" नो पार्किंग " व " पार्किंग " फलक एकाच ठिकाणी - एक जागतिक आश्चर्य
शुक्रवार , ८ जुलै, २०१७ रोजी सायंकाळी एक जगावेगळी व अजब गोष्ट " ठाणे " शहरातील , ठाणे महानगर पालिकेच्या मुख्यालयाच्या समोरच्या रस्त्यावर पाहिली.
या ई मेल सोबत जोडलेली हि छायाचित्रे कृपया ध्यान देऊन पहा . डावीकडे एक " नो पार्किंग " चा फलक दिसत आहे त्यावर ठा म पा असे वर लिहिलेले दिसत आहे व खाली दोन्ही बाजूला ५० M असे बाणाने दर्शविले आहे . याचा अर्थ त्या फलकाच्या दोन्ही बाजूला ५० मीटर अंतरापर्यंत गाड्या लावू नये असा निघतो .
त्या " नो पार्किंग " च्या फलकांच्या उजव्या हाताला अंदाजे ३ मीटर अंतरावर एक "पार्किंग" चा फलक लावला आहे . त्यावर चार चाकीच छायाचित्र आहे , व त्यावर नो पार्किंग च्या फलकाच्या दिशेने एक बाण दाखविला आहे . त्यावर TMC असे लिहिले आहे . याचाच अर्थ बाण दाखविला आहे त्या दिशेला चार चाकी गाड्या उभ्या करू शकतो .
हे असे " नो पार्किंग " व " पार्किंग " फलक एकाच ठिकाणी असण्याचा जागतिक विक्रम बहुतेक जगात कोणत्याही शहरात अजूनपर्यंत झाला नसेल. " गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड " यांनी या अश्या अनोख्या जागतिक विक्रमाची जरूर नोंद घ्यावी अशी इच्छा .
म्हणूनच " ठाणे " शहराला बहुतेक " स्मार्ट सिटी " असे म्हणतात का ?
अश्या वेळी वाहन चालकाने वाहन कोठे उभे करावं याबद्दल ठा म पा व ठाणे वाहतूक पोलीस शाखा , आम्हा नागरिकांना मार्गदर्शन करेल का ?
खरं तर ठा म पा कडून जागो जागी गाड्यांना उभे करण्याची ( पार्किंग ची ) सोय उपलब्ध करून देणं गरजेचं आहे , पण त्याचा अभाव असताना या प्रकारे जर नागरिकांना संभ्रमात टाकले तर , नागरिकांनी वाहने कोठे लावायची ?
राजकीय पक्षाचे नेते , कार्यकर्ते हे त्यांच्या राजकीय पक्षांची चिन्ह वाहनांवर लावून अथवा चित्र विचित्र अश्या पद्धतीने वाहन पाटीवर वाहन क्रमांक लिहून कोठेही वाहने उभी करू शकतात , पण नागरिकांनी काय करावे या बद्दल थोडे मार्गदशन कारवाई हि विनंती .
No comments:
Post a Comment