Sunday, October 22, 2017

केल्याने होत आहे रे

केल्याने होत आहे रे , माझे करणेच चालू आहेच रे !
सर्व प्रथम दीपावली च्या उशिराने हार्दिक शुभेच्छा !
येणारे नवीन वर्ष आपणाला , आपल्या कुटुंबियांना श्वान दंश विरहित व निरोगी जाओ !
असो , मुद्द्याला हात घालतो .
- तुम्ही कितीही लढा , आदळ आपट करा , आपल्या देशात काहीच बदल होणार नाहीत .
- मीच फक्त का या विरुद्ध लढू ? तो नाही लढत , ती नाही लढत , ते नाही लढत . मग मीच का ?
- हे सुधारवण्याचं काम शासन कर्त्यांचं आहे . त्यांनीच यावर उपाय शोधावा
- मी कर भरून सुद्धा या विरुद्ध का म्हणून लढू ? मला सगळं व्यवस्थित मिळालं पाहिजे .
- मला , माझ्या जोडीदाराला ( LIFE PARTNER ला ) , माझ्या मुलांना अजूनही श्वान दंश नाही झाला . मग मी का त्याविरुद्ध लढू ?
- मी लढलो असतो , पण मला वेळच नाही . ( FB वर नेहमी PROFILE PICTURE बदलायला यांना वेळ असतो , whatsapp वर यांना भरपूर वेळ असतो , दारूच्या पार्ट्यांना यांना वेळ असतो . . . . यांना लढायला वेळ नसतो )
अशी व याच आशयाची अनेक वाक्य आपणाला , आपल्या अवती भवती सदा ऐकू येत असतात . त्याचप्रमाणे जो लढत असतो त्याचे खच्चीकरण करण्याचं काम व्यवस्थितपणे अशी वाक्ये ऐकवणारे नेहमीच करीत असतात.
असो , पुन्हा मुद्याला वळतो .
या ई मेल सोबत " महाराष्ट्र टाईम्स " या एका नावाजलेल्या वृत्तपत्रातील २२ ऑक्टोबर , २०१७ च्या अंकात आलेली एक बातमी देत आहे .
तुम्हाला नाही का वाटत कि " केल्याने होत आहे रे " .
आपणाला माहीतच असेल कि गेली अनेक वर्षे मी अश्या प्रकारच्या अनेक सामाजिक प्रश्नांवर लढत आहे .
मी मार्च, २०१३ पासून पोलिसांनी , दुचाकीवर घातले पाहिजे या साठी माझ्या पद्धतीने गल्ली ते लढतोय . ज्याला बऱ्यापैकी यश येताना दिसत आहे .
दुर्दैव म्हणजे बहुतांश भारतीयांना , राजकारण्यांना , प्रतिष्ठीत व्यक्तींना , श्रीमंत व्यक्तींना अनेक नियम पाळणे हे कमीपणाचे वाटते ( BELOW DIGNITY ) . पण माझे ठाम मत आहे की ज्या देशात प्रत्येक व्यक्ती
नियमांचे पालन करण्याचा काटेकोर पणे प्रयत्न करते , त्या देशातील अनेक प्रश्न चुटकीसरशी सुटतात.

पहा तुम्हाला जमलं तर , झोपेचे सोंग घेऊन " प्रतिक्रिया" वादी भारतीय नागरिकाला " क्रिया " वादी व जागरूक भारतीय नागरिक बनविता आलं तर.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet


No comments:

Post a Comment