Saturday, July 8, 2017

बोलावा विठ्ठल

" बोलावा विठ्ठल "

आषाढी एकादशी आली कि मला वेध लागतात " बोलावा विठ्ठल " , " तीर्थ विठ्ठल " या अश्या भक्ती रसाने ओथंबून भरलेल्या कार्यक्रमाला जाण्याचे .

शुक्रवार , ७ जुलै, २०१७ रोजी , ठाणे पश्चिम येथील गडकरी रंगायतन येथे " बोलावा विठ्ठल " हा कार्यक्रम पाहण्याचे भाग्य मला लाभले.

भक्ती रसात सर्व श्रोत्यांना न्हाऊ घालणारे गायक होते , श्री. आनंद भाटे , पं . श्री. रघुनंदन पणशीकर , श्री. जयतीर्थ मेवुंडी .

कार्यक्रमाची सुरवात या तिन्ही गायकांनी " जय जय रामकृष्ण हरी ..... " या अभंगाने केली .

त्या नंतर , श्री. आनंद भाटे यांनी खालील अभंग गायले ..
- इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी .....
- तीर्थ विठ्ठल , क्षेत्र विठ्ठल .......
- चला पंढरीसी जाऊ ......
- भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ......
- जोहार माय बाप जोहार ..... या अभंगाने त्यांनी शेवट केला .

त्यांनी सगळे अभंग अप्रतिम असे गायले हे काही वेगळं सांगायची गरज मला वाटत नाही .

त्यानंतर मध्यंतर ( म्हणजे आजच्या प्रचलित , शुद्ध मराठीत INTERVAL ) झाले .

मध्यंतरानंतर पं श्री. रघुनंदन पणशीकर यांनी खालील अभंग गायले .
- अहो नारायणा , सांभाळ रे आम्हा दीना .......
- जणी म्हणे पांडुरंगा माझ्या जिव्हीच्या जिवलगा .......
- बोलावा विठ्ठल , पहावा विठ्ठल .......
- पदमनाभा नारायणा .......

पं श्री. रघुनंदन पणशीकर यांना मी पहिल्यांदा ऐकले .
ते स्वर्गीय किशोरी ताई आमोणकर यांचे शिष्य आहेत . त्यांनी देखील आगळे अभंग अप्रतिम असे गायले .

त्यानंतर श्री. जयतीर्थ मेवुंडी यांनी खालील अभंग गायले

- सावळे सुंदर रूप मनोहर .........
- रंगा बारो , पांडुरंग बारो , श्रीरंग बारो .........
- लैणारी लैणारी मागणं देवा .........
- पोटापुरतं देई विठ्ठला .........
- करुणी सौरंगा कृष्णा ......... ( कन्नड अभंग )
- जो भजे हरी को , सदा सो ही करम फल पावे ......... या अभंगाने श्री. जयतीर्थ मेवुंडी यांनी कार्यक्रमाची सांगता केली

त्यांनी सगळे अभंग अप्रतिम असे गायले हे काही वेगळं सांगायची गरज मला वाटत नाही .

एक फार मोठ्ठा आनंद झाला कि सध्या कार्यक्रमात म्हणे रंगमंचावरील गायक फक्त ओठ हलवितात , पण संपूर्ण गाण्याची ध्वनिमुद्रिका लावलेली असतेे असे ऐकिवात आले आहे . हे असे म्हणे मराठवाड्यातील एका कार्यक्रमात मराठीतील सध्याच्या एक सुप्रसिद्ध संगीतकार जोडीने केले होते , त्याच प्रमाणे मध्ये एक कॅनडाचा गायक जस्टीन याने नवी मुंबई येथे एका कार्यक्रमात हेच केले होते असे कळाले होते.

असो या कार्यक्रमात तिन्ही गायक गाणं चालू असताना मध्येच आवाजाच्या पातळीबद्दल काही टिप्पणी करायचे तेंव्हा गाणं थांबलेलं असायचे . याचाच अर्थ गायक स्वतः गात होते.

खरे खुरे अभंग ऐकून भक्ती संगीताने सारेच न्हाऊन गेलो होतो .

या एका मराठमोळ्या कार्यक्रमाला माझा व्यावसायिक भागीदार ( जो तेलगू आहे ) मनापासून आला होता , नुसता आला नव्हता तर त्या अभंगात न्हाऊन गेला होता. त्याचप्रमाणे बऱ्यापैकी कन्नड भाषिक व्यक्ती देखील आले होते.

तळ टीप : वाईट असे वाटले कि तरुण पिढी प्रेक्षक वर्गात अभावाने दिसत होती. तरुण पिढी कार्यक्रमात फक्त ओठ हलविणाऱ्या कॅनडाचा गायक जस्टीन याच्या मागे वेड्यासारखी व हजारो रुपयांची तिकिटं काढून फक्त ओठ हलविताना त्याला पाहायला गर्दी केली होती हे आठविल्यावर देशाच्या भवितव्याची काळजी वाटते.





No comments:

Post a Comment