Friday, July 21, 2017

भटक्या कुत्र्यांच्या त्रासाचा प्रश्न येत्या अधिवेशनात

भटक्या कुत्र्यांच्या त्रासाचा प्रश्न येत्या अधिवेशनात

ठाणे शहराचे लाडके व  सुसंस्कृत , सुशिक्षित , समाजकारणी असे आमदार श्री. संजय केळकर ज्यांना आम्ही केळकर साहेब या नावाने संबोधतो ( दादा , नाना , मामा , भाऊ , ...... .... .... .... या अश्या नावाने नाही संबोधत )  ते  माझ्या सारख्या सामान्य पण जागरूक नागरिकांच्या प्रत्येक लढाईत मनापासून साथ देतात व योग्य मार्गदर्शन देखील करतात .

मी गेले ५ ते ६ वर्षे मानव प्राण्यांना अनेक प्रकारे त्रास देणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या , त्याच प्रमाणे अनिर्बंध वेगाने वाढणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येच्या समस्येवर माझ्या लढाईची केळकर साहेबांना इत्यंभूत माहिती आहेच . गेली अंदाजे ३ ते ४ महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अधिवेशनात हा प्रश्न मांडण्याच्या प्रयत्नांना केळकर साहेबांना यश येत नव्हते .

येत्या सोमवार पासून सुरु होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अधिवेशनात पुन्हा केळकर साहेब हा अतिशय महत्वाचा प्रश्न मांडणार आहेत . त्या बद्दल सांगण्यासाठी व त्याचप्रमाणे या लढाईत मी पुढे कसे काय मार्गक्रमण करायचे याचे योग्य मार्गदर्शन करण्यासाठी केळकर साहेबांनी मला गुरुवार , २० जुलै , २०१७ त्यांच्या कार्यालयात बोलावले होते . त्यांनी  मधल्या काळात   या प्रश्नाबद्दल  जमा केलेली माहिती पाहून मला केळकर साहेबांचे फार कौतुक वाटले.

तुम्हीच सांगा कि या आजच्या युगात कोण आमदार माझ्या सारख्या सामान्य नागरिकाला ला लढाईत योग्य मार्गदर्शन करण्यासाठी स्वतःहून बोलावतो ?

असेच समाजकारणी आमदार , खासदार जर भारत देशात सगळीकडे  असतील तर भारत देश  खरचं  जागतिक पातळीवर फार पुढे जाऊ शकतो  .

आपल्याला मी या भटक्या कुत्र्यांमुळे मानवाला  भोगाव्या लागणाऱ्या  समस्येविषयी थोडक्यात सांगतो :  

- ठाणे शहरात दररोज अंदाजे ६० ते ८० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो .
- महाराष्ट्र या राज्यात  दररोज अंदाजे ७,७७७ मानव प्राण्यांना श्वान दंश होतो .
- भारत या देशात दररोज अंदाजे १,४२,९६०  मानव प्राण्यांना श्वान दंश होतो .
- श्वान दंशाच्या घटनांपैकी ८० % घटनांमध्ये ३ ते ८ या वयोगटातील बालके सापडतात .
- श्वान दंशावर योग्य वेळेत , योग्य उपचार नाही केले, तर रेबीज हा जीवघेणा आजार होतो , व त्या रेबीज ग्रस्त व्यक्तीचा मृत्यू ओढावतो कारण रेबीज वर औषध नाही .
- कुत्र्यांच्या मल , मूत्रामुळे देखील "लेप्टोस्पायरोसिस" हा एक जीवघेणं आजार देखील होऊ शकतो . - भटक्या कुत्र्यांच्या मागे लागण्यामुळे अनेक अपघात होतात , अनेक मानव प्राण्यांना त्यात जीव देखील गमवावा लागतो .
S
tand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet


No comments:

Post a Comment