Monday, September 24, 2018

" लोकसत्ता " - एक खरं खूर मराठी दैनिक

" लोकसत्ता " - एक खरं खूर मराठी दैनिक

हे विधान मी फार जपून त्याचप्रमाणे संपूर्ण शुद्धीत व पुराव्यानिशी करीत आहे.

महाराष्ट्र राज्यात अनेक मराठी दैनिके आहेत . त्यात बातम्या अजूनतरी मराठी भाषेत  दिली जातात , पण त्या मराठी भाषेतील बातम्यांमध्ये  २० ते  ३० % इंग्रजी शब्द , वापरले जातात . म्हणजेच  इंग्रजीच्या कुबड्या घ्याव्या लागतात .

पण माझे निरीक्षण आहे कि , " लोकसत्ता "  हे दैनिक मात्र बातम्या शुद्ध मराठीत देण्याचा आटोकाट प्रयत्न करतात . पुराव्यादाखल रविवार , २३ सप्टेंबर , २०१८ च्या " लोकसत्ता " मधील हि बातमी वाचा .

" फेरवापराची स्पर्शभिंगे "   म्हणजे REUSABLE CONTACT  LENSES  . 

या अश्या शुद्ध  मराठी वापराबद्दल मी " लोकसत्ता  " चे संपादक  श्री  गिरीश कुबेर यांचे मनापासून आभार मानतो .  अश्या प्रकारे मराठीत इंग्रजीच्या कुबड्या घेणं कमी केलं तर आपोआपच मराठी भाषा लोप पावण्यापासून वाचू शकेल . 

मी तर माझ्या परीने शुद्ध मराठी बोलण्याचा आटोकाट प्रयत्न करतो .


No comments:

Post a Comment