Sunday, October 22, 2017

दोन महिन्यांच्या मुलाचे कुत्र्याने तोडले लचके

दोन महिन्यांच्या मुलाचे कुत्र्याने तोडले लचके

" दोन महिन्यांच्या मुलाचे कुत्र्याने तोडले लचके "
सोमवार , २३ ऑक्टोबर , २०१७ च्या " नवाकाळ " या एका सुप्रसिद्ध दैनिकाच्या मुखपृष्ठावरील बातमी येथे देत आहे .
" त्याचं काय आहे माहित आहे का ? खरं तर त्या दोन महिन्याच्या मुला ची चूक असणार . कारण त्या मुला ने त्या भटक्या कुत्र्याला दगड मारला असेल अथवा काठीने मारलं असेल , म्हणूनच तो भटका कुत्रा त्या दोन महिन्याच्या मुलाला चावला असेल .
त्याच असं आहे कि भटके कुत्रे कधीही , कोणावर स्वतःहून हल्ला करीत नाहीत , स्वतःहून चावत नाहीत ."
हे असं तुम्हाला प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी यांच्या कडून सदैव ऐकायला मिळेल .
याचाच अर्थ " भारत " या देशात दररोज , अंदाजे १,४१,९६० व्यक्तीं भटक्या कुत्र्यांना दगड मारतात , काठीने मारतात , कारण " भारत " या देशात दररोज , अंदाजे १,४१,९६० व्यक्तींना श्वान दंश होतो .
तुम्हाला प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी यांनी दिलेले हे स्पष्टीकरण योग्य वाटते ? दोन महिन्याचा मुलगा कुत्र्याला दगड मारू शकतो ?
" मेरा भारत महा . . . . . न !


No comments:

Post a Comment