" ठाणे - SMART CITY" मधील
" SMART पुरस्कार नव्हे शिफारसी पुरस्कार "
" महाराष्ट्र टाईम्स " या एक नावाजलेल्या दैनिकातील या आशयाची एक बातमी बुधवार, ४ ऑक्टोबर , २०१७ च्या अंकात छापून आले आहे ती येथे देत आहे.
अश्याच आशयाची बातमी " लोकमत " या दैनिकात देखील आली आहे.
आजपर्यंत नोकरी साठी शिफारस , शाळा प्रवेशासाठी शिफारस , महाविद्यालय प्रवेशासाठी शिफारस , नोकरीत बढतीसाठी शिफारस , नोकरीत बदलीसाठी शिफारस , या व अश्या इतर अनेक प्रकारच्या शिफारसींबद्दल माहित होत , पण या अश्या नवीन शिफारसींबद्दल वाचल्यावर महा आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही .
असे शिफारसी पुरस्कार पदरात पडून घेण्यात " ठाणेकरांना "
- कसे काय हो "भूषण"
वाटते ?
- असा कसा हो " गौरव " झाला असे वाटते ?
हे मला आजतागायत कळलेले नाही .
त्याचप्रमाणे " ठाणे - SMART CITY
" मध्ये जर एवढे " गुणीजन " असते तर
- ठाणे शहरातील परिवहन सेवा एवढी डबघाईला आली नसती ,
- ठाणे शहरातील मैदाने गायब नसती झाली ,
- ठाणे शहरातील तलाव इतिहासजमा नसते झाले ,
- ठाणे शहरात एवढी अनधिकृत बांधकामे नसती झाली ,
- ठाणे शहरात एवढी अस्वछता नसली दिसली ,
- ठाणे शहरात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांची संख्या नगण्य झाली असती ,
- ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा एवढा बोजवारा उडाला नसता ,
- ठाण्यातील नाले हे गटार नसते झाले ,
- ठाणे शहरातील घोडबंदर रोड वर पादचारी पुलांसाठी एवढी वाट पहावी नसती लागली ,
- ठाणे शहरातील गल्ली न बोळात ( जागोजागी ) अनधिकृत फलक ( HOARDINGS ) नसते दिसले
- ठाण्यात सार्वजनिक स्वछता गृहांची वानवा नसती भासली ,
- ठाणे येथील येऊर या नैसर्गिक अरण्यात एवढे अनधिकृत बंगले बांधले नसते गेले ,
- ठाणे येथील रस्ते , पादचारी पूल , अनधिकृत फेरीवाल्यानी नसते अडवले ,
- ठाणे शहरात सण , उत्सवांसाठी रस्ते अडवले नसते गेले ,
- ठाणे शहरात सण , उत्सवांसाठी रस्त्यांवर खड्डे नसते पाडले गेले ,
- ठाण्यातील नाल्यावर अनधिकृत बांधकामे नसती झाली ,
- ठाणे शहरात जागो जागी वाहन तळ उभारले गेले असते ,
- ठाणे शहरातील डोंगरावर , डोंगर अक्षरशः कापून अनधिकृत वस्त्या नसत्या उभारल्या गेल्या ,
- ठाणे शहरात अनधिकृत नळ जोडण्या नसत्या झाल्या ,
- ठाणे शहरातील पदपथांवर फेरीवाले नसते दिसले ,
- ठाणे शहरातील पदपथांवर अनधिकृत टपऱ्या नसत्या दिसल्या ,
- ठाणे शहरातील सुविधा भूखंडांवर अनधिकृत बांधकामे नसती दिसली ,
- ठाणे शहरात अनधिकृत रिक्षांचा , अनधिकृत बसेस चा सुळसुळाट नसता दिसला ,
- ठाण्यातील शासकीय रुग्णालये , आरोग्य सेवा सेवा यांचा बोजवारा नसता वाजला / यांची एवढी वाताहत नसती झाली ,
- ठाणे शहरातील नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी एवढा वेळ नसता लागला ,
- ठाणे शहरातील बालकांना खेळाच्या मैदानाची वानवा नसती भासली ,
- ठाणे शहरातील प्रत्येक शाळा , महाविद्यालये यांना खेळाची मैदाने असती ,
- ठाणे शहरातील रस्त्यावर , रस्ता कमी , खड्डे जास्त अशी परिस्थिती नसती दिसली ,
- ठाणे शहरातील कोपरी पूल एवढी वर्षे नसता रखडला ,
- ठाणे शहरातील अपघाताला आमंत्रण देणारा माजिवाडा येथील वेडा वाकडा उड्डाण पूल नसता बांधला गेला
.
- ठाणे शहरातील अक्षरशः प्रत्येक प्रकल्प पूर्ण व्हायला असे अनेक वर्षे उशीर नसता झाला .
- ठाणे शहरातील अक्षरशः प्रत्येक प्रकल्प पूर्ण व्हायला अवाढव्य असा खर्च ( COST OVER RUN ) नसता आला .
- ठाणे शहरातील श्वान निर्बीजीकरणाची प्रक्रिया हि एक विनोदाचा विषय नसता झाला .
ऐकावे ते नवलच नव्हे वाचावे ते नवलच !
" ठाणे " येथे काय उणे ?
सत्यजित अ शाह - ०९८२११५०८५८
ठाणे
Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up for what is right , Even if
you’re standing alone !
No comments:
Post a Comment