Sunday, June 26, 2016

नीलगायीन्प्रमाणे भटक्या कुत्र्यांवर कारवाई करावी का ? ABP माझा माझा SPECIAL

नमस्कार ,

बुधवार , २२ जून २०१६ रोजी रात्री ८.३० ते ९.०० या वेळेत "ABP माझा" या वृत्तवाहिनीवर " माझा SPECIAL " मध्ये " नीलगायीन्प्रमाणे  भटक्या कुत्र्यांवर कारवाई करावी का ?  " या एका महत्वाच्या विषयावरील थेट चर्चासत्रात ( LIVE DISCUSSION ) मध्ये माझा सहभाग होता.

त्याची ही ध्वनी चित्रफीत ( VIDEO LINK ) .



http://abpmajha.abplive.in/videos/abp-majha-vishesh-should-take-action-on-dogs-241558



" ठाणे वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने तरुणाला जीवनदान "

नमस्कार , सुंदर दुपार ,

" ठाणे वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने तरुणाला जीवनदान "

वाहतूक पोलीस म्हणजे XXXXXX अशीच भावना अनेकांच्या मनात बसलेली असते. त्यांच्या अपार कष्टाकडे कोणीही पाहत नाही . दुखः म्हणजे भारत देशात कोणी चांगली गोष्ट केली तर त्याचे कौतुक ( APPRECIATION ) फार कमी वेळा होते.

असो , ठाणे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी एका दुचाकीवरील अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणास तत्परतेने रुग्णालयात नेऊन त्याला नवं जीवनाची जणू संजीवनीच दिली.

26 जून , 2016 च्या " लोकसत्ता " व " महाराष्ट्र टाईम्स " या वृत्त पात्रातील बातमी येथे देत आहे.

अश्या या वाहतूक पोलिसांना मानाचा सलाम.

कधी तरी पोलीस , वाहतूक पोलिसांना मुद्दाम थांबून धन्यवाद द्या.




Sunday, June 19, 2016

जागरूक आणि जबाबदार वडील - RESPONSIBLE FATHER

नमस्कार ,

जागरूक आणि जबाबदार वडील

शनिवार, १८.०६.२०१६ रोजी सकाळी कार्यालयात जाताना हे छायाचित्र टिपले. 

त्या दुचाकीस्वार गृहस्थांना थाबवून स्वतः व मागे बसलेल्या मुलाला देखील शिरस्त्राण घातल्याबद्दल मनापासून धन्यवाद द्यायचे होते , पण  रस्त्यावर वर्दळ होती म्हणून त्यांना थांबवू  शकलो नाही.

त्या गृहस्थाला मी जागरूक आणि जबाबदार वडील म्हणतो. लहानपणापासूनच मुलाला देखील नियम पाळण्याची शिस्त लागेल.

मला अनेक भारतीयांची कीव येते कारण त्यांच्या वागण्यावरून सहज कळते कि नियम हे फक्त मोडण्यासाठीच असतात.

मी स्वतः २० ते २२ वर्षे दुचाकी चालविली , पण एकदाही विना शिरस्त्राण नाही चालवली.


असो , देवापुढे एकाच मागणे आहे कि भारतीयांना सगळेच नियम पाळण्याची सुबुद्धी दे.

सांगलीमध्ये ( महाराष्ट्र राज्य ) दोन महिन्याच्या बाळावर कुत्र्याने हल्ला केला आहे

नमस्कार , आणि सुंदर संध्याकाळ ,
सांगलीमध्ये ( महाराष्ट्र राज्य ) दोन महिन्याच्या बाळावर कुत्र्याने हल्ला केला आहे
ही खालील बातमी वाचा . अश्या वेळी प्राणी मित्र / प्राणी मैत्रिणी कोठे गायब होतात ( MR. INDIA ) हेच कळत नाही. पण त्या कुत्र्याला जर हाड जरी म्हटलं तरी कोठून पळत येत्तात पोलिसांना बोलवतात हे देखील कळत नाही.

या घटनेस ते बाळ जबाबदार असू शकते कारण त्या बाळाने ( महिन्याच्या ) अगोदर कुत्र्याची छेड काढली असेल अथवा त्या कुत्र्याला दगड मारला असेल , आणि म्हणूनच मग कुत्र्याने त्या महिन्याच्या बाळावर हल्ला केला असे देखील प्राणी मित्र / प्राणी मैत्रिणी म्हणू शकतात. याचे कारण त्यांना हेच एक पाठ केलेले वाक्य कोणत्याही भटक्या कुत्र्यांवरील चर्चेत बोलता येते.

त्यांच्या मते भटके कुत्रे कधीच कोणावर हल्ले करीत नाहीत . कोणाच्याही दुचाकीच्या मागे धावत नाहीत.


कुत्र्याने दोन महिन्याच्या बाळाला तोंडाने ओढत नेले अन्...
Written by  Jai Maharashtra News Sunday, 19 June 2016 17:45
जय महाराष्ट्र न्यूज,  सांगली
सांगलीमध्ये दोन महिन्याच्या बाळावर कुत्र्याने हल्ला केला आहे.
या हल्ल्यात बाळाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
संजय नगर परिसरात ही घटना घडली.
परिसरातील भटका कुत्रा दोन महिन्याच्या बाळाच्या पायाला ओढून नेत होता.
यावेळी नागरिकांनी आरडाओरडा केल्याने मोठा अनर्थ टळला.




Saturday, June 18, 2016

पितृ दिन ( FATHER 'S DAY ) - एक सत्यावलोकन

नमस्कार , आणि प्रसन्न  सकाळ   ,

 पितृ दिन  (   FATHER 'S DAY ) - एक सत्यावलोकन

आज जागतिक पितृ दिन  , म्हणजेच आजच्या शुद्ध मराठी भाषेत ( FATHER 'S DAY ) ,

पाश्चात्य देशात भेट वस्तू , शुभेच्छा  पत्रे व अश्या तत्सम वस्तूंची विक्री फक्त नाताळ ( आजच्या मराठीत CHRISTMAS )  मध्येच होत होती . बाकी वर्षभर फक्त वाढदिवस , लग्नाचा वाढदिवस अ अश्या काही ठराविक दिवशीच होत होती . असे वाचण्यात आले  कि पाश्चात्य देशातील हुशार व्यापाऱ्यांनी या भेट वस्तूंचा , शुभेच्छा  पत्रे व अश्या तत्सम वस्तूंची  वर्षभर विक्री व्हावी म्हणून एक अफलातून युक्ती लढवली. त्यांनी MOTHER’s DAY , FATHER’s DAY , BROTHER’s DAY , SISTER’s DAY , TEACHER’s DAY ,  …….   असे वेग वेगळे दिवस साजरे करण्याची टूम काढली व ती तेथील जन माणसात जाहिरातींद्वारे रुजवली. 

माझ्या मते पाश्चात्य देशात बहुतेक  STEP MOTHER’s DAY , STEP FATHER’s DAY , STEP BROTHER’s DAY , STEP SISTER’s DAY ,  CURRENT GIRL / BOY FRIEND’s DAY ,  EX- GIRL / BOY FRIEND’s DAY , FIRST DIVORCE DAY , SECOND  DIVORCE DAY    ......……. असेही दिवस बहतेक साजरे केले जात असतील.

असो , भारतीय तसे अनुकरण प्रिय आहेत  हे ओळखून भारतातील हुशार व्यापाऱ्यांनी  पाश्चात्यांची हि युक्ती ताबडतोब उचलली अथवा पाश्चात्य देशातील व्यापाऱ्यांनी भारतीय व्यापाऱ्यांच्या गळी हि संकल्पना रुजवली आणि  भारतीय नागरिकांनी ती ताबडतोब डोक्यावर घेतली.

मी माझ्या अनुभवावरून  सांगतो कि माझे वडील मी २२ वर्षाचा होतो तेंव्हाच देवाघरी गेले , पण त्यांच्या हयातीत मी ना त्यांची कदर केली , ना त्यांना कधी पुत्र सुख दिले . त्यांच्या पश्चात मी रोज त्यांची आठवण काढून रडतो , पण मला हि अशी FATHER’s DAY , MOTHER’s DAY  वगैरे तोंड देखली नाटके करणे योग्य वाटत नाही.

आजच्या  घडीला अनेक आई , वडील वृद्धाश्रमात रहात आहेत , कारण त्यांची मुले , मुली परदेशात वास्तव्य करीत आहेत. आणि गम्मत म्हणजे ती मुले , मुली परदेशात FATHER’s DAY , MOTHER’s DAY मात्र मित्र , मैत्रिणींबरोबर धुमधडाक्यात साजरे करतात .

असो या सगळ्या वर माझ्या कडून  “ मातृ दिन , पितृ दिन  (  MOTHER 'S DAY , FATHER 'S DAY ) “    पूर्वीच लिहिली गेली ती येथे देत आहे ( मी येथे नमूद करू इच्छितो कि हि कविता मी कोणाचीही चोरलेली नाही व स्वतः लिहिलेली आहे ) .

असे अनेक दिन आज-काल साजरा करण्याची व पाश्चात्यांचे अनुकरण करण्याची भारतीयांना एक वाईट सवय लागली आहे.

यातले किती  भारतीय , रोज आपल्या जन्मदात्यांच्या पाया पडतात ? ( चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतात ? )  

यातले किती  भारतीय , रोज महिलांना मानाने वागवितात ?


या सगळ्या ढोंगी पणाचा राग ( सौम्य स्वरुपात )   या कवितेत व्यक्त झाला आहे. 


Friday, June 17, 2016

भटक्या कुत्र्यांनी कोठे नेउन ठेवले औरंगाबादला ?

नमस्कार , सुंदर संध्याकाळ ,

"  भटक्या कुत्र्यांनी कोठे नेउन ठेवले  औरंगाबादला ? "

१४ व १५ जून, २०१६ रोजी व्यावसायिक कामासाठी महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद या शहरात गेलो होतो. 

१२  जून , २०१६ च्या " लोकमत  " या औरंगाबादहून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रातील दोन बातम्या येथे देत आहे .त्याचप्रमाणे दुसऱ्या एका वर्तमान पत्रातील देखील  एक बातमी देखील येथे देत आहे.

- शुक्रवार , १० जून , २०१६ रोजी ५ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला . .
- शुक्रवार , १० जून , २०१६ रोजी , वेगळ्या भागात ९  जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला.
- शनिवार ,, ११ जून, २०१६ रोजी , १२ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला.
- मंगळवारी रात्री भटका कुत्रा / कुत्रे विमानतळाच्या धावपट्टीवर धावल्याने एयर इंडियाचे विमान उशिरा उडाले ,
- विमानतळावर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावला .

हे सगळ काय सांगते ?

अजूनही तुम्हाला वाटते कि भटक्या कुत्र्यांची संख्या भरमसाठ वेगाने वाढत नाही ?

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !






दापोलीत भटक्या कुत्र्याने घेतला २३ जणांना चावा - 23 STRAY DOG BITES IN DAPOLI

नमस्कार , सुंदर संध्याकाळ ,

" दापोलीत भटक्या कुत्र्याने घेतला २३ जणांना चावा "

१५  जून, २०१६ च्या " नवाकाळ " या वृत्तपत्रातील बातमी येथे देत आहे.

किती दिवस तुम्ही श्वान दान्शाविरहित राहणार आहात ?

झोपेचे सोंग घेऊन झोपलेल्या भारतीय नागरिकांना जागे करण्याचा प्रयत्न करीत आहे.

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !



Monday, June 13, 2016

"भटक्या कुत्र्याने घेतला पाच मुलांना चावा" सोमवार, १३.०६.२०१६ ठाणे वैभव

नमस्कार ,

"भटक्या कुत्र्याने घेतला पाच मुलांना चावा"

सोमवार, १३.०६.२०१६ च्या " ठाणे वैभव " या वृत्तपत्रातील मुखपृष्ठावरील बातमी येथे देत आहे.

या वेगाने जर श्वान दंश होत राहिले , तर तो दिवस दूर नाही , भारत या देशातील प्रत्येक नागरिकाला भटका कुत्रा चावलेला असेल.

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !





Saturday, June 11, 2016

कल्याणात भटक्या कुत्र्यांचा ५ मुलांना चावा

नमस्कार , सुंदर सकाळ ,

कल्याणात भटक्या कुत्र्यांचा ५ मुलांना चावा

रविवार, १२ जून, २०१६ च्या " नवा काळ " या दैनिकातील हि बातमी येथे देत आहे . या बातमीची तारीख देखील मुद्दाम देत आहे , नाहीतर काही प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी आरोप करतील  कि जुनीच बातमी पुन्हा , पुन्हा देतो . तसही  अश्या श्वान दंशाच्या अश्या दुखःद घटना या अनेक ठिकाणी रोजच घडत असतात .   

या सगळ्या बातम्यांचे संकलन  करून ते सर्व सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचा प्रयत्न राहणार आहे. माझी सर्वांना विनंती आहे आपल्या भागातील श्वान दंशाच्या बातम्यांची कात्रणे तारीख , वृत्तपत्राचे नाव यासकट  मला
कृपया  satyajitshah64@gmail.com या माझ्या ई मेल ला पाठवा . त्याचप्रमाणे या श्वान दंशाच्या त्रासाची काही माहिती असेल तर ती देखील मला पाठवा. लक्ष्यात ठेवा एवढा वेळ तुम्ही काढू शकता .

तुम्हाला , तुम्हाला परिवाराला , तुमच्या आप्तजनांना श्वान दंश होण्याची वाट पाहू नकात.

भारतीय " नागरिकांनो " एक कळकळीची विनंती आहे कि " जागरूक नागरिक " बना . स्वतःला श्वान दंश होण्याची वाट पाहू नका .

Evil Triumphs When Good People Sit Quiet


Stand up for what is right , Even if you’re standing alone !


" कुत्र्यांच्या हल्ल्यात काळविटाचा मृत्यू "

नमस्कार , आणि सुंदर दुपार ,
" कुत्र्यांच्या हल्ल्यात काळविटाचा मृत्यू "
दैनिक देशोन्नती मधील बातमी येथे देत आहे. या बातमीतील धर्माबाद हे गाव महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील एक शहर आहे.
आजपर्यंत श्वान दंशाच्या घटनेमध्ये बालके , पुरुष , स्त्रिया असे मानव प्राणी मृत्युमुखी पडत होते . या बातमीवरून असे कळते कि आता तर श्वान दंशाच्या घटनेमध्ये प्राणी सुद्धा मृत्युमुखी पडत आहेत .
मानव मृत्युमुखी पडत होते तेंव्हा प्राणी मित्र कोठे लपून बसायचे हे माहित नाही , पण आता तर श्वान दंशाच्या घटनेमध्ये प्राणी सुद्धा मृत्युमुखी पडला आहे , तेंव्हा बघू आता प्राणी मित्र काय करतात ?
आता तरी लक्ष्यात आले असेल कि हा भटक्या कुत्र्यांचा प्रश किती गंभीर होत चालला आहे . नुकतेच उच्च न्यायालयाने देखील या गंभीर प्रश्नाची दाखल घेतली आहे.
भारतीय " नागरिकांनो " एक कळकळीची विनंती आहे कि " जागरूक नागरिक " बना . स्वतःला श्वान दंश होण्याची वाट पाहू नका .
Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up for what is right , Even if you’re standing alone !


भटक्या कुत्र्यांना हद्दपार करा

नमस्कार आणि सुंदर सकाळ ,
भटक्या कुत्र्यांना हद्दपार करा
अहो हे मी नाही म्हणत आहे , हे मत व्यक्त केले आहे उच्च न्यायालयाने . पण त्यासाठी सांगली येथे भटक्या कुत्र्यांनी ५ वर्षीय तेजस हालेचा बळी गेल्याची घटना घडावी लागली .
" पुढारी " या वृत्तपत्राच्या १०.०६.२०१६ च्या अंकातील हि बातमी वाचा . बहुतेक भारतीय मानव प्राण्यांचा " भटका कुत्रा " नामक एका प्राण्याच्या दंशापासून सुटका होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
भटक्या कुत्र्यांना हद्दपार करा
By pudhari | Publish Date: Jun 10 2016 1:47AM | Updated Date: Jun 10 2016 1:47AM
मुंबई : प्रतिनिधी
निर्बी र्जीकरणाने भटक्या कुत्र्यांचे प्रजनन थांबेल. मात्र त्यांची हिंसक वृत्ती कमी होणार नाही. त्यांना हद्दपार करणेच योग्य ठरेल, असे परखड मत गुरुवारी उच्च न्यायालयाने व्यक्त केले. भटके कुत्रे नागरिकांचे बळी घेतात. त्यामुळे त्यांना प्रतिबंध करायला हवा. भटक्या कुत्र्यांना प्रतिबंध करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे नेमके काय धोरण आहे, याची माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले.
सांगली येथे भटक्या कुत्र्यांनी 5 वर्षीय तेजस हालेचा बळी घेतला. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेने भटक्या कुत्र्यांना प्रतिबंध करण्यासाठी उपाय योजना न केल्याने तेजसचा बळी गेला.
त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून प्रशासनाने 20 लाख रूपये द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका तेजसचे वडील मारुती हाले यांनी अ‍ॅड. पद्मनाभ पिसे यांच्यामार्फत केली आहे. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने वरील परखड मत व्यक्त केले. न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने हा मुद्दा व्यापक जनहिताचा असल्याचे मत व्यक्त केले. भटक्या कुत्र्यांमुळे अनेकांचा बळी गेला आहे. तेव्हा यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करायला हव्यात, असे मत व्यक्त करत न्यायालयाने वरील आदेश देऊन ही सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली.


Tuesday, June 7, 2016

सोलापूर , महाराष्ट्र येथे १३ निरपराध मानव प्राण्यांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

नमस्कार  आणि सुंदर संध्याकाळ ,

सोलापूर , महाराष्ट्र  येथे  १३ निरपराध मानव प्राण्यांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

हि आहे आजची म्हणजे ७ जून, २०१६ ची ताजी , ताजी बातमी जी IBN लोकमत या वृत्त वाहिनीने संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत दाखवली होती.  .

रोजच या प्रकारच्या बातम्या ऐकायला , वाचायला मिळत आहेत.

आता आपल्याला कळाले असेल कि मी जे म्हणतो ते ( महाराष्ट्र राज्यात दररोज अंदाजे ७,७०० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो ) यात तथ्य आहे.  .

आपण कृपया हि श्वान दंश झालेल्या व्यक्तींची छायाचित्रे नीट पहा . आपल्याला जखमा किती  खोलवर व भयानक आहेत याची कल्पना येईल .

काय अजूनही तुम्हाला  वाटत नाही का कि हा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न हा हाताबाहेर जाणारा प्रश्न आहे आणि यावर शासनाने त्वरित पाऊल उचलणे गरजेचे आहे.