" भटका कुत्रा चावल्याने वाडा येथील शिवाजीनगर मधील , प्रणित मुकेश पाटील या आठ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू " .
कोठे गेले प्राणी मित्र ? कोठे गेल्या प्राणी मैत्रिणी ?
२८ जुलै, २०१७ च्या " ठाणे वैभव " या ठाणे येथून प्रसिद्ध होणाऱ्या एका प्रतिष्ठित वृत्तपत्रातील हृदयद्रावक बातमी वाचा.
गम्मत म्हणजे हा असा शेरा मारणारी व्यक्ती " पुणे " नावाच्या एका शहरात राहते .
असा हा शेरा / प्रतिक्रिया देणाऱ्या निरागस , अज्ञानी पण वयाने प्रौढ असलेल्या व्यक्तींची मला किंव येते .
खालील आकडेवारी कृपया वाचा :
- "महाराष्ट्र " या राज्यात दररोज अंदाजे ७,७७७ मानव प्राण्यांना श्वान दंश होतो
- "भारत" या देशात दररोज अंदाजे १,४१,९६० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो .
- श्वानदंशाच्या घटनांमधील अंदाजे ८० % घटनांमध्ये ३ ते ८ या वयोगटातील बालके सापडतात.
- कुत्रीला वर्षातून दोनदा पिल्ले होऊ शकतात .
- कुत्री एका वेळी अंदाजे १२ पिल्ले देते . म्हणजे दरवर्षी अंदाजे २४ पिल्ले जन्माला घालते . त्यातील फॆ निम्मी पिल्लेच जगतात . म्हणजे एक कुत्री दरवर्षी अंदाजे १२ पिल्ले जन्माला घालते . व या प्रकारे भटक्या कुत्र्यांची संख्या हि भरमसाठ वेगाने वाढत जात आहे.
माझी प्रत्येक " भारतीयाला " नम्र विनंती आहे कि स्वतःला , स्वतःच्या कुटुंबियांना , स्वतःच्या आप्तेष्टांना श्वानदंश होण्याची वाट पाहू नकात .
No comments:
Post a Comment