Sunday, September 8, 2019

आली निवडणूक , होते करमणूक - शिवसेनेचे ठाणे , ठाण्याची शिवसेना

विधानसभेच्या निवडणूक आल्या आहेत . निवडणुकीदरम्यानची करमणूक खालील कवितेत व्यक्त केली आहे. 

हि कविता ९ सप्टेंबर , २०१९ रोजी प्रकाशित झालेल्या " शब्दमुद्रा " या एक साप्ताहिकेत , श्री. प्रफुल वाघोले - मालक , मुद्रक , प्रकाशक व संपादक यांचे मी आभार मानतो .  त्यांनी छापलेले कविता देखील यासोबत देत आहे. 


"  आली निवडणूक ,   होते करमणूक " 

आली निवडणूक , 
           होते करमणूक , 
ऐकुनी गाणे ,
शिवसेनेचे ठाणे , 
          ठाण्याची शिवसेना 

आला पाऊस , 
         असे आम्हा ठाऊक , 
खड्ड्यांचे ठाणे , 
          ठाण्यातील खड्डे , 
तुंबलेल्या पाण्यातील ठाणे , 
          ठाण्यातील तुंबलेले पाणी 

म्हणे केले निर्बिजीकरण , 
         तरीही निराळे  समीकरण 
भटक्या कुत्र्यांचे ठाणे , 
          ठाण्यातील भटके कुत्रे , 
श्वानदंशाचे ठाणे , 
          ठाण्यातील श्वान दंश 

म्हणे तोडले अतिक्रमण 
        केले रस्त्याचे रुंदीकरण 
ठाण्यातील वाहतूक कोंडी , 
               वाहतूक कोंडीचे ठाणे  
ठाण्यातील नसलेले पार्किंग 
            पार्किंग नसलेले ठाणे 

म्हणे स्वच्छ ठाणे , 
          सुंदर ठाणे 
ठाण्यातील कचरा 
         कचऱ्यातील ठाणे 
डेंग्यूचे ठाणे 
         ठाण्यातील डेंग्यू 

म्हणे स्मार्ट सिटी ठाणे 
       हो हो  स्मार्ट सिटी ठाणे 
गर्दीचे ठाणे 
            ठाण्यातील गर्दी 
परमिट कमी 
      अन रिक्षा जास्त 
नसे कायद्याचे ठाणे 
        नसे ठाण्यात कायदा 

म्हणे ठाणेकरांची परिवहन सेवा
         कोणास ठाऊक कोण खातोय मेवा  
परिवहन सेवा बोंबललेले ठाणे 
          ठाण्यातील बोंबललेली परिवहन सेवा 
असुविधांचे ठाणे 
             ठाण्यातील असुविधा 

येईल  निवडणूक , 
           होईल  करमणूक , 
ऐकुनी गाणे ,
शिवसेनेचे ठाणे , 
          ठाण्याची शिवसेना 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet 


No comments:

Post a Comment