Friday, September 21, 2018

ठाणेकरांनो पादचारी पूल वापरा

ठाणेकरांनो पादचारी पूल वापरा


गेली अनेक वर्षे मी घोडबंदर रोड ठाणे येथील महामार्गावर  रस्ता ओलांडण्यासाठी अनेक ठिकाणी पादचारी पुल असावेत साठी लढलोशासनाने उशीरा का होईना , पण काही ठिकाणी पादचारी पूल बांधले , पण  ८० ते ९० % सुशिक्षित ठाणेकर मात्र अजूनही धोकादायक पणे महामार्गाच्या   १० मार्गीका हमरस्त्यातूनच ओलांडून जातात

या छायाचित्रातील पादचारी पूल हा तत्वज्ञान विद्यापीठाजवळील आहे . कोणत्याही वेळी  रास्ता ओलांडण्यासाठी त्या पादचारी पुलाचा  वापर करणाऱ्यांची संख्या अगदीच नगण्य असते , पण तेच वेगवान वाहनाच्या रहदारीतून धोकादायकपणे महामार्ग ओलांडणाऱ्यांची संख्या मात्र भरपूर असते . 

प्रत्येक अपघात झाल्यावर फक्त शासनाच्या नावे बोटे मोडण्यात अर्थ नसतो . 

हे थांबल पाहिजे.

कसं आहे झोपलेल्याला झोपेतून उठवू शकतो , पण  देखील धोकादायकपणे महामार्ग ओलांडणाऱ्या  या अश्या ( झोपेचे सोंग घेतलेल्या ) सुशिक्षित व्यक्तींना  कोण झोपेतून जागे करणार ? 



No comments:

Post a Comment