" जय जय भटके कुत्रे
" - एक कविता
जय जय भटके कुत्रे ,
मानव प्राणी मरो , पण जगो भटके कुत्रे
बालकांना चावो भटके कुत्रे
आजी , आजोबांना चावो भटके कुत्रे
आई , बाबांना चावो भटके कुत्रे
ताई , माई , अक्काला चावो भटके कुत्रे \\
१ \\
दादा , मामा , काकाला चावो भटके कुत्रे
प्रभात फेरी करणाऱ्यांना चावो भटके कुत्रे
दूध , वृत्तपत्रे वाटणाऱ्यांना चावो भटके कुत्रे
पोस्टमन , पोलिसांना , पत्रकारांना चावो भटके कुत्रे \\ २ \\
दुचाकीच्या मध्ये येवो भटके कुत्रे
चारचाकीच्या मध्ये येवो भटके कुत्रे
रेल्वे स्थानकांवर फिरो भटके कुत्रे
विमान धावपट्टीवर फिरो भटके कुत्रे \\ ३ \\
विमान तळा वर फिरो भटके कुत्रे
राज्यसभा आवारात फिरो भटके कुत्रे
ठाणे मनपा मध्ये फिरो भटके कुत्रे
शाळे मध्ये फिरो भटके कुत्रे \\ ४ \\
शासनाला दिसत नाहीत हे भटके कुत्रे
प्राणी मित्रांचे लाडके हे भटके कुत्रे
जय जय भटके कुत्रे ,
मानव प्राणी मरो , पण जगो भटके कुत्रे
कवी : सत्यगीत ( सत्यजित अ शाह - ठाणे )
खूपच भयानक आहेत ती चित्र !!!!
ReplyDeleteSameer Prabhakar Kasale , हे सगळं " सत्य " आहे , पण या लढाईत " जीत " काही होत नाही याचे वाईट वाटते .
ReplyDelete