरील एका मराठी कार्यक्रमात एका वाक्यात ROMANTIC हा एक इंग्रजी शब्द त्याच प्रमाणे ENJOY हा एक इंग्रजी शब्द ऐकला आणि मला राहवलं नाही म्हणून हेलिहिण्याचा सगळा प्रपंच.
. ) ROMANTIC = शृंगारिक , ( तुम्हाला काय वाटतं कि शृंगार हा ROMANTIC नसतो ?  . ) गाणे ENJOY करा = गाण्याचा आस्वाद लुटा ( तुम्हाला काय वाटतं कि गाण्याचा आवड घेतल्यावर ENJOY करता येत नाही ? )
अहो तुम्हाला जर झुणका भाकर खायची आहे आणि झुणका BREAD , दिल तर कसं वाटेल ?
फेसबुक वर एक शुद्ध मराठी आडनाव असलेल्या स्त्रीलिंगी व्यक्तीने मराठीत लिहिले होते त्यातील काही वाक्ये येथे देत आहे " मला आणि माझ्या मिस्टरांना ( नवऱ्याला ) माझ्या SCHOOL  ( शाळे )  मध्ये CHIEF GUEST ( प्रमुख पाहुणे ) म्हणून INVITE केलं  ( आमंत्रित केलं  )  होत.. फारच TOUCHY EXPERIENCE ( हृदयस्पर्शी अनुभव ) होता. " .  ती स्त्रीलिंगी व्यक्ती  मराठी माध्यमातील शाळेतच शिकली होती .  अहो नवऱ्याला मिस्टर म्हटल्यावर तो काय जगा वेगळा ठरतो ?  
अहो कधी तरी तुम्ही दोन व्यक्तींना इंग्रजी बोलताना 
. ) COME ON WE WILL GO FOR नाश्ता / जेवण                                                                                                                                                                                                  . ) I WILL DROP   YOU घरी ........ वगैरे असे ऐकले आहे ? नाही ना ? मग मराठी माणसालाचमराठी माणसात , १० % मराठी बोलण्याची लाज का वाटते ? का मराठीत शब्द नाहीत ? हो मराठी सारखी प्रघल्भ  गोड भाषा नाही . का हो मराठी माणसाला मराठी बोलताना इंग्रजी शब्द , इंग्रजी वाक्ये याच्या सदा  दा कुबड्या घ्याव्या लागतात ?
असं तर नाही ना कि शुद्ध मराठी बोलणे अश्या मराठी व्यक्तींना कमी प्रतिष्ठेचे ( BELOW DIGNITY ) वाटतं कि काय ?
एक शेवटचे , हे सगळं मी एक अमराठी माणूस असून देखील हि  मला वाईट वाटते . 
भविष्यात बहुतेक मराठी भाषिक त्यांच्या पुढच्या पिढीला ( NEXT GENERATION ) ला माझ्या सारख्या एखाद्या अमराठी व्यक्ती कडे शुद्ध मराठी शिकण्यासाठी शिकवणी ( TUITION  )लावतील . 
इंग्रजी शब्दांना समानार्थी मराठी शब्द हवे असतील तर मला विचारा , माझ्या पोतडीत  नेहमी वापरल्या जाणाऱ्या अंदाजे ४००० इंग्रजी शब्दांचे समानार्थी मराठी शब्द आहेत.
पुन्हा आपल्या सगळ्यांना कळ कळीची व नम्र विनंती आहे कि मराठी त बोला , मराठीत लिहा , मराठीला जगवा ,

आपला कृपाभिलाषी ,
सत्यजीत  शाह - ठाणे
०९८२११५०८५८