कोण म्हणतो तंत्रज्ञानात भारत देश मागे आहे ?
खड्डे पडणारे रस्ते बनविणे असे हे प्रगत तंत्रज्ञान फक्त भारत या देशाकडे आहे.
ठाणे या एका स्मार्ट सिटी मधील एक जगप्रसिद्ध असा ( उपहासात्मक म्हटले आहे ) कापूरबावडी येथील उड्डाण पुलाचे घाई घाईत उदघाटन २४ जुलै, २०१४ रोजी त्या वेळच्या राज्य शासनाने केलं . त्यानंतर लगेचच २ ते ५ दिवसात पावसानंतर त्या उड्डाणपुलावर खड्डे तयार झाले . त्यावर तात्पुरती मलमपट्टी झाली , पुन्हा खड्डे झाले , पुन्हा मलमपट्टी झाली .
सन २०१५, २०१६ , २०१७ , २०१८ या वर्षी देखील त्या उड्डाण पुलावर त्याच ठिकाणी व काही नवीन ठिकाणी पावसानंतर
खड्डे पडले , त्यावर तात्पुरती मलमपट्टी झाली , पुन्हा खड्डे झाले , पुन्हा मलमपट्टी झाली .
काल , म्हणजे २८ जून , २०१९ रोजी पुन्हा मुसळधार पाऊस झाला , पुन्हा खड्डे दिसू लागले . काही दिवसातच त्या खड्ड्यांचे डबके होतील , त्यावर तात्पुरती मलमपट्टी होईल , पुन्हा खड्डे होतील , पुन्हा मलमपट्टी होईल.
दरवर्षी असे नित्य नियमाने खड्डे पडणारा उड्डाण पूल बांधल्याबद्दल , बांधणाऱ्या आस्थापनेचे कौतुक करावेसे वाटते .
खड्डे पडणारे रस्ते बनविणे असे हे प्रगत तंत्रज्ञान फक्त भारत या देशाकडे आहे असेच यावरून वाटते . कोण म्हणतो तंत्रज्ञानात भारत देश मागे आहे ?