" आपले पोलिस "
अति वृष्टी च्या संकटात , सणासुदीला , गणेशविसर्जन व इतर वेळप्रसंगी देखील जेव्हा आपले पोलिस व वाहतूक पोलिस ज्या प्रकारे अविश्रांत पणे त्याची कामे नेटाने पार पडताहेत, हे बघून अनेकांनी फेसबुक वर पोलिसांचे कौतुक केले आहे, हे पाहून अतिशय आनंद होतो .
माझा अनुभव मी येथे लिहू इच्छितो . जेंव्हा मी पोलिसाला मुद्दाम वाहन थांबवून धन्यवाद देतो, एखादी पाण्याची बाटली देतो, पोलिस चौक्यांमध्ये मध्ये जावून त्यांची विचारपूस करतो तेंव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.
आपणही त्यांना थांबून मुद्दाम धन्यवाद द्या, एखादी पाण्याची बाटली द्या, आणि स्वतः च बघा.
या सगळ्या माझ्या भावना, माझ्या " आपले पोलिस " या माझ्या कवितेतून व्यक्त केल्या आहेत. हि कविता पूर्वी " नवा काळ " ने छापली होती , व हि माझ्या " आजची सत्यागीतं' या काव्यसंग्रहात देखील आहे.
"नवा काळ" या वर्तमान पत्राने सुरु केलेल्या पोलिस सबलीकरणाच्या मोहिमेतील एक शिलेदार आहे.
माझी " आपले पोलिस " हि कविता यासोबत देत आहे.
No comments:
Post a Comment