Wednesday, April 1, 2015

रोज १० ठाणेकरांना कुत्रे चावतात

सुंदर सकाळ आणि नमस्कार ,

२ एप्रिल, २०१५ च्या "पुढारी" वर्तमान पत्राच्या मुंबई अंकातील बातमी वाचा. सर्वप्रथम मी "पुढारी" चे श्री. विवेक गिरधारी यांचे मनापासून आभार मानतो कारण त्यांनी सातत्याने या प्रश्नावर आवाज उठविला आहे.
तुम्हा , आम्हा सगळ्यांनी या गंभीर प्रश्नावर आवाज उठविला पाहिजे.

लक्ष्यात ठेवा राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे एक हि राजकीय व्यक्ती , नेता या प्रश्नावर बोलत नाही. त्यांना पुढची निवडणूक कशी जिंकायची हेच एक उद्दिष्ट असते.

भटके कुत्रे नेत्यांना चावणार नाहीत कारण ते सदा वातानुकुलीत गाडीतूनच फिरतात.

भटक्या कुत्र्यांचा त्रास हा फक्त सामान्य नागरिकांनाच होत असतो , तेव्हा उठा , जागरूक नागरिक व्हा.
भविष्यात भटक्या कुत्र्यांची संख्या मानवी लोकसंख्येपेक्षा जास्त होवू शकते.

आता ठाण्याचीच गोष्ट घ्या , आजमितीला ठाण्यात अंदाजे ७०,००० च्या आसपास भटके कुत्रे असू शकतील. जर अश्या धीम्या गतीने ठाणे म न पा ने निर्बीजी करणाकडे दुर्लक्ष्य केले तर २०२१ सालात ठाण्यात अंदाजे २७ लाख भटके कुत्रे असतील.

कुत्र्यांच्या चावा जो असतो त्याच्यात अंदाजे ५५६ PSI एवढा FORCE असतो . PSI म्हणजे (Pound per Square Inch) . व मानवी ( प्रौढ ) चाव्याचा हाच FORCE १५० PSI असतो. यावरूनच आपल्याला काळू शकेल कि श्वान दंश हा किती भयानक असतो.

या बरोबर श्वान दंश झालेल्या एका मुलाच फोटो दिला आहे. हा DR आनंद हर्डीकर ( डोंबिवली ) यांच्या दवाखान्यात आला होता. DR आनंद हर्डीकर सुद्धा या प्रश्नावर लढत आहेत.

लक्षात ठेवा

Evil Triumphs When Good People Sit Quiet

उठा , जागरूक नागरिक व्हा.




No comments:

Post a Comment