Sunday, October 22, 2017

भटक्या श्वानांना भोजन दान - हसू का रडू ?

" भटक्या श्वानांना भोजन दान " - हसू का रडू ? 

शनिवार , २१ ऑक्टोबर , २०१७ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या एका सुप्रसिद्ध दैनीकामधील एक बातमी येथे देत आहे .
हि बातमी वाचून मला फक्त खालील माहिती आठवली.

- नागपूर शहरात अंदाजे ९०,००० ते १,००,००० एवढी भटक्या कुत्र्यांची संख्या असण्याची शक्यता आहे.

- त्याचप्रमाणे नागपूर शहरात दर वर्षी अंदाजे २५,००० ते ३०,००० व्यक्तींना श्वान दंश होतो .

- श्वान दंशाच्या ज्या काही घटना होतात त्यातील ८० % घटनांमध्ये ३ ते ८ या वयोगटातील बालके सापडतात.

- ही झाली फक्त महाराष्ट्र नावाच्या एका पुरोगामी राज्याच्या उप राजधानीतील श्वान दंशाची आकडेवारी. महाराष्ट्रातील इतर गावात , तालुक्यात , जिल्ह्यात , शहरात देखील याच प्रमाणे श्वान दंशाचे प्रमाण भरपूर आहे.

- " महाराष्ट्र राज्यात " दररोज अंदाजे अंदाजे ७,७०० व्यक्तींना श्वान दंश होतो.

- " भारत " या महासत्ता बनू पाहणाऱ्या देशात दररोज अंदाजे १ ,४१ ,९६० ( एक लाख एक्केचाळीस हजार नउशे साठ ) व्यक्तींना श्वान दंश होतो.

त्याचप्रमाणे " HINDUSTAN TIMES " मधील एक बातमी देखील या ई मेल सोबत जोडत आहे .

- या बातमीप्रमाणे कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत अंदाजे २५,००० भटके कुत्रे असण्याची शक्यता आहे.

- ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत अंदाजे ६०,००० ते ७०,००० भटके कुत्रे असण्याही शक्यता आहे .

- जर हेच प्रमाण धरले तर " महाराष्ट्र " नावाच्या एका पुरोगामी राज्यात अंदाजे एक ते दीड कोटी भटके कुत्रे असण्याची दाट शक्यता आहे.

- " भारत " या देशात अंदाजे २४ ते २६ कोटी भटके कुत्रे असण्याची दाट शक्यता आहे.


No comments:

Post a Comment