Monday, January 2, 2017

मराठी भाषा संवर्धन ऐवजी स्मृती पंधरवडा होतोय


प्रति ,
प्रत्येक मराठी माणूस ,

नमस्कार , आणि सुंदर दुपार ,

माझ्या मनातील खंत मी येथे मांडत ( ओकत ) आहे .

महाराष्ट्र राज्य शासन , " १ ते १५ जानेवारी , २०१७ या दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा " साजरा करणार आहे .

कृपया खाली दिलेल्या दोन बातम्या वाचा .
________________________________________________
बातमी क्रमांक . १
मुंबई, १७ डिसेंबर (हिं.स.) : मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व संवर्धनासाठी तसेच अमराठी भाषिकांना मराठी भाषेचा परिचय व्हावा, यासाठी १ ते १५ जानेवारी २०१७ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मराठी भाषा विभागामार्फत साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये राज्यातील सर्व शासकीय, निम-शासकीय कार्यालय, महामंडळे तसेच राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील सर्व कार्यालये, मंडळे सार्वजनिक उपक्रम सर्व खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये आदी सर्व संस्थांमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.
या पंधरवड्यात विविध परिसंवाद, व्याख्याने, विविध स्पर्धा, कार्यशाळा, शिबीरे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, काव्य वाचन आणि कथाकथन स्पर्धा, अमराठी भाषिकांसाठी मराठी भाषेचा सुलभ पद्धतीने परिचय करुन देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन आदी कार्यक्रम होणार आहेत.
बातमीचा स्रोत ( SOURCE ) ( SOURCE ) : ( http://m.dailyhunt.in/news/india/marathi/hindusthan+samachar+marathi-epaper-hsmara/marathi+bhasha+sanvardhan+pandharavada+1+te+15+janevari+daramyan+sajara+honar-newsid-61523100 )

बातमी क्रमांक . २
मुंबई/ठाणे/रायगड
मराठी भाषा संवर्धन ऐवजी स्मृती पंधरवडा होतोय
By pudhari | Publish Date: Dec 28 2016 1:00AM | Updated Date: Dec 28 2016 1:00AM
मुंबई : प्रतिनिधी
वर्षाची सुरवात मराठी भाषा संवर्धनाच्या पंधरवड्यातून करुन वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे असे असताना मात्र राज्यात पहिल्या पंधरा दिवसात कार्यक्रम केले जात आहेत. त्यामुळे मराठी भाषेचा स्मृती पंधरवडा म्हणून राज्यभर साजरा केला जात आहे अशी टिका मराठी अभ्यास केंद्राने केली आहे.
2008 साली मुंबई विद्यापीठाकडे पाठपुरावा करून मराठी अभ्यास केंद्राने सर्व महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठाच्या सर्व विभागांमध्ये मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळ अनिवार्य करण्यासंबंधातले परिपत्रक काढून घेतले. त्याचा पुढचा टप्पा म्हणून विद्यापीठाने 2013 साली मराठी अभ्यास केंद्राने तयार केलेली मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळांच्या उपक्रमांची वर्षभराच्या उपक्रमाची यादी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे जारी करण्यात आली. 50हून अधिक असलेले हे उपक्रम वर्षभर राबवायचे आहेत. पण भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने त्यातले काही उपक्रम अग्रक्रमाने करता येणे शक्य आहे. तरीही काही मोजके कार्यक्रम पंधरवड्यात उरकले जात आहेत.
भाजप सेनेचे युती सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 1 जानेवारी ते 15 जानेवारी केला जात आहे. राज्य शासनाच्या वतीने सर्व विद्यापीठांना पत्रे पाठवली जातात. विद्यापीठांकडून याबाबत महाविद्यालयांनाही सूचना दिली जाते. नववर्षाच्या पहिल्या 15 दिवसात व्याख्याने वगैरे आयोजित करून पंधरवडा साजरा केला जातो. त्यामुळे मराठी भाषा स्मृती पंधरवड्याचे रूप आले आहे. हा जुलमाचा रामराम नको असेल तर शासनाला नेहमीच्या सोहळे करण्याच्या मानसिकतेतून बाहेर यायला हवे असेही मराठी अभ्यास केंद्राने म्हटले आहे.
केवळ पंधरवड्यात विविध परिसंवाद, व्याख्याने, विविध स्पर्धा, कार्यशाळा, शिबीरे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, काव्य वाचन आणि कथाकथन स्पर्धा, अमराठी भाषिकांसाठी मराठी भाषेचा सुलभ पद्धतीने परिचय करुन देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन आदी कार्यक्रम करण्याबरोबर वर्षभर विविध कार्यक्रम राबवावेत अशी मागणी मराठी अभ्यास केंद्राने केली आहे.विद्यापीठाने तयार केलेल्या विविध कार्यक्रमाची यादी सरकारने घेवून त्यांची वर्षभर अंमलबजावणी करावी अशी मागणीही मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी केली आहे.

बातमीचा स्रोत ( SOURCE ) : ( http://www.pudhari.com/news/mumbai/115733.html )
________________________________________________

लक्ष्यात घ्या कि मराठी मातित मराठी भाषेचे संवर्धन करावी लागते , यात च सगळं सामावलं आहे. तामिळनाडू मध्ये कधीही तामिळ भाषेचे , गुजरात मध्ये कधीही गुजराथी भाषेचे , जर्मनी मध्ये जर्मन भाषेचे , चीन मध्ये चिनी भाषेचे , ........ कधीही संवर्धन आठवडा , पंधरवडा , महिना वगैरे साजरा करून भाषेचे पुनर्रुजीवन केलेले कधी ऐकिवात नाही .

मग मराठी भाषेलाच ते सुद्धा मराठीच्या मायभूमीत असे करण्याची का निकड भासते याचा कधी तरी मराठी माणसाने विचार केला आहे ?
याचे कारण एकदम सोप्प आहे ( हेच वाक्य मराठी माणूस कसे बोलेल ते पहा " याचे REASON एकदम SIMPLE आहे " ) . माझे हेच म्हणणे आहे की , दोन / अनेक मराठी व्यक्ती अव्यावसायिक कामासाठी एकत्र जमतात , तेंव्हा देखील ते संभाषणात शक्य तितके शुद्ध मराठी शब्द, वाक्ये का नाही वापरत ? दुसरा हसेल म्हणून ? याचा अर्थ अश्या व्यक्तींना स्वतःच्या आई ची देखील लाज वाटते ? अहो मराठी हि आपली मातृ भाषा आहे. या भाषेत बोलताना इंग्रजी शब्द , इंग्रजी वाक्ये याचा का हो भरमसाठ वापर करायचा करायचा ?

आजकाल , आकाशवाणी वरील मराठी कार्यक्रम , दूरदर्शनवरील मराठी कार्यक्रम , मराठी मालिका , मराठी बातम्या , मराठी जाहिराती , या व इतर अनेक ठिकाणी इंग्रजीचे भयावह असे अतिक्रमण झाले आहे. जसा संगणकात जंतू ( VIRUS ) शिरतो , अथवा शरीरात कर्करोगाचा जंतू ( CANCER ) शिरतो , व सगळ्याचा नायनाट करतो , तसे काही मराठी भाषेच्या बाबतीत झाले आहे.

अहो आज सकाळी आकाशवाणी वरील एका मराठी कार्यक्रमात एका वाक्यात ROMANTIC हा एक इंग्रजी शब्द त्याच प्रमाणे ENJOY हा एक इंग्रजी शब्द ऐकला आणि मला राहवलं नाही म्हणून हे लिहिण्याचा सगळा प्रपंच.

१. ) ROMANTIC = शृंगारिक , ( तुम्हाला काय वाटतं कि शृंगार हा ROMANTIC नसतो ? )
२. ) गाणे ENJOY करा = गाण्याचा आस्वाद लुटा ( तुम्हाला काय वाटतं कि गाण्याचा आवड घेतल्यावर ENJOY करता येत नाही ? )

अहो तुम्हाला जर झुणका भाकर खायची आहे आणि झुणका BREAD , दिल तर कसं वाटेल ?

अहो कधी तरी तुम्ही दोन व्यक्तींना इंग्रजी बोलताना १. ) COME ON WE WILL GO FOR नाश्ता / जेवण २. ) I WILL DROP YOU घरी ........ वगैरे असे ऐकले आहे ? नाही ना ? मग मराठी माणसालाच , मराठी माणसात , १०० % मराठी बोलण्याची लाज का वाटते ? का मराठीत शब्द नाहीत ? अहो मराठी सारखी प्रघल्भ व गोड भाषा नाही . का हो मराठी माणसाला , मराठी बोलताना इंग्रजी शब्द , इंग्रजी वाक्ये याच्या सदा न कदा कुबड्या घ्याव्या लागतात ?

एक शेवटचे , हे सगळं मी एक अमराठी माणूस असून देखील हि हि मला वाईट वाटते .

इंग्रजी शब्दांना समानार्थी शब्द हवे असतील तर मला विचारा , माझ्या पोतडीत अंदाजे २५०० नेहमी वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांचे मराठी शब्द आहेत.

मराठीची बोला , मराठीत लिहा , मराठीला जगवा ,

No comments:

Post a Comment