नमस्कार ,
माझा “ फेसबुकवरील व्यक्ती आणि प्रवृत्ती “ हा लेख "लोकप्रभा" या साप्ताहिकाच्या १ मे, २०१५ च्या अंकात ( जो आज प्रकाशित झाला आहे व वर्तमान पत्राच्या ठेल्यावर आजपासून मिळेल ) छापून आला आहे.
गेली अनेक वर्षे FACEBOOK ( F B ) वरील अनेक व्यक्तींच्या POST पहात होतो. त्यावरून काही व्यक्तीच्या प्रवृत्ती लक्षात आल्या. त्या या लेखातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या मध्ये अतिशयोक्ती नाही.
आपण अनेक जण माझ्या या मताशी सहमत असाल कि FACEBOOK ( F B ) चा योग्य प्रकारे वापर भारतात तरी होत नाही. जर योग्य प्रकारे हे मध्यम वापरले गेले तर हे एक समाज प्रबोधनाचे अतिशय प्रभावी असे मध्यम होवू शकते. अनेक जण स्वतःच PROFILE PICTURE वारंवार बदलतात , पण या आपल्या देशाच PROFILE PICTURE मात्र बदलण्याची अश्यांना गरज वाटत नाही.
हा लेख वाचकांपर्यंत नेला म्हणून मी लोकप्रभा चे मनःपूर्वक आभार मानतो.
Blogspot : http://fightofacommonman.blogspot.in/
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
फेसबुकवरील व्यक्ती आणि प्रवृत्ती
सत्यजित अ. शाह - response.lokprabha@expressindia.com
Published: Friday, May 1, 2015
फेसबुक हे तरुणाईचंच नव्हे तर सगळ्याच वयोगटांचं आवडतं माध्यम. पण या आवडीचा अतिरेक झाला की विसंगती तयार होते आणि कधी कधी ती आपल्या लक्षातही येत नाही. फेसबुकवरील या विसंगतींवर मार्मिक टिप्पणी..
फेसबुक हे सोशल नेटवर्किंगचे एक आगळेवेगळे साधन आजच्या पिढीला मिळाले आहे. गेले काही महिने मी फेसबुकवर जे जे काही पाहिले, अनुभवले ते सगळे गमतीदार प्रसंग आपल्यासमोर सादर करीत आहे.
आज जर पु. ल. देशपांडे असते तर त्यांनी या सगळ्या गोष्टीवर एवढं मार्मिक लिहिलं असतं की त्यांच्या अजरामर पुस्तकांच्या यादीत अजून एका अफाट विनोदी पुस्तकाची भर पडली असती.
असो, फेसबुकवर अनेक प्रकारच्या व्यक्ती आणि प्रवृत्ती (व्यक्ती आणि वल्ली) पाहिल्या.
टाइमकीपर प्रवृत्ती : सध्या बऱ्याच घरांमध्ये पहाटे पहाटे हालचाल दिसते. दिवे लागलेले दिसतात. परीक्षेचे दिवस नाहीत तरीही पहाटे ही हालचाल दिसते. आपल्याला वाटले असेल की व्यायाम सुरू असेल, पण तसे काहीच नाही.
दिवसाची सुरुवात सकाळने होते. पहिल्या प्रकारच्या फेसबुकवरील प्रवृत्ती (टाइमकीपर प्रवृत्ती) अगदी पहाटे, पहाटे फेसबुकवर गुड मॉर्निग लिहिण्यासाठी धडपडत असतात. त्यानंतर मग गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग आणि मग गुड नाइट हे सगळं पोस्ट करीत असतात.. बरं, नुसतं स्वत: पोस्ट करीत असतात. पण अनेकांना ते टॅगही करीत असतात. त्यांना यात असा कोणता आनंद मिळत असतो हे मला कधीच कळले नाही. अशा व्यक्ती टाइमकीपरचे काम अगदी न चुकता, काटेकोरपणे करीत असतात. मला यात त्यांनी काय सोशल नेटवर्किंग केले हेच कळत नाही.
या प्रवृत्तीच्या व्यक्ती हे का विसरतात की, आजकाल प्रत्येकाकडे मोबाइल असतो व त्यात घडय़ाळ असते, त्यामुळे सगळ्यांनाच सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र कधी होते हे कळते. नशीब, अशा व्यक्ती फेसबुकवर गुडनाइट म्हटल्यावर सकाळपर्यंत 'जागते रहो' असे पोस्ट टाकत नाहीत.
यातील हद्द तर पुढेच आहे. अशा टाइमकीपिंगच्या पोस्टला अनेक लाइक्स मिळालेले असतात व अशा टाइमकीपरचे काही फेसबुक मित्र तर स्वत:ही त्या गुड मॉनिंग-गुड नाइटवर कॉमेंटही करीत असतात.
या अशा वायफळ गोष्टींसाठी अशा प्रवृत्तींच्या व्यक्तींना कसा काय वेळ मिळतो, हे मला पडलेले कोडे अजूनही सुटले नाही.
लाइक प्रवृत्ती : या प्रवृत्तीच्या व्यक्ती अक्षरश: प्रत्येक पोस्टला लाइक करीत असतात. जरा समजावून सांगतो. याअगोदर सांगितल्याप्रमाणे जेव्हा टाइमकीपर प्रवृत्तीच्या व्यक्ती गुड मॉर्निग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग पोस्ट करतात त्यालाही 'लाइक' प्रवृत्तीच्या व्यक्ती लाइक करतात. गुड मॉर्निगला गुड मॉर्निग म्हणणे आपण समजू शकतो, पण गुड मॉर्निगला लाइक करणे हे कुणाच्याही आकलनापलीकडचे असते.
एखाद्याचा 'पास झालो', 'मुलगा झाला', 'मुलगी झाली', 'नवी गाडी घेतली', वगैरे पोस्टना लाइक करणे आपण समजू शकतो, पण मी या 'लाइक' प्रवृत्तीच्या व्यक्तींना, एखाद्याने त्यांच्या आईचे देहावसान झाले वा वडिलांचे देहावसान झाले अशा पोस्टलासुद्धा लाइक केलेले पाहिले आहे.
बरे असे लाइकही एखाद्याने चुकून केले असेल असे सुरुवातीला वाटले, पण ५० ते ६० लाइक अशा दु:खी घटनेच्या पोस्टला दिलेल्या मी अनेक वेळा बघितल्या आहेत.
रनिंग कॉमेंट्री प्रवृत्ती : या प्रवृत्तीच्या व्यक्ती फारच विचित्र असतात. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करतात हे अक्षरश: सगळेच फेसबुकवर पोस्ट करतात. आता या प्रवृत्तीच्या काही व्यक्तींनी फेसबुकवर टाकलेल्या या काही पोस्ट.
अशीच एक प्रवृत्ती, गणपती आणायला घरातून निघाली. त्या वेळी त्याने अनेक फोटो टाकले ते असे होते- घरातून निघताना, स्कूटरला किक मारताना, ट्रॅफिक सिग्नलला अडकला म्हणून तेथील एक फोटो, गणपतीची मूर्ती घेताना, मूर्ती स्कूटरवर घेऊन बसताना, घराजवळ आल्यावर, घरी शिरताना, गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करताना. गंमत म्हणजे प्रत्येक फोटोत ती व्यक्ती कॅमेऱ्याकडेच पाहत होती. म्हणजे अशा व्यक्तीबरोबर सदा एक फोटो काढणारा हवाच.
अजून एक अशीच या प्रवृत्तीची व्यक्ती जी लिहिते- आज मुंबईहून पुण्याला निघालो किंवा अंबेजोगाईहून जालन्याला निघालो, स्थळ काहीही असो, त्याने पोस्टवर टाकलेले फोटो काय तर घरातून निघताना, गाडीत बसल्यावर सीटबेल्ट लावताना, वाहनचालक बाळू गाडी चालू करताना, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (थांबण्यास बंदी असतानादेखील) मुद्दाम थांबून काढलेला फोटो, वाटेत एके ठिकाणी नाश्ता व चहा घेताना, त्याच फोटोत पाठीमागे एक टॉयलेट दिसत होते, मला लगेच भीती वाटली की आता पुढच्या फोटोत काय पाहायला मिळणार. माझ्या नशिबाने पुढचा फोटो गाडीत इंधन भरतानाचा होता.
याच प्रवृत्तीची एक व्यक्ती मुंबईहून दुबईला फिरायला गेली. त्या व्यक्तीने प्रवासाची रनिंग कॉमेंट्री घरापासून सामानाची बांधाबांधी करतानापासून केली. त्यानंतर टॅक्सीमध्ये बसताना, बोर्डिग पास घेताना, विमानाची वाट बघत असताना, विमानात गेल्यावर, विमानात जेवताना, दुबईला उतरल्यावर सामान घेताना, हॉटेलमध्ये पोहोचल्यावर. त्या पुढच्या दिवसापासून त्याचे फोटो याप्रमाणे होते, आज अबुधाबीला या हॉटेलमध्ये, रस्त्यावर, बाहेर जेवताना, परत दुसऱ्या दिवशी शारजा येथे या हॉटेलमध्ये व असेच काही त्या प्रकारचे फोटो. आणि शेवटी एकदाचे मुंबईला उतरल्यावर सामान घेताना. पण या सगळ्या सहलीमध्ये तेथील प्रेक्षणीय स्थळांचे फोटो नव्हते. जे टाकले त्या प्रत्येक फोटोमध्ये ती व्यक्ती अगदी आवर्जून व अगदी प्रामुख्याने व ठळकपणे दिसत होती.
प्रोफाइल फोटो प्रवृत्ती : ही एक जरा विचित्र प्रवृत्ती पाहायला मिळते. या प्रवृत्तीच्या व्यक्ती फारच अॅक्टिव्ह असतात, पण कोणत्या बाबतीत या व्यक्ती अॅक्टिव्ह असतात हे आपणाला कळलं तर आपणालाही आश्चर्याचा एक धक्का बसेल. अशा व्यक्ती त्यांचे प्रोफाइल फोटो वारंवार बदलत असतात. अशा प्रवृत्ती पुल्लिंगी जास्त असतात का स्त्रीलिंगी जास्त असतात, याचा अभ्यास केल्यावरच कळेल. हे सगळं (प्रोफाइल फोटो वारंवार बदलणे) यासाठी अशा व्यक्तींना कोठून वेळ मिळतो, हे करून करून यांना थकवा कसा काय येत नाही, एवढे वेगवेगळे फोटो काढायला यांना कोण भेटतात, असे अनेक प्रश्न पडतात, पण अजूनही त्यांची उत्तरे मिळालेली नाहीत.
आणि गंमत म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा अशा व्यक्ती प्रोफाइल फोटो बदलण्याचे सत्कार्य करतात, तेव्हा त्यांच्या या पोस्टलाला भरपूर लाइक मिळतात व अनेक कॉमेंट्सही येतात. म्हणजे एवढय़ा सगळ्यांना (लाइक देणाऱ्यांना व कॉमेंट्स करणाऱ्यांना) मोकळा वेळ आहे.
प्रतिक्रिया देणे प्रवृत्ती : या प्रवृत्तीच्या व्यक्ती सदान्कदा दुसऱ्यांच्या पोस्टवर फक्त विचित्र प्रतिक्रियाच देत असतात. अशा प्रतिक्रिया देताना त्या पोस्टशी त्यांचा संबंध आहे की नाही, याचाही त्या व्यक्ती विचार करीत नाहीत.
खादाड प्रवृत्ती : या प्रवृत्तीच्या व्यक्तींना सदान्कदा खाण्याच्या पदार्थाचे फोटो किंवा स्वत: खात असतानाचे फोटो असे फक्त खाण्याच्या पदार्थासंदर्भातील फोटो एफबीवर टाकण्यात/ शेअर करण्यात फारच स्वारस्य असते. कधी कधी तर पदार्थाने भरलेली थाळीच काय दाखवतील, तर कधी भजी, बटर पाव भाजी, जिलेबी, मिसळ वगैरेचे फोटो टाकून त्याबरोबर, असे काही तरी लिहितात या खायला वाट पाहतो, येता का खायला, कोण कोण येणार हे सगळं खायला?
अशाच प्रवृत्तीच्या एका व्यक्तीचे लग्न झालं. त्याने लग्नातले भरपूर फोटो एफबीवर टाकले. त्यात लग्नातील विधींचे, जेवणाचे, एकमेकांना भरविताना वगैरे असे अनेक फोटो होते हे वेगळं सांगायची गरज नाही. गंमत तर पुढे आहे. त्याने एका हॉटेलमध्ये शिरतानाचा फोटो टाकला होता व लिहिले होते की मधुचंद्राला आलो आहे. काय म्हणायचं यांना?
'स्व'प्रवृत्ती : ही एक गमतीदार प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीच्या व्यक्ती सदान्कदा स्वत:चे फोटो एफबीवर पोस्ट करीत असतात. बरं स्वत:चे फोटो असतात, पण प्रत्येक फोटोमध्ये ते फक्त आणि फक्त कॅमेऱ्याकडेच पाहत असतात.
अशा व्यक्ती कोठेही गेल्या (ट्रेकिंगला गेल्या, परदेशी गेल्या, सहलीला गेल्या) तरीही तेथील फोटो टाकतानासुद्धा प्रत्येक फोटोत स्वत: असतील याची खबरदारी घेतात. जरा काही उदाहरणे देतो- अशी एक व्यक्ती आग्रा येथे ताजमहाल पाहायला गेली होती व ताजमहालचा फोटो पोस्ट केला गेला, पण गंमत म्हणजे ताजमहालसमोर ती व्यक्ती स्वत: उभी होती म्हणजे ती व्यक्ती व्यवस्थित दिसत होती, पण ताजमहाल पुसट दिसत होता. अशा या प्रवृत्तीच्या व्यक्तींना एफबीवरच्या मित्रांना ताजमहाल दाखवायचा असतो का स्वत:लाच दाखवायचे असते? अशा प्रवृत्तीच्या व्यक्ती, ताडोबासारख्या व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी गेल्या व त्यांना वाघ दिसला तर खाली उतरण्यास बंदी असूनदेखील या व्यक्ती खाली उतरतील व एखाद्याला असा फोटो काढायला सांगतील की ज्यात वाघ दिसेल न दिसेल, पण ते स्वत: ठळकपणे दिसतील.
या प्रवृत्तीच्या काही व्यक्ती स्वत:चे वेगवेगळ्या कपडय़ांतील फोटो किंवा वेगवेगळ्या प्रकारे उभे राहून, बसून, विचार करतानाचे (कृत्रिम) वगैरे काढलेले फोटो सारखे पोस्ट करीत असतात.
सेलिब्रिटीच्या सोबत फोटो काढणे प्रवृत्ती : ही एक जरा आगळीवेगळी प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीच्या व्यक्तींना सुप्रसिद्ध व्यक्तींबरोबर फोटो काढायची व ते फोटो एफबीवर पोस्ट करायची भारी हौस असते. जेथे त्यांना सेलिब्रिटी दिसतील तेथे ते पटकन जातात व त्यांच्याबरोबर स्वत:चा फोटो काढून घेतात. या प्रवृत्तीच्या काही व्यक्ती तर बहुतेक जेथे सेलिब्रिटी भेटू शकतील अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी किंवा चित्रपटाच्या शूटिंगच्या ठिकाणी हमखास जात असतील.
अशाच प्रवृत्तीच्या एका व्यक्तीने त्याचा अनिल कपूरबरोबरचा एक फोटो एफबीवर टाकला होता. गंमत म्हणजे त्याने त्या पोस्टवर असे लिहिले होते की माझ्याबरोबर अनिल कपूर. म्हणजे जणू काही अनिल कपूर या व्यक्तीबरोबर फोटो काढायला कधी मिळतो हे जणू अनेक वर्षे वाट पाहत होता.
मला या सगळ्यात सेलिब्रिटीचे कौतुक वाटते, ते अशा वेळेला कसे काय शांत राहत असतील व फोटोमध्ये कसे काय खोटे खोटे हसत असतील?
या प्रवृत्तीची एक व्यक्ती तर काय करते सेलिब्रिटी दिसली की ती व्यक्ती त्या सेलिब्रिटीच्या थोडी जवळ जाते व सेल्फी काढते व लगेचच एफबीवर टाकते. आहे की नाही ही अगदी जगावेगळी प्रवृत्ती.
टॅग प्रवृत्ती : ही एक प्रवृत्तीसुद्धा जराशी जगावेगळीच आहे, अगदी रोजच्या रोज अशा व्यक्ती एफबीवरच्या बाकी मित्रांना काही तरी सतत टॅग करीत असतात. एखाद्या वेळेला अगदीच जगावेगळी घटना किंवा प्रसंग वगैरे टॅग केले तर समजू शकतो, पण रोजच्या रोज हे टॅग झेलणं म्हणजे ज्यांना टॅग केले जाते त्यांना हे अवघड जागेचे दुखणे वाटते. अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींना आपण 'टगे' असेही संबोधू शकतो.
उंटावरून शेळ्या राखणे प्रवृत्ती : या प्रवृत्तीच्या व्यक्ती रस्त्यावरील खड्डे, वाहतुकीच्या समस्या, अनधिकृत बांधकामे वगैरे समस्या अथवा फोटो पोस्ट करीत असतात, पण त्याचबरोबर असे लिहीत असतात 'अरे कोणी तरी याकडे लक्ष द्या, कोणी तरी हे थांबवा, कोणी तरी हे सुधरवा, कोणी तरी शासनाला हे दाखवा'. म्हणजे हे स्वत: मूग गिळून गप्प बसणार व दुसऱ्या कोणी तरी यावर आवाज उठवावा ही त्यांची अपेक्षा असते. यालाच म्हणतात 'उंटावरून शेळ्या राखणे' प्रवृत्ती.
चोर प्रवृत्ती : आत्तापर्यंत आपल्याला पैशांची चोरी, टॅक्सची चोरी, ऑक्ट्रॉयची चोरी, वस्तूंची चोरी, सोन्याच्या दागिन्यांची चोरी अशा गोष्टीची चोरी करणाऱ्या चोरांविषयी माहिती होती. पण या एफबीवर उघड उघड चोरी होते.
बरेच जण एफबीवर त्यांच्या कविता, व्यंगचित्रे असे टाकतात. पण एफबीवरील या 'चोर' प्रवृत्तीच्या व्यक्ती, चक्क कवितेतील काही ओळी, कधी कधी अख्खी कविता, व्यंगचित्रातील व्यक्तिरेखा किंवा कधी कधी तर अख्खे व्यंगचित्रच स्वत:च्या नावाने खपवितात. अशा एका चोराने तर एका व्यंगचित्रकाराच्या व्यंगचित्रातील दोन पात्रे चोरली होती. ती पत्रे जशीच्या तशी त्याने त्याच्या नाटकाच्या जाहिरातीत वापरली. फक्त त्याने त्या पात्रांच्या अंगावरच्या कपडय़ांचा रंग वेगळा बदलला.
तर अशा या फेसबुकवरच्या व्यक्ती आणि प्रवृत्ती.
सत्यजित अ. शाह

No comments:
Post a Comment