" माढ्यात भटक्या कुत्र्यांचा मोकाट वावर "
" माढा " , कुर्डुवाडी व मोहोळ मधील एक गाव , जेथून आदरणीय , वंदनीय , पूजनीय , माननीय श्री. शरदचंद्र पवार साहेब खासदार झाले होते , त्या गावातील सद्य परिस्थिती या बातमीवरून कळून येते .
माझा जन्म माढ्याचा , माझं आजोळ माढा , शालेय जीवनात उन्हाळ्याच्या प्रत्येक सुट्टीत तेथे जायचो , अजूनही तेथे माझे तीन मामे भाऊ राहतात . त्या माढ्याचे हे हाल पाहून अतिशय दुःख होतंय.
या भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बध वाढीविरुद्ध व श्वानदंशाच्या भयावह वेगाने वाढणाऱ्या संख्येविरुद्ध मी गेली ८ ते १० वर्षे एकलकोंडा लढत आहे . दुर्दैवाने भारतीय नागरिक मात्र मुकाट्याने हे सगळं सहन करतेय .
मानव प्राणी मरो , पण भटकी कुत्री जगो हि या भारत देशाची आजची स्थिती आहे.
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet
http://fightofacommonman.blogspot.in/
No comments:
Post a Comment