Saturday, July 22, 2017

पारंपरिक उत्सव " खड्डा उत्सव "

पारंपरिक उत्सव " खड्डा उत्सव " 

मी राहत असलेल्या  रहिवासी संकुलाच्या म्हणजेच ,  हाईड पार्क या रहिवासी संकुलाच्या जवळील रस्त्यावर  " XXXXXXX " कृपे करून  सालाबादप्रमाणे  " खड्डा उत्सव " या एका पारंपरिक उत्सवास सुरुवात झाली आहे.  " XXXXXXX " कृपे करून म्हणजे  कोणाच्या कृपे करून हे आपल्याला सांगण्याची गरज आहे असे  असे मला वाटतं नाही . 

या " खड्डा उत्सव " चे उदघाटन , ज्या खड्यामुळे झाले त्या बहुमूल्य खड्ड्याचं छायाचित्र टिपण्याची अमूल्य संधी मला मिळाली याबद्दल मी  " XXXXXXX "  यांचे खूप खूप आभारी आहे.  

त्याच सोबत आजून एक दुसरं छायाचित्र जोडलं आहे ते छायाचित्र जर तुम्ही व्यवस्थित निरखून  पहिले तर तुम्हाला असे आढळून येईल कि अजून एका जागी अनेक  उदयोन्मुख खड्डे  जन्म घेण्याच्या तयारीत आहेत . 

हे नवजात खड्डे व ज्या खड्ड्यांनी आमच्या रहिवासी संकुलाच्या जवळील " खड्डा उत्सव " चे उदघाटन केले त्या सर्व खड्ड्यांना पाहण्यासाठी आपण सहकुटुंब , सहपरिवार यावं व आमच्या या " खड्डा उत्सव " ची शोभा वाढवावी हि विनंती .  

हा खड्डा उत्सव अगदी दिवाळी  चालू शकेल याची कृपया नोंद घ्यावी . 

ता.क. : या " खड्डा उत्सव " ला भेट देताना रस्त्यातील अनेक खड्डे कृपया सांभाळून या .  . 



No comments:

Post a Comment