Saturday, March 28, 2015

आजची सत्यगीतं चे ठाणे वैभव मध्ये छापून आलेले पुस्तक परीक्षण

रविवार , २९ मार्च , २०१५ च्या " ठाणे वैभव " या ठाणे येथून प्रसिद्ध होणाऱ्या व ४० वर्षाची परंपरा असलेल्या आणि "इष्ट ते छापणार" हे ब्रीद वाक्य असलेल्या वर्तमान पत्रात माझ्या " आजची सत्यगीतं " या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहाचे परीक्षण छापून आले आहे.

हे परीक्षण लिहिल्याबद्दल मी सुधा ताई मोकाशी व छापल्याबद्दल " ठाणे वैभव " यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

सुधा ताई मोकाशी या स्वतः कवयित्री आहेत व माझ्या सारख्या नव कवींना प्रोत्साहन व मार्गदर्शन अगदी आनंदाने करीत असतात . त्या जेष्ठ नागरिक असूनही त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा असतो.

मला हे सांगायला आनंद होतो कि हे परीक्षण पैसे देवून छापून आणलेले (" PAID ") परीक्षण नाही.

माझ्या " नागरिक " या व्यक्तीला " जागरूक नागरिक " करण्याच्या उपक्रमा मध्ये हा काव्यसंग्रह चांगलीच मदत करेल . पण त्यासाठी वाचकांनी या कविता वाचणे मला गरजेचे वाटते. आजच्या काळात पुस्तके विकत घेवून वाचणे व पुस्तके संग्रही ठेवणे दुर्मिळ होत चालले आहे. त्यामुळेच वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी माझा हा काव्यसंग्रह वाचनालये / ग्रंथसंग्रहालये यांना मी मोफत भेट म्हणून देत असतो.

जर आपल्याला हा काव्यसंग्रह वाचनालय / ग्रंथसंग्रहालय यांना द्यायचा असेल तर मला जरूर कळवा म्हणजे मी स्वखर्चाने तो SPEED POST ने पाठवून देईन.

हा काव्यसंग्रह खालील ठिकाणी उपलब्ध आहे

- मॅजेस्टिक ग्रंथ दालन ( Shivaji Mandir , दादर) मो.- 098922 20239
- मॅजेस्टिक बुक डेपो (ठाणे) दूरध्वनी : 022-2537 6865

मी नव्या पिढीला सुचवत असतो कि वाढदिवसाला व दुसऱ्या कोणत्या कार्याला १०० / १५० रुपयाचे शुभेच्छा पत्र देण्या ऐवजी , माझा काव्यसंग्रह भेट द्या. शुबेच्छा पत्रे दुसऱ्या दिवशी कचरा पेटीत टाकली जातात , पण पुस्तके कपाटात जपून ठेवली जातात व वाचलीही जातात.

माझा भ्रमण ध्वनी ०९८२११५०८५८ आहे . व ई मेल satyajitshah64@gmail.com आहे .





  • No comments:

    Post a Comment