" मराठी भाषेचे संवर्धन गरजेचे ! "
रविवार , ८ जानेवारी, २०१७ च्या " ठाणे वैभव " या वृत्तपत्रातील हि बातमी येथे देत आहे.
मी एक अमराठी ( जातीने ) असून देखील , गेली अनेक महिने , मी मराठी तील इंग्रजीच्या अतिक्रमणाविरुद्ध लढत आहे.
मी याद्वारे , प्रत्येक मराठी माणसाला एक विनंती करीत आहे.
प्रति ,
प्रत्येक मराठी माणूस ,
नमस्कार , आणि सुंदर दुपार ,
माझ्या मनातील खंत मी येथे मांडत ( ओकत ) आहे .
महाराष्ट्र राज्य शासन , " १ ते १५ जानेवारी , २०१७ या दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा " साजरा करणार आहे .
लक्ष्यात घ्या कि मराठी मातित मराठी भाषेचे संवर्धन करावी लागते , यात च सगळं सामावलं आहे. तामिळनाडू मध्ये कधीही तामिळ भाषेचे , गुजरात मध्ये कधीही गुजराथी भाषेचे , जर्मनी मध्ये जर्मन भाषेचे , चीन मध्ये चिनी भाषेचे , ........ कधीही संवर्धन आठवडा , पंधरवडा , महिना वगैरे साजरा करून भाषेचे पुनर्रुजीवन केलेले कधी ऐकिवात नाही .
मग मराठी भाषेलाच ते सुद्धा मराठीच्या मायभूमीत असे करण्याची का निकड भासते याचा कधी तरी मराठी माणसाने विचार केला आहे ?
याचे कारण एकदम सोप्प आहे ( हेच वाक्य मराठी माणूस कसे बोलेल ते पहा " याचे REASON एकदम SIMPLE आहे " ) . माझे हेच म्हणणे आहे की , दोन / अनेक मराठी व्यक्ती अव्यावसायिक कामासाठी एकत्र जमतात , तेंव्हा देखील ते संभाषणात शक्य तितके शुद्ध मराठी शब्द, वाक्ये का नाही वापरत ? दुसरा हसेल म्हणून ? याचा अर्थ अश्या व्यक्तींना स्वतःच्या आई ची देखील लाज वाटते ? अहो मराठी हि आपली मातृ भाषा आहे. या भाषेत बोलताना इंग्रजी शब्द , इंग्रजी वाक्ये याचा का हो भरमसाठ वापर करायचा करायचा ?
आजकाल , आकाशवाणी वरील मराठी कार्यक्रम , दूरदर्शनवरील मराठी कार्यक्रम , मराठी मालिका , मराठी बातम्या , मराठी जाहिराती , या व इतर अनेक ठिकाणी इंग्रजीचे भयावह असे अतिक्रमण झाले आहे. जसा संगणकात जंतू ( VIRUS ) शिरतो , अथवा शरीरात कर्करोगाचा जंतू ( CANCER ) शिरतो , व सगळ्याचा नायनाट करतो , तसे काही मराठी भाषेच्या बाबतीत झाले आहे.
अहो काही दिवसांपूर्वी , सकाळी आकाशवाणी वरील एका मराठी कार्यक्रमात एका वाक्यात ROMANTIC हा एक इंग्रजी शब्द त्याच प्रमाणे ENJOY हा एक इंग्रजी शब्द ऐकला आणि मला राहवलं नाही म्हणून हे लिहिण्याचा सगळा प्रपंच.
१. ) ROMANTIC = शृंगारिक , ( तुम्हाला काय वाटतं कि शृंगार हा ROMANTIC नसतो ? )
२. ) गाणे ENJOY करा = गाण्याचा आस्वाद लुटा ( तुम्हाला काय वाटतं कि गाण्याचा आवड घेतल्यावर ENJOY करता येत नाही ? )
अहो तुम्हाला जर झुणका भाकर खायची आहे आणि झुणका BREAD , दिल तर कसं वाटेल ?
अहो कधी तरी तुम्ही दोन व्यक्तींना इंग्रजी बोलताना १. ) COME ON WE WILL GO FOR नाश्ता / जेवण २. ) I WILL DROP YOU घरी ........ वगैरे असे ऐकले आहे ? नाही ना ? पण दोन मराठी व्यक्ती " अरे चल LUNCH ला जाऊया असे हमखास म्हणतात. मग मराठी माणसालाच , मराठी माणसात , १०० % मराठी बोलण्याची लाज का वाटते ? मराठीत शब्द नाहीत का ? अहो मराठी सारखी प्रघल्भ व गोड भाषा नाही . का हो मराठी माणसाला , मराठी बोलताना इंग्रजी शब्द , इंग्रजी वाक्ये याच्या सदा न कदा कुबड्या घ्याव्या लागतात ?
दुसरे उदाहरण जरा HAIRCUT करून येतो असे मराठी माणूस म्हणतो . त्या ऐवजी केस कापून असे का नाही म्हनत ?
अजून एक भन्नाट वाक्य अरे मी " टाईमावर " आलो होतो. " टाईमावर " हा शब्द कोणत्या शब्दकोशात आहे ?
असो, श्रि. अमिताभ बच्चन अथवा श्रि. अनुपम खेर हे हिंदी बोलताना शुध्द हिंदीतच बोलतात . इंग्रजीच्या कुबड्या घेत नाहित.
आज काल अतिक्रमण हा शब्द सगळ्यांच्याच परिचयाचा आहे व आपण आजूबाजूला अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेले उघड्या डोळ्याने, हताश होऊन पाहतो. पण आपल्या मातृभाषेवर होत असलेले अतिक्रमण मात्र शांतपणे सहन करतो व आपण त्या अतिक्रमणात आनंदाने सहभागी देखील होतो.
माझ्या सारखा एखादा अति सामान्य नागरिक या अतिक्रमणाविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा बाकीचे अरे हे असे होणारच म्हणून त्या अतिक्रमणास जणू मूक संमतीच देतात. काय म्हणालात जरा समजावून सांगू ? हे अतिक्रमण आहे इंग्रजी भाषेचे जे आपल्या ( मराठी माणसाच्या ) मातृभाषेवर ( आजच्या मराठी भाषेतील MOTHER TONGUE वर ) होत आहे , नव्हे वाढतच आहे.
उदाहरणार्थ - हि अनेक मराठी व्यक्तींची नेहमीची काही वाक्ये १. ) PAPER ( वर्तमानपत्र ) आला / आले का ? २. ) FAN ( पंखा ) लाव . ३. ) LIGHT ( दिवा ) बंद कर . ४. ) BREAKFAST ( नाश्ता ) करून येतो . ५. ) SORRY ( माफ कर ) LATE ( उशीर ) झाला .
यावर उपाय म्हणून मी नेहमी वापरले जाणारे इंग्रजी शब्द व त्यांना सोप्पे पर्यायी मराठी शब्द असा शब्द कोश बनवणे चालू केला आहे. आश्चर्य म्हणजे गेल्या १२ महिन्यात अंदाजे २५०० शब्द लिहून झाले आहेत. पोटा पाण्याचा व्यवसाय सांभाळून हे सगळ करीत असतो .
माझे असे म्हणणे आहे कि प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी पर्यायी शब्द मिळू शकणार नाही . उदाहरणार्थ - LAPTOP , FACEBOOK , WHATSAPP वगैरे .
माझे विचार वाचून चीड आली असेल तर मला माफ करा. पण मातृभाषेची हि दयनीय अवस्था पाहवत नाही .
एक शेवटचे , हे सगळं मी एक अमराठी माणूस असून देखील हि हि मला वाईट वाटते .
इंग्रजी शब्दांना समानार्थी शब्द हवे असतील तर मला विचारा , माझ्या पोतडीत अंदाजे २५०० नेहमी वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांचे मराठी शब्द आहेत.
मराठी माणसा मराठी माणसाशी तरी मराठीची बोल , मराठीत लिही , मराठीला जगव ,
भविष्यात असे देखील घडू शकेल कि , , राज्य शासन एखाद्या अमराठी परदेशी संस्थेला भरपूर परकीय चलन मोजून
मराठीच्या संवर्धनाचे काम देतील ही .
त्याचप्रमाणे माझ्या सारख्या अमराठी माणसाकडे , मराठी माणूस भविष्यात त्यांच्या पुढच्या पिढीला शुद्ध मराठी ( इंग्रजी विरहित ) शिकवायला भरपूर पैसे देऊन पाठवतील देखील.
No comments:
Post a Comment