ठाणे - भटक्या कुत्र्यांचे शहर
कोणे एके काळी म्हणे " ठाणे हे तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते असे म्हणतात. आजचे ठाणे पाहून तर ती एक बहुतेक अफवा असेल असेच वाटते कारण तलाव शोधावे लागतात . असो , पण सध्या " ठाणे - भटक्या कुत्र्यांचे शहर " आहे असे मात्र मी ठाम पणे म्हणू शकतो . पहावे तेथे भटके कुत्रे आरामात विहार करीत असतात . नुसते भटके कुत्रे नाहीत तर त्यांच्या टोळ्याच हैदोस घालीत शहरभर फिरत असतात .
दुर्दैव एवढं आहे कि , दररोज अंदाजे ८० ते १०० ठाणेकरांना श्वानदंश होऊन देखील ठाणेकर नागरिक गप्प आहे . त्यामुळेच ठाणे म न पा देखील चुप्प आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक राजकीय पक्ष देखील या प्रश्नावर मूग गिळून आहे.
" मानव प्राणी मरो , पण भटकी कुत्री जगो."
२७ ऑगस्ट , २०१९ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या एका सुप्रसिद्ध मराठी वृत्तपत्रातील CITIZEN
REPORTER मध्ये छापून आलेली माझी कैफियत देत आहे.
No comments:
Post a Comment