Wednesday, January 18, 2017

" हाताबाहेर जात असलेला भटक्या कुत्र्यांचा दहशतवाद " - STRAY DO MENACE IN INDIA

नमस्कार , सुंदर संध्याकाळ ,

" हाताबाहेर जात असलेला भटक्या कुत्र्यांचा दहशतवाद  " 

दिनांक ०५. ०१. २०१७ रोजी , पहाटे अंदाजे ४.०० वाजता ,  विमानतळावर पोहचण्यासाठी ,  मी राहत असलेल्या ठाणे येथील हाईड पार्क या  रहिवासी संकुलाच्या बाहेर , टॅक्सी ची वाट पाहत होतो . माझं सगळं लक्ष्य रस्त्यावर होते , कारण टॅक्सी अजूनही आलेली नव्हती. 

नेहमी प्रमाणे रस्त्यावर दिवे नव्हतेच .  रामसे बंधू यांच्या कोणत्याही चित्रपटात शोभेल असे भयावह वातावरण होते. आजूबाजूला भुंकणाऱ्या कुत्र्यांचा भरपूर आवाज येत होता . दिवसातील २४ तास , कोठे ना कोठे भटक्या कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येतच  असतो त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष्य करीत होतो. पण हळू हळू हा भुंकण्याचा आवाज माझ्या कडे सरकत होता . मी त्या आवाजाकडे पहिले तर , मला अक्षरशः थंडीत घाम फुटला . ८ ते १० भटके कुत्रे माझ्यावर , रिंगण बनवून हल्ला करण्यासाठी पुढे  पुढे सरकत होते ( जसे चित्रपटात पोलीस डाकू ला घेरून पुढे सरकतात अगदी त्याच प्रमाणे ) .मी न धावता , सावकाश पणे आमच्या रहिवासी संकुलाच्या आत आलो . आमच्या पहारेकरी असलेल्या व्यक्तीला बोलावले . त्यांच्या हातात भक्कम काठी असतेच . त्यांना घेऊन पुन्हा टॅक्सी ची वाट पाहण्यासाठी रस्त्यावर आलो . टॅक्सी येई पर्यंत त्यांना थांबण्यास सांगितले . काही वेळातच टॅक्सी आली आणि मी श्वानदंशाशिवाय माझ्या व्यावसायिक कामासाठी विमानतळावर पोहचलो. 

या सोबत दिलेले छायाचित्र मीच टिपले आहे , पण ते १६. ०१. २०१७ रोजी , रात्री अंदाजे ११.३०  वाजता मी राहत असलेल्या हाईड पार्क या  रहिवासी संकुलात शिरताना टिपले आहे. 

सध्या बहुसंख्य भारतीय या भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरत आहेत 

असो माझी लढ़ाई सुरु आहेच . 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet 





No comments:

Post a Comment