Thursday, July 27, 2017

भटका कुत्रा चावल्याने वाडा येथील शिवाजीनगर मधील , प्रणित मुकेश पाटील या आठ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

भटका कुत्रा चावल्याने वाडा येथील शिवाजीनगर मधील , प्रणित मुकेश पाटील या आठ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू " .

कोठे गेले प्राणी मित्र ? कोठे गेल्या प्राणी मैत्रिणी ? 

२८ जुलै, २०१७ च्या " ठाणे वैभव " या ठाणे येथून प्रसिद्ध होणाऱ्या एका प्रतिष्ठित वृत्तपत्रातील हृदयद्रावक बातमी वाचा. 

अनेक भारतीय व्यक्ती जे फक्त उंटावर बसून फक्त आणि फक्त शेळ्या हाकतात , म्हणजेच फेसबुक वरून स्वतः काहीही  " क्रिया " न करता , भटक्या कुत्र्यांमुळे मानव प्राण्यांना  होणाऱ्या त्रासाबद्दल  काहीही  माहिती न घेता " Bhaktya kutryani tumche Kay bighdwal " ..हा असा एक शेरा फेसबुकवरील माझ्या माहितीवर ( POST वर ) लिहिला होता / मारला होता .

गम्मत म्हणजे हा असा शेरा मारणारी व्यक्ती " पुणे " नावाच्या एका शहरात राहते . 

असा हा  शेरा / प्रतिक्रिया देणाऱ्या   निरागस , अज्ञानी  पण वयाने प्रौढ असलेल्या व्यक्तींची मला किंव येते .
खालील आकडेवारी कृपया वाचा :
- "महाराष्ट्र " या राज्यात दररोज अंदाजे ७,७७७ मानव प्राण्यांना श्वान दंश होतो
- "भारत" या देशात दररोज अंदाजे १,४१,९६० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो .
- श्वानदंशाच्या घटनांमधील अंदाजे ८० % घटनांमध्ये ३ ते ८ या वयोगटातील बालके सापडतात. 
- कुत्रीला वर्षातून दोनदा पिल्ले होऊ शकतात . 
- कुत्री एका वेळी अंदाजे १२ पिल्ले देते . म्हणजे दरवर्षी अंदाजे २४ पिल्ले जन्माला घालते . त्यातील फॆ निम्मी पिल्लेच जगतात . म्हणजे एक कुत्री दरवर्षी अंदाजे १२ पिल्ले जन्माला घालते . व या प्रकारे भटक्या कुत्र्यांची संख्या हि भरमसाठ वेगाने वाढत जात आहे. 
माझी प्रत्येक " भारतीयाला " नम्र विनंती आहे कि स्वतःला , स्वतःच्या कुटुंबियांना , स्वतःच्या आप्तेष्टांना श्वानदंश होण्याची वाट पाहू नकात .  



Monday, July 24, 2017

ठाणे जिल्ह्यात दर दिवशी २० कुत्र्यांचा चावा

ठाणे जिल्ह्यात दर दिवशी २० कुत्र्यांचा चावा

हे मी नाही म्हणत , या मथळ्याची बातमी " ठाणे वैभव " या ठाणे येथून प्रकाशित होणाऱ्या एका नामांकित वृत्तपत्रात मुखपत्रात , सोमवार , २४ जुलै, २०१७ रोजी छापून आली आहे .

हे लक्ष्यात ठेवा एक तर या बातमीतील आकडेवारी हि फक्त शासकीय रुग्णालये यांच्याकडील आहे यात खाजगी दवाखाने , खाजगी रुग्णालये यातील आकडेवारी नाही .

याचाच अर्थ एकूण आकडेवारी कितीतरी पटीने जास्त असण्याची शक्यता आहे.

लक्ष्यात घ्या कि या आकडेवारी मध्ये ठाणे शहरातील दररोज होणाऱ्या श्वान दंशाच्या घटनांची आकडेवारी नाही.

आजून काय सांगू ?

माझ्या सारख्याचे या प्रश्नावर झोपेचे सोंग घेऊन झोपलेल्या भारतीय नागरिकांना जागे करण्याचा प्रयत्न सुरु राहणार आहेच .



Saturday, July 22, 2017

पारंपरिक उत्सव " खड्डा उत्सव "

पारंपरिक उत्सव " खड्डा उत्सव " 

मी राहत असलेल्या  रहिवासी संकुलाच्या म्हणजेच ,  हाईड पार्क या रहिवासी संकुलाच्या जवळील रस्त्यावर  " XXXXXXX " कृपे करून  सालाबादप्रमाणे  " खड्डा उत्सव " या एका पारंपरिक उत्सवास सुरुवात झाली आहे.  " XXXXXXX " कृपे करून म्हणजे  कोणाच्या कृपे करून हे आपल्याला सांगण्याची गरज आहे असे  असे मला वाटतं नाही . 

या " खड्डा उत्सव " चे उदघाटन , ज्या खड्यामुळे झाले त्या बहुमूल्य खड्ड्याचं छायाचित्र टिपण्याची अमूल्य संधी मला मिळाली याबद्दल मी  " XXXXXXX "  यांचे खूप खूप आभारी आहे.  

त्याच सोबत आजून एक दुसरं छायाचित्र जोडलं आहे ते छायाचित्र जर तुम्ही व्यवस्थित निरखून  पहिले तर तुम्हाला असे आढळून येईल कि अजून एका जागी अनेक  उदयोन्मुख खड्डे  जन्म घेण्याच्या तयारीत आहेत . 

हे नवजात खड्डे व ज्या खड्ड्यांनी आमच्या रहिवासी संकुलाच्या जवळील " खड्डा उत्सव " चे उदघाटन केले त्या सर्व खड्ड्यांना पाहण्यासाठी आपण सहकुटुंब , सहपरिवार यावं व आमच्या या " खड्डा उत्सव " ची शोभा वाढवावी हि विनंती .  

हा खड्डा उत्सव अगदी दिवाळी  चालू शकेल याची कृपया नोंद घ्यावी . 

ता.क. : या " खड्डा उत्सव " ला भेट देताना रस्त्यातील अनेक खड्डे कृपया सांभाळून या .  . 



फक्त आणि फक्त पोलीस , शासन यांना दूषणं देणं

फक्त आणि फक्त पोलीस , शासन यांना दूषणं देणं
" भारत " या देशातील बहुसंख्य नागरिक कोठेही , कोणतीही अडचण आली तर फक्त , आणि फक्त शासकीय यंत्रणेच्या नावाने बोटं मोडतात , पण एकही व्यक्ती त्या शासकीय यंत्रणेला त्या समस्येची माहिती देखील देत नाही . त्यामुळे तीच समस्या कायमची डोकेदुखी होते आणि मग काय पुन्हा बोटे मोडणे , ( स्वतःच्या ) बायकोसमोर चिडणे , वाहन चालवताना चिडणे या एका चक्रव्यूहातुन सुटका होत नाही .
३/४ दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे ठाणे येथून ऐरोली येथील कार्यालयात , मुलुंड - ऐरोली पुलावरून चार चाकी वाहनाने येत असताना , माझा व्यावसायिक भागीदार त्याची गाडी चालवत होता . त्याने एक वाहतूक नियंत्रक दिवा ( TRAFFIC SIGNAL ) जो लाल झाला होता तो पहिला नाही आणि तो पुढे आला . त्याला म्हटले कि अरे बाबा तू लाल दिवा असतानादेखील तू गाडी न थांबवता पुढे आलास. त्याने त्याचे कारण मला त्याच जागी दुसऱ्या दिवशी आल्यावर दाखवले . त्या ठिकाणी दोन वाहतूक नियंत्रक दिवे होते. एक रस्त्याच्या उजव्या हाताला , रस्ता दुभाजकावर कमी उंचीचा होता व दुसरा रस्त्याला समांतर असा , पण खूप उंचीवर होता. त्या उंचीवर असलेल्या दिव्यावर त्याला लाल दिवा दिसला नाही म्हणून त्याला वाटले कि वाहने जाऊ शकतात म्हणून त्याने वाहन पुढे नेले होते.
त्यानंतर रोज त्या जागी तो मला ते दाखवायचा आणि म्हणायचा कि बघ वाहतूक पोलिसांना तेथे दिवा लागतो कि नाही हे सुद्धा पहायला येत नाही. मी त्याला शांतपणे म्हटलं कि तू एकदा तरी वाहतूक पोलिसींना या बद्दल सांगितले आहे का ? त्याचे उत्तर नाही असे होते.
आज देखील; तेच ठिकाण , तोच संवाद . ( वेळ सकाळचे ९.२५ वाजता ) त्याला म्हटलं गाडी कार्यालयाकडे जाण्यासाठी डावीकडे न वळवता सरळ घे . वाहन सरळ ऐरोली वाहतूक पोलीस कार्यालयात घेतली , तेथे उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिसांना हि गोष्ट सांगितली . त्यांनी सगळं ऐकून घेतलं . ते म्हणाले कि CMS नावाची एक खाजगी संस्था वाहतूक नियंत्रक दिवे पाहतात . त्यांनी आमच्या समोर त्या CMS ला दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला , परंतु होऊ शकला नाही. त्या वाहतूक पोलिसाने माझा संपर्क क्रमांक टिपून घेतला. आम्ही आमच्या कार्यालयात आलो . आमचं दिनक्रम सुरु झाला.
सकाळी १०.१४ मिनिटांनी ऐरोली वाहतूक पोलीस शाखेतील एक पोलीस श्री. गवळी यांनी त्यांच्या भ्रमणध्वनी वरून माझ्याशी संपर्क साधला व असे सांगितले कि CMS या संस्थेतील श्री. सागर यांच्याशी त्यांनी संपर्क साधला आहे . त्या वाहतूक नियंत्रक दिव्यातील एक बल्ब गेला आहे त्यामुळे हा असा घोळ होत आहे . तो वाहतूक नियंत्रकी दिवा खूप उंचीवर असल्याने त्यांना जर आज उंच शिडी मिळाली तर ते आजच नवीन दिवा लावतील अथवा ते काम सोमवारी होईल.
आमची फक्त ५ ते ७ मिनिटे हि तक्रार करण्यात गेली , पण योग्य त्या शासकीय यंत्रणेपर्यंत आम्ही तक्रार पोहचवली व जागरूक नागरिकाचे एक कर्तव्य पार पाडले.
आजच्या घडीला फेसबुक वर " उंटावरून शेळ्या राखणारे अथवा स्वतः काहीच " क्रिया " न करता फक्त आणि फक्त " प्रतिक्रिया " देत बसणारे अनेक थोर " भारतीय नागरिक " आढळुन येतात . गंमत म्हणजे असे अनेक थोर " भारतीय नागरिक " दररोज नित्य नियमाने " GGOD MORNING , GOOD AFTERNOON , GOOD MID AFTERNOON , GOOD EVENING , GOOD NIGHT , GOOD MID NIGHT , GOOD EARLY MORNING " त्यांच्या फेसबुक वर टाकत असतात , त्याचप्रमाणे " सुविचार " देखील न चुकता टाकतात .
असो , समस्या योग्य त्या शासकीय व्यवस्थेकडे पोहचवणे हे जर नागरिकाने केले तर अनेक समस्या गंभीर रूप धारण न करता मिटतील.
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet

Friday, July 21, 2017

भटक्या कुत्र्यांच्या त्रासाचा प्रश्न येत्या अधिवेशनात

भटक्या कुत्र्यांच्या त्रासाचा प्रश्न येत्या अधिवेशनात

ठाणे शहराचे लाडके व  सुसंस्कृत , सुशिक्षित , समाजकारणी असे आमदार श्री. संजय केळकर ज्यांना आम्ही केळकर साहेब या नावाने संबोधतो ( दादा , नाना , मामा , भाऊ , ...... .... .... .... या अश्या नावाने नाही संबोधत )  ते  माझ्या सारख्या सामान्य पण जागरूक नागरिकांच्या प्रत्येक लढाईत मनापासून साथ देतात व योग्य मार्गदर्शन देखील करतात .

मी गेले ५ ते ६ वर्षे मानव प्राण्यांना अनेक प्रकारे त्रास देणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या , त्याच प्रमाणे अनिर्बंध वेगाने वाढणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येच्या समस्येवर माझ्या लढाईची केळकर साहेबांना इत्यंभूत माहिती आहेच . गेली अंदाजे ३ ते ४ महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अधिवेशनात हा प्रश्न मांडण्याच्या प्रयत्नांना केळकर साहेबांना यश येत नव्हते .

येत्या सोमवार पासून सुरु होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अधिवेशनात पुन्हा केळकर साहेब हा अतिशय महत्वाचा प्रश्न मांडणार आहेत . त्या बद्दल सांगण्यासाठी व त्याचप्रमाणे या लढाईत मी पुढे कसे काय मार्गक्रमण करायचे याचे योग्य मार्गदर्शन करण्यासाठी केळकर साहेबांनी मला गुरुवार , २० जुलै , २०१७ त्यांच्या कार्यालयात बोलावले होते . त्यांनी  मधल्या काळात   या प्रश्नाबद्दल  जमा केलेली माहिती पाहून मला केळकर साहेबांचे फार कौतुक वाटले.

तुम्हीच सांगा कि या आजच्या युगात कोण आमदार माझ्या सारख्या सामान्य नागरिकाला ला लढाईत योग्य मार्गदर्शन करण्यासाठी स्वतःहून बोलावतो ?

असेच समाजकारणी आमदार , खासदार जर भारत देशात सगळीकडे  असतील तर भारत देश  खरचं  जागतिक पातळीवर फार पुढे जाऊ शकतो  .

आपल्याला मी या भटक्या कुत्र्यांमुळे मानवाला  भोगाव्या लागणाऱ्या  समस्येविषयी थोडक्यात सांगतो :  

- ठाणे शहरात दररोज अंदाजे ६० ते ८० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो .
- महाराष्ट्र या राज्यात  दररोज अंदाजे ७,७७७ मानव प्राण्यांना श्वान दंश होतो .
- भारत या देशात दररोज अंदाजे १,४२,९६०  मानव प्राण्यांना श्वान दंश होतो .
- श्वान दंशाच्या घटनांपैकी ८० % घटनांमध्ये ३ ते ८ या वयोगटातील बालके सापडतात .
- श्वान दंशावर योग्य वेळेत , योग्य उपचार नाही केले, तर रेबीज हा जीवघेणा आजार होतो , व त्या रेबीज ग्रस्त व्यक्तीचा मृत्यू ओढावतो कारण रेबीज वर औषध नाही .
- कुत्र्यांच्या मल , मूत्रामुळे देखील "लेप्टोस्पायरोसिस" हा एक जीवघेणं आजार देखील होऊ शकतो . - भटक्या कुत्र्यांच्या मागे लागण्यामुळे अनेक अपघात होतात , अनेक मानव प्राण्यांना त्यात जीव देखील गमवावा लागतो .
S
tand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet


Sunday, July 9, 2017

" नो पार्किंग " व " पार्किंग " फलक एकाच ठिकाणी - एक जागतिक आश्चर्य

" नो पार्किंग " व " पार्किंग " फलक एकाच ठिकाणी - एक जागतिक आश्चर्य

शुक्रवार , ८ जुलै, २०१७ रोजी सायंकाळी एक जगावेगळी व अजब गोष्ट " ठाणे " शहरातील , ठाणे महानगर पालिकेच्या मुख्यालयाच्या समोरच्या रस्त्यावर पाहिली. 

या ई मेल सोबत जोडलेली हि छायाचित्रे कृपया ध्यान देऊन पहा . डावीकडे एक  " नो पार्किंग " चा फलक दिसत आहे त्यावर ठा म पा  असे वर लिहिलेले दिसत आहे व खाली दोन्ही बाजूला ५० M असे बाणाने दर्शविले आहे . याचा अर्थ त्या फलकाच्या दोन्ही बाजूला ५० मीटर अंतरापर्यंत गाड्या लावू नये असा निघतो .  

त्या " नो पार्किंग " च्या  फलकांच्या उजव्या हाताला अंदाजे ३ मीटर अंतरावर एक "पार्किंग" चा फलक लावला आहे . त्यावर चार चाकीच छायाचित्र आहे , व त्यावर नो पार्किंग च्या फलकाच्या दिशेने एक बाण दाखविला आहे . त्यावर TMC असे लिहिले आहे . याचाच अर्थ बाण  दाखविला आहे त्या दिशेला चार चाकी गाड्या उभ्या करू शकतो . 

हे असे " नो पार्किंग "  व " पार्किंग " फलक एकाच ठिकाणी असण्याचा जागतिक विक्रम बहुतेक जगात कोणत्याही शहरात अजूनपर्यंत झाला नसेल.  " गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड " यांनी  या अश्या अनोख्या जागतिक विक्रमाची  जरूर नोंद घ्यावी अशी इच्छा . 

म्हणूनच  " ठाणे " शहराला बहुतेक " स्मार्ट सिटी " असे म्हणतात का ? 

अश्या वेळी वाहन चालकाने वाहन कोठे उभे करावं याबद्दल  ठा म पा  व ठाणे  वाहतूक पोलीस शाखा , आम्हा नागरिकांना मार्गदर्शन करेल का ? 

खरं तर  ठा म पा कडून जागो जागी गाड्यांना उभे करण्याची ( पार्किंग ची ) सोय उपलब्ध  करून देणं गरजेचं आहे , पण त्याचा अभाव असताना या प्रकारे जर नागरिकांना संभ्रमात टाकले तर , नागरिकांनी वाहने कोठे लावायची ? 

राजकीय पक्षाचे नेते , कार्यकर्ते हे त्यांच्या राजकीय  पक्षांची चिन्ह वाहनांवर लावून अथवा चित्र विचित्र अश्या पद्धतीने वाहन पाटीवर वाहन क्रमांक लिहून  कोठेही वाहने उभी करू शकतात , पण नागरिकांनी काय करावे या बद्दल थोडे मार्गदशन कारवाई हि विनंती . 






Saturday, July 8, 2017

बोलावा विठ्ठल

" बोलावा विठ्ठल "

आषाढी एकादशी आली कि मला वेध लागतात " बोलावा विठ्ठल " , " तीर्थ विठ्ठल " या अश्या भक्ती रसाने ओथंबून भरलेल्या कार्यक्रमाला जाण्याचे .

शुक्रवार , ७ जुलै, २०१७ रोजी , ठाणे पश्चिम येथील गडकरी रंगायतन येथे " बोलावा विठ्ठल " हा कार्यक्रम पाहण्याचे भाग्य मला लाभले.

भक्ती रसात सर्व श्रोत्यांना न्हाऊ घालणारे गायक होते , श्री. आनंद भाटे , पं . श्री. रघुनंदन पणशीकर , श्री. जयतीर्थ मेवुंडी .

कार्यक्रमाची सुरवात या तिन्ही गायकांनी " जय जय रामकृष्ण हरी ..... " या अभंगाने केली .

त्या नंतर , श्री. आनंद भाटे यांनी खालील अभंग गायले ..
- इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी .....
- तीर्थ विठ्ठल , क्षेत्र विठ्ठल .......
- चला पंढरीसी जाऊ ......
- भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ......
- जोहार माय बाप जोहार ..... या अभंगाने त्यांनी शेवट केला .

त्यांनी सगळे अभंग अप्रतिम असे गायले हे काही वेगळं सांगायची गरज मला वाटत नाही .

त्यानंतर मध्यंतर ( म्हणजे आजच्या प्रचलित , शुद्ध मराठीत INTERVAL ) झाले .

मध्यंतरानंतर पं श्री. रघुनंदन पणशीकर यांनी खालील अभंग गायले .
- अहो नारायणा , सांभाळ रे आम्हा दीना .......
- जणी म्हणे पांडुरंगा माझ्या जिव्हीच्या जिवलगा .......
- बोलावा विठ्ठल , पहावा विठ्ठल .......
- पदमनाभा नारायणा .......

पं श्री. रघुनंदन पणशीकर यांना मी पहिल्यांदा ऐकले .
ते स्वर्गीय किशोरी ताई आमोणकर यांचे शिष्य आहेत . त्यांनी देखील आगळे अभंग अप्रतिम असे गायले .

त्यानंतर श्री. जयतीर्थ मेवुंडी यांनी खालील अभंग गायले

- सावळे सुंदर रूप मनोहर .........
- रंगा बारो , पांडुरंग बारो , श्रीरंग बारो .........
- लैणारी लैणारी मागणं देवा .........
- पोटापुरतं देई विठ्ठला .........
- करुणी सौरंगा कृष्णा ......... ( कन्नड अभंग )
- जो भजे हरी को , सदा सो ही करम फल पावे ......... या अभंगाने श्री. जयतीर्थ मेवुंडी यांनी कार्यक्रमाची सांगता केली

त्यांनी सगळे अभंग अप्रतिम असे गायले हे काही वेगळं सांगायची गरज मला वाटत नाही .

एक फार मोठ्ठा आनंद झाला कि सध्या कार्यक्रमात म्हणे रंगमंचावरील गायक फक्त ओठ हलवितात , पण संपूर्ण गाण्याची ध्वनिमुद्रिका लावलेली असतेे असे ऐकिवात आले आहे . हे असे म्हणे मराठवाड्यातील एका कार्यक्रमात मराठीतील सध्याच्या एक सुप्रसिद्ध संगीतकार जोडीने केले होते , त्याच प्रमाणे मध्ये एक कॅनडाचा गायक जस्टीन याने नवी मुंबई येथे एका कार्यक्रमात हेच केले होते असे कळाले होते.

असो या कार्यक्रमात तिन्ही गायक गाणं चालू असताना मध्येच आवाजाच्या पातळीबद्दल काही टिप्पणी करायचे तेंव्हा गाणं थांबलेलं असायचे . याचाच अर्थ गायक स्वतः गात होते.

खरे खुरे अभंग ऐकून भक्ती संगीताने सारेच न्हाऊन गेलो होतो .

या एका मराठमोळ्या कार्यक्रमाला माझा व्यावसायिक भागीदार ( जो तेलगू आहे ) मनापासून आला होता , नुसता आला नव्हता तर त्या अभंगात न्हाऊन गेला होता. त्याचप्रमाणे बऱ्यापैकी कन्नड भाषिक व्यक्ती देखील आले होते.

तळ टीप : वाईट असे वाटले कि तरुण पिढी प्रेक्षक वर्गात अभावाने दिसत होती. तरुण पिढी कार्यक्रमात फक्त ओठ हलविणाऱ्या कॅनडाचा गायक जस्टीन याच्या मागे वेड्यासारखी व हजारो रुपयांची तिकिटं काढून फक्त ओठ हलविताना त्याला पाहायला गर्दी केली होती हे आठविल्यावर देशाच्या भवितव्याची काळजी वाटते.





ठाणे शहरात वर्षभरात १४,००० ( चौदा हजार ) श्वान दंश

" ठाणे शहरात वर्षभरात १४,००० ( चौदा हजार ) श्वान दंश " 

आज , शनिवार , ८ जुलै, २०१७ रोजी सकाळी " ठाणे वैभव " नावाचे ठाणे येथून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र वाचण्यास घेतले आणि एक फार मोठ्ठा धक्का बसला . पहिल्याच पानावर " ठाणे रुग्णालयात अँटी रेबीजचा तुटवडा " असा मथळा असलेली एक धक्कादायक बातमी वाचली . 

या बातमीच्या सुरवातीलाच " ठाणे शहरात वर्षभरात १४,००० ( चौदा हजार ) श्वान दंश " अशी एक धक्कादायक आकडेवारी देखील वाचली . याचाच अर्थ " ठाणे शहारत दररोज अंदाजे ३८ / ३९ व्यक्तींना श्वान दंश होतो " हे मी नाही सांगत तर हे शासकीय आकडेवारीनुसार कळते. 

खरं  तर  हि आकडेवारी शासन फक्त शासकीय रुग्णालये , आरोग्य केंद्रे यांच्याकडून घेते . यात खासगी रुग्णालये , खाजगी डॉक्टर यांच्या कडील आकडेवारी विचारात घेतलेली नसते .  खरं तर ती आकडेवारी देखील विचारात घेतली तर  " ठाणे शहारत दररोज अंदाजे ८०  / ९० व्यक्तींना श्वान दंश होत असतो  " . या आकडेवारीत काहीही अतिशयोक्ती नाही. 

श्वान दंश , रेबीज , हे एवढेच भटक्या कुत्र्यांकडून होत नसतात तर , त्यांच्या मूत्र , व विष्ठे मुळे लेप्टो स्पायरोसिस हा जीवघेणा रोग  देखील पसरतो .  हे लक्ष्यात घ्या कि डोंबिवली सारख्या शहरात दररोज अंदाजे अडीच टन एवढी भटक्या कुत्र्यांची विष्ठा भर रस्त्यात , व इतर सार्वजनिक ठिकाणी जमा होते. 

हा एक प्रश्न गेली ६ ते ७ वर्षे अथकपणे गल्ली ते दिल्ली नेऊन देखील शासन दरबारी आमच्या सारख्यांचे ( मी , डॉक्टर आनंद हर्डीकर , डॉक्टर उदय कुलकर्णी , निलेश आंबेकर )  हाल " कुत्रे " देखील खात नाहीत . 

भारतीय नागरिक खालील गोष्ट नेहमी दुर्लक्षितो हि एक फार मोठी दुर्दैवी सत्य स्थिती आहे.  

Evil Triumphs When Good People Sit Quiet