Friday, April 17, 2015

जंगलातील प्राणी नागरी वस्तीत - एक धोक्याची घंटा

नमस्कार ,

मी तत्वदयान  विद्यापीठाच्या मागे  HYDE PARK , ठाणे पश्चिम   येथे राहतो .  आमचे निवासी संकुल तसे संजय गांधी राष्ट्रीय उद्याना  पासून बऱ्यापैकी दूरच्या अंतरावर आहे .

दिनांक १७ एप्रिल, २०१५ च्या संध्याकाळी ६ च्या सुमारास एक अघटीत असे घडले , आमच्या संकुला मध्ये एक जंगली  माकड शिरले . ते अगोदर आमच्या संकुलाच्या भिंतीवर बसलेले दिसले . त्यानंतर ते माकड संकुलाच्या आत आले व एका आंब्याच्या झाडाखाली पडलेला आंबा खात बसलेले दिसले. त्यानंतर ते महानगर GAS च्या PIPE ला पकडून वर चढले व पुढे पुढे सरकू लागले.

मी या ई-मेल सोबत त्याची काढलेली काही छायाचित्रे जोडत आहे.

मी अग्निशमन दलाला दूरध्वनी करून याबाबत कळविले पण त्यांनी मला एक प्राणी मित्र श्री. योगेश पन्हाळे यांना कळविण्यास सांगितले.

मी त्याप्रमाणे त्यांना कळविले . त्यांनी मला काही वन अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक दिले.

सध्या ते माकड कोठे आहे याची कल्पना नाही पण ते जवळपासच्या कोणत्यातरी निवासी अथवा व्यावसायिक संकुलात असू शकेल.

श्री. योगेश पन्हाळे यांनी असे सांगितले कि सध्या जी आरे कॉलोनी येथे वना मध्ये जे जंगल तोड सुरु आहे त्याचा हा परिणाम आहे. नुकतेच त्यांनी एक माकड वरळी येथे पकडले.

माझ्या मते हि एक धोक्याची घंटा आहे . मानवाने  राखीव वन क्षेत्रामध्येही बांधकाम करून जी घुसखोरी केली आहे त्यामुळे या वन्य प्राण्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे व ते आता मानवी वस्तीत  फिरू लागले आहेत.

सगळ्या बाजूने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात मानवाची घुसखोरी सर्रास सुरु आहे. काही दिवसातच बिबटे व बाकीचे प्राणी ही निवासी संकुलात दिसू लागतील.

या सगळ्या विरुद्ध आमच्या सारख्या सामान्य ( क्षुद्र ) नागरिकांनी कोणापुढे दाद मागायची हे कळेनासे झाले आहे.

ठाण्यातील नागरिक अगोदरच भटक्या कुत्र्यांच्या जीव घेण्या हल्ल्यांमुळे त्रस्त झाली आहे , त्यातच या वन्य प्राण्यांनी हल्ले सुरु केले तर परिस्थिती हाता  बाहेर जावू शकते.

आता घराबाहेर  पडणे , रस्त्यावर   फिरणे , मुलांना खेळायला बाहेर सोडणे, वयोवृद्धांचे फिरणे   हे सगळ  भीतीदायक  झाले आहे.

वन्य प्राण्यांच्या मानवांवरील  भविष्यात होवू घातलेल्या हल्ल्यांची हि एक नांदी आहे.






No comments:

Post a Comment