विनोदी जाहिरात क्रमांक २ -केसांचे प्रत्यारोपण
दूरचित्रवाणीवर केसांच्या प्रत्यारोपणाची एक जाहिरात जोरदारपणे चालू आहे . त्या जाहिरातीतील आशय पाहून मला भरपूर हसू येतं .
ती जाहिरात तुमच्या साठी
डोक्यावर कमी केस असलेलया एका माणसाचा दूरध्वनीवर एका महिलेशी खालील संवाद होतो .
माणूस : केसांच्या प्रत्यारोपणाचे ( HAIR TRANSPLANT चे ) किती पैसे लागतील .
महिला : फक्त पंचावन्न हजार
माणूस : काही समान मासिक हप्ता ( EMI ) वगैरे आहे का ?
महिला : शून्य टक्के व्याज व फक्त एक रुपया आत्ता भरायचा .
माणूस : मग एक रुपया कधी भरू ?
महिला : भरला कि हो श्रीयुत देसाई , तुमची बायको आहे मी , तुमच्यावर एवढा खर्च तर मी करू शकते .
ती जाहिरात तेथे संपते.
या जाहिरातीतील गंमत पहा कि . तो माणूस ज्या आस्थापनामध्ये केसांच्या प्रत्यारोपणा च्या चौकशीसाठी दूरध्वनी करतो त्या आस्थापनेमध्ये त्याचीच बायको नोकरी करते हे त्याला माहित नसते या पेश्या मोठ्ठा विनोद नसेल त्याचप्रमाणे त्या बायकोला तिच्या नवऱ्याच्या टकलावर केसांच्या प्रत्यारोपणाबद्दल पूर्वीच सांगतले नाही हा दुसरा विनोद देखील अफलातून आहे .
हसा व निरोगी व्हा !
No comments:
Post a Comment