Saturday, July 22, 2017

फक्त आणि फक्त पोलीस , शासन यांना दूषणं देणं

फक्त आणि फक्त पोलीस , शासन यांना दूषणं देणं
" भारत " या देशातील बहुसंख्य नागरिक कोठेही , कोणतीही अडचण आली तर फक्त , आणि फक्त शासकीय यंत्रणेच्या नावाने बोटं मोडतात , पण एकही व्यक्ती त्या शासकीय यंत्रणेला त्या समस्येची माहिती देखील देत नाही . त्यामुळे तीच समस्या कायमची डोकेदुखी होते आणि मग काय पुन्हा बोटे मोडणे , ( स्वतःच्या ) बायकोसमोर चिडणे , वाहन चालवताना चिडणे या एका चक्रव्यूहातुन सुटका होत नाही .
३/४ दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे ठाणे येथून ऐरोली येथील कार्यालयात , मुलुंड - ऐरोली पुलावरून चार चाकी वाहनाने येत असताना , माझा व्यावसायिक भागीदार त्याची गाडी चालवत होता . त्याने एक वाहतूक नियंत्रक दिवा ( TRAFFIC SIGNAL ) जो लाल झाला होता तो पहिला नाही आणि तो पुढे आला . त्याला म्हटले कि अरे बाबा तू लाल दिवा असतानादेखील तू गाडी न थांबवता पुढे आलास. त्याने त्याचे कारण मला त्याच जागी दुसऱ्या दिवशी आल्यावर दाखवले . त्या ठिकाणी दोन वाहतूक नियंत्रक दिवे होते. एक रस्त्याच्या उजव्या हाताला , रस्ता दुभाजकावर कमी उंचीचा होता व दुसरा रस्त्याला समांतर असा , पण खूप उंचीवर होता. त्या उंचीवर असलेल्या दिव्यावर त्याला लाल दिवा दिसला नाही म्हणून त्याला वाटले कि वाहने जाऊ शकतात म्हणून त्याने वाहन पुढे नेले होते.
त्यानंतर रोज त्या जागी तो मला ते दाखवायचा आणि म्हणायचा कि बघ वाहतूक पोलिसांना तेथे दिवा लागतो कि नाही हे सुद्धा पहायला येत नाही. मी त्याला शांतपणे म्हटलं कि तू एकदा तरी वाहतूक पोलिसींना या बद्दल सांगितले आहे का ? त्याचे उत्तर नाही असे होते.
आज देखील; तेच ठिकाण , तोच संवाद . ( वेळ सकाळचे ९.२५ वाजता ) त्याला म्हटलं गाडी कार्यालयाकडे जाण्यासाठी डावीकडे न वळवता सरळ घे . वाहन सरळ ऐरोली वाहतूक पोलीस कार्यालयात घेतली , तेथे उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिसांना हि गोष्ट सांगितली . त्यांनी सगळं ऐकून घेतलं . ते म्हणाले कि CMS नावाची एक खाजगी संस्था वाहतूक नियंत्रक दिवे पाहतात . त्यांनी आमच्या समोर त्या CMS ला दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला , परंतु होऊ शकला नाही. त्या वाहतूक पोलिसाने माझा संपर्क क्रमांक टिपून घेतला. आम्ही आमच्या कार्यालयात आलो . आमचं दिनक्रम सुरु झाला.
सकाळी १०.१४ मिनिटांनी ऐरोली वाहतूक पोलीस शाखेतील एक पोलीस श्री. गवळी यांनी त्यांच्या भ्रमणध्वनी वरून माझ्याशी संपर्क साधला व असे सांगितले कि CMS या संस्थेतील श्री. सागर यांच्याशी त्यांनी संपर्क साधला आहे . त्या वाहतूक नियंत्रक दिव्यातील एक बल्ब गेला आहे त्यामुळे हा असा घोळ होत आहे . तो वाहतूक नियंत्रकी दिवा खूप उंचीवर असल्याने त्यांना जर आज उंच शिडी मिळाली तर ते आजच नवीन दिवा लावतील अथवा ते काम सोमवारी होईल.
आमची फक्त ५ ते ७ मिनिटे हि तक्रार करण्यात गेली , पण योग्य त्या शासकीय यंत्रणेपर्यंत आम्ही तक्रार पोहचवली व जागरूक नागरिकाचे एक कर्तव्य पार पाडले.
आजच्या घडीला फेसबुक वर " उंटावरून शेळ्या राखणारे अथवा स्वतः काहीच " क्रिया " न करता फक्त आणि फक्त " प्रतिक्रिया " देत बसणारे अनेक थोर " भारतीय नागरिक " आढळुन येतात . गंमत म्हणजे असे अनेक थोर " भारतीय नागरिक " दररोज नित्य नियमाने " GGOD MORNING , GOOD AFTERNOON , GOOD MID AFTERNOON , GOOD EVENING , GOOD NIGHT , GOOD MID NIGHT , GOOD EARLY MORNING " त्यांच्या फेसबुक वर टाकत असतात , त्याचप्रमाणे " सुविचार " देखील न चुकता टाकतात .
असो , समस्या योग्य त्या शासकीय व्यवस्थेकडे पोहचवणे हे जर नागरिकाने केले तर अनेक समस्या गंभीर रूप धारण न करता मिटतील.
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet

No comments:

Post a Comment