Saturday, August 3, 2019

" जय जय भटके कुत्रे " - एक कविता


"  जय जय भटके कुत्रे  " - एक कविता


जय जय भटके कुत्रे , 
मानव प्राणी  मरो , पण जगो भटके कुत्रे  

बालकांना चावो भटके कुत्रे 
आजी , आजोबांना चावो भटके कुत्रे 
आई , बाबांना चावो भटके कुत्रे 
ताई , माई , अक्काला  चावो भटके कुत्रे   \\ १ \\ 

दादा , मामा , काकाला  चावो भटके कुत्रे   
प्रभात फेरी करणाऱ्यांना चावो भटके कुत्रे 
दूध , वृत्तपत्रे वाटणाऱ्यांना चावो भटके कुत्रे 
पोस्टमन , पोलिसांना , पत्रकारांना चावो भटके कुत्रे \\ २ \\ 

दुचाकीच्या मध्ये येवो  भटके कुत्रे 
चारचाकीच्या मध्ये येवो  भटके कुत्रे 
रेल्वे स्थानकांवर फिरो  भटके कुत्रे 
विमान धावपट्टीवर फिरो भटके कुत्रे \\ ३ \\ 

विमान तळा वर फिरो भटके कुत्रे   
राज्यसभा आवारात  फिरो भटके कुत्रे 
ठाणे मनपा मध्ये फिरो भटके कुत्रे 
शाळे मध्ये फिरो भटके कुत्रे \\ ४ \\ 

शासनाला दिसत नाहीत हे भटके कुत्रे 
प्राणी मित्रांचे लाडके हे भटके कुत्रे 

जय जय भटके कुत्रे , 
मानव प्राणी  मरो , पण जगो भटके कुत्रे

कवी : सत्यगीत ( सत्यजित अ शाह - ठाणे ) 














2 comments:

  1. खूपच भयानक आहेत ती चित्र !!!!

    ReplyDelete
  2. Sameer Prabhakar Kasale , हे सगळं " सत्य " आहे , पण या लढाईत " जीत " काही होत नाही याचे वाईट वाटते .  

    ReplyDelete