" दुचाकी ( SCOOTER ) आकर्षक दिसते , कारण ती कमी पिते " - एक महा विनोदी जाहिरात
एका सुप्रसिद्ध दुचाकीच्या ( SCOOTER ) दूरचित्रवाहिनीवरील खालील जाहिरात पाहून माझं भरपूर मनोरंजन झालं .
दारावरील घंटी ( DOOR BELL ) वाजते . एक तरुणी दरवाजा उघडते . दारावर बहुतेक एक विक्रेता तरुण दिसतो . तो म्हणतो माफ करा यावेळी आपल्याला त्रास दिला . ती तरुणी त्या तरुणाच्या मागे असलेल्या दुचाकीकडे ( SCOOTER ) बघते , आणि म्हणते कि तुझी XXXXXXXX दुचाकी एवढी आकर्षक का आहे ? त्यावर " ती कमी पिते " असे तो तरुण उतरतो .
कमी इंधन लागते म्हणून दुचाकी आकर्षक ? हा एक नवीन शोध लागला . मी यांत्रिकी अभियंता ( MECHANICAL ENGINEER ) असूनही मला या एका गोष्टीबद्दल माहिती नव्हती याची मला लाज वाटली .
कमी इंधन लागण्याचा आणि दुचाकी आकर्षक दिसण्याचा काही संबंध आपल्याला द्यात असेल तर कृपया मला कळवावा .
असो , आहे कि नाही हि एक अति विनोदी जाहिरात ?
No comments:
Post a Comment