" HELMETLESS BIKER DIES IN ROAD ACCIDENT " - LOKMAT
NEWS NETWORK NASHIK - JUNE 18
हि एक अतिशय दुर्दैवी बातमी आहे .
- भटका कुत्रा रस्त्यात
आला म्हणून
दुचाकीस्वाराचा अपघात
झाला .
- दुचाकी झाडावर आदळली
. दुचाकीस्वाराच्या डोक्याला
मार लागला
. दुचाकीस्वाराने शिरस्त्राण
नव्हतं घातलं
. दुचाकीस्वाराचा मृत्यू
झाला .
- प्रथम खबरीमध्ये ( FIR ) पोलिसांनी
दुचाकीस्वाराने शिरस्त्राण
घातले नव्हते
असे नमूद
केले आहे
त्येमुळे बहुतेक
मुर्त्युमुखी पडलेल्या
दुचाकीस्वाराच्या नामांकित
व्यक्तीला ( NOMINEE ) विम्याची रक्कम
मिळणे मुश्किल
होणार आहे.
सध्या भारत
देशात भटक्या
कुत्र्यांची संख्या
अनिर्बंध अश्या
वेगाने वाढत
आहे . त्यामुळे
श्वान दंशाच्या
घटना तर वाढतच आहेत
, पण त्याचबरोबर
भटके कुत्रे
रस्त्यात येऊन दुचाकींचे , तीन
चाकींचे , चार
चाकींचे , इतर
वाहनाचे अपघात
देखील वाढत
आहेत. हाताच्या
बोटांवर मोजता
येतील अश्या
पण वातानुकूलित
शयनगृहात बसून
प्राणी प्रेमाचा
कळवळा आणणाऱ्या
प्राणी मित्र
, प्राणी मैत्रिणी
यांच्यामुळे भटक्या
कुत्र्यांच्या अनिंर्बन्ध
वाढणाऱ्या संख्येवर
शासन काहीच
ठोस हालचाल
करीत नाही
.
त्याचप्रमाणे दुचाकीवर
शिरस्त्राण घालणे
हे अजूनही
बहुतांश भारतीयांना
, खाकी पोलिसांना
, वाहतूक पोलिसांना
, राजकीय पक्ष्याच्या
कार्यकर्त्यांना , नेत्यांना
, तरुणांना , तरुणींना
, महिलांना कमीपणाचे , अपमानास्पद
वाटते . महाराष्ट्र
राज्यातील " विद्येचे
माहेर " असणाऱ्या
एका सुसंस्कृत
, सुशिक्षित अश्या एका सुप्रसिद्ध शहरातील नागरिकांना
तर दुचाकीवर
शिरस्त्राण घालण्याची
सक्ती करणे
म्हणजे त्यांच्या
स्वातंत्र्यावर गदा घातल्यासारखे वाटते
, व त्याविरुद्ध
ते वारंवार
लढतात .
हे सगळं
थांबलं पाहिजे
. भारतीय नागरिकांनी
सुजाण होणे
गरजेचे आहे
. सद्सदबुद्धी वापरणे गरजेचे आहे
.
Evil
Triumphs When Good People Sit Quiet
Stand up
for what is right , Even if you’re standing alone !
No comments:
Post a Comment