Thursday, September 27, 2018

" जागतिक रेबीज दिवस " - २८ सप्टेंबर


" जागतिक रेबीज दिवस " 
जगभर २८ सप्टेंबर हा  जागतिक रेबीज दिवस  म्हणून पाळला जातो .  

हा दिवस रेबीज नावाच्या एका  महाभयंकर आजार होऊ नये म्हणून सावधानता घेण्यासाठी हा महाभयंकर आजार दूर करण्यासाठी प्रयत्नांमध्ये जी प्रगती  होत आहेत त्याबद्दल माहिती होण्यासाठी पाळला जातोआपल्या देशात मात्र श्वान दंशाच्या घटनांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येमध्ये अनिर्बंध अशी वाढ होताना आढळून येते

" भारत " नावाच्या देशात सन २०१६ मध्ये ,३७० मानव प्राण्यांना रेबीज नावाच्या अत्यंत भयानक रोगाने जीव गमवावा लागला .त्याच वर्षात जगभरात १३,३४० मानव प्राण्यांना रेबीज नावाच्या अत्यंत भयानक रोगाने जीव गमवावा लागला होता . म्हणजेच सन २०१६ मध्ये  जगातील रेबीज मुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी / मृत्यू  हे फक्त भारत या देशात झाले होतेहि माहिती  Global Burden of Disease Study  या संस्थेने  प्रसिद्ध केली होती

" भारत " नावाच्या देशात एप्रिल, २०१७ ते मार्च २०१८ या काळात ,१९१ मानव प्राण्यांचा मृत्यू प्राणी दंश साप , विंचू यांच्या दंशामुळे झाला आहे. हि संख्या गेल्या वर्षातील सर्वाधिक आहे. हे उत्तर    The Ministry of Health and Family Welfare  यांनी  माहितीच्या अधिकारात विचारलेल्या उत्तरात दिले आहे. यातील बहुतांश मृत्यू हे श्वान दंशाने झाले आहेत . त्यानंतर सर्पदंश माकड दंशाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या आहे

आपल्या माहितीसाठी खाली थोडी आकडेवारी देत आहे 

श्वान दंशाची थोडीशी आकडेवारी :

ठाणे महानगर पालिका हद्दीत दर रोज अंदाजे ६० ते ७०  निरपराध मानव प्राण्यांना  भटका कुत्रा चावतो.
नागपूर या शहरात रोज अंदाजे ७० ते ८०   निरपराध मानव प्राण्यांना  भटका कुत्रा चावतो.
महाराष्ट्र राज्यात  दर रोज अंदाजे ,०० ते ९,०००   निरपराध मानव प्राण्यांना   भटका कुत्रा चावतो.
- " 
भारत " या महासत्ता बनू पाहणाऱ्या देशात दर रोज अंदाजे ,५०,०० ( एक लाख , पन्नास  हजार  ) निरपराध मानव प्राण्यांना  भटका कुत्रा चावतो.
श्वान दंशाच्या एकूण घटनांपैकी अंदाजे ८०घटनांमध्ये  ते या वयोगटातील बालके सापडतात

भटक्या कुत्र्यांच्या संख्येची थोडीशी आकडेवारी :

कल्याण - डोंबिवली महानगर पालिकेच्या हद्दीत अंदाजे ,००० ते ४०,००० भटके कुत्रे असण्याची शक्यता आहे .
ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत अंदाजे ( कमीत कमी ) ८०,००० ते ,०००  भटके कुत्रे असण्याची शक्यता आहे .
नागपूर शहर  नागपूर ग्रामीण या मध्ये मिळून अंदाजे ९५,००० ते ,००,००० भटके कुत्रे असण्याची शक्यता आहे .
जर हेच प्रमाण धरले तर " भारत " या देशात अंदाजे २५ ते २७ कोटी भटके कुत्रे असण्याची दाट  शक्यता आहे

उल्हासनगर येथील प्रेमनगर परिसरात नुकताच एका कुत्र्याने घराबाहेर खेळणाऱ्या एका चिमुकलीवर जीवघेणा हल्ला करत तिच्या नाकाला चावा घेतला . त्याच कुत्र्याने गेल्या तीन ते चार दिवसांत पाच नागरिकांना चावा घेतला होता.  या व अश्याच प्रकारच्या घटना मुख्यमंत्री साहेब आपल्या राज्यातील  प्रत्येक शहरात , प्रत्येक गावात  , प्रत्येक खेड्यात , प्रत्येक पाड्यात , प्रत्येक गल्लीत , प्रत्येक बोळात पदोपदी घडत असतात . अनेक निरपराध नागरिक जखमी होत असतात . 

महाराष्ट्र   राज्यात त्याच प्रमाणे भारत या देशात दिवसें दिवस भटक्या कुत्र्यांची संख्या अनेक पटीने वाढत आहे . 

या अतिवेगाने वाढणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या संख्ये विरुद्ध त्याचप्रमाणे श्वान दंशाच्या वाढणाऱ्या घटनांविरुद्ध मी गेली अंदाजे १० वर्षे गल्ली ते दिल्ली लढतोय , पण परिस्थितीत सुधारणा होण्या ऐवजी परिस्थिती चिघळतच  चालली आहे. 



No comments:

Post a Comment