Saturday, September 1, 2018

Relief from Knee Pain by Walking in Water - पाण्यात चालणे - " गुडघे दुखी " वर औषधं विरहित आराम





" गुडघे दुखी " वर औषधं विरहित आराम 

" पाण्यात चालणे " - स्वानुभवातून सांगतो 

- माझी  " गुडघे दुखी " नियमित  " पाण्यात चालणे "  यामुळे  अंदाजे ८० % कमी झाली .  

- औषधांवर , उपचारांवर खर्च करून पैसे पाण्यात घालण्यापेक्षा पाण्यात चाला व  " गुडघे दुखी " वर औषधं विरहित आराम मिळवा . 

- अनेकांनी कसं चालावं , किती खोल पाण्यात चालावं असे काही प्रश्न विचारले , त्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी हि ध्वनिचित्र फीत बनवली व youtube.com  वर   (  https://www.youtube.com/watch?v=HLGjf5BIUMg   )  टाकली . 

- हि ध्वनी चित्र मी सध्या राहत असलेल्या रहिवासी  संकुलाच्या  तरण तलावातील एक उत्साही  प्रशिक्षक श्री. मंगेश कुदळे याने बनवली आहे . 

- आपण हि   youtube.com  (  https://www.youtube.com/watch?v=HLGjf5BIUMg   )   वरील साखळी ( LINK )   " गुडघे दुखी " ने त्रस्त व्यक्तींना पाठवू शकता . 

- पाण्यात चालणे हे तसेही आरोग्यास खूप उपयोगी आहे .  चालण्याबरोबर मी पाण्यात काही शारीरिक व्यायाम ( पोहणाव्यतिरिक्त )  देखील करतो  , जे व्यायाम  " गुडघे दुखी " मुळे करू शकत नव्हतो . 

No comments:

Post a Comment