नमस्कार ,
" पेंच अभयारण्यातील कचरा "
गेलो काही दिवस, पेंच या अभयारण्यात मी टिपलेली पक्ष्यांची , प्राण्यांची , निसर्गाची काही छायाचित्रे फेसबुक या माध्यमाद्वारे दर्शवली होती.
या सोबत मी १५. ०१. २०१७ रोजी , " पेंच " अभयारण्यातील सकाळच्या अरण्य भ्रमणाच्या वेळी टिपलेले एक छायाचित्र जोडत आहे.
आपण म्हणाल कि या छायाचित्रांमध्ये ना पक्षी , ना प्राणी , ना सरपटणारा प्राणी , ना कोणते झाड,ना निसर्ग दृश्य यातील काहीच दिसत नाही ,
काही म्हणत असतील कि मी हे छायाचित्र चुकून टाकले असेल . पण तसं नाही , मी हे छायाचित्र मुद्दाम टाकले आहे . आपणाला या छायाचित्रांमध्ये हवाबंद खाद्यपदार्थाची एक रिकामी पिशवी दिसेल. हि पिशवी चक्क " पेंच " या अभयारण्यात पडली होती. त्याचप्रमाणे काही ठिकाणी पण मसाल्याच्या छोट्याश्या प्लास्टिक च्या पिशव्या देखील पाहायला मिळतात.
गवत , पाने , खाताना अश्या प्लास्टिक च्या पिशव्या अरण्यातील प्राण्यांच्या पोटात जातात . त्या मुले त्या प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो . त्याचप्रमाणे अश्या प्राण्यांना मारून खाताना , वाघाच्या पोटात देखील त्या पिशव्या जातात आणि वाघाचा मृत्यू देखील ओढवू शकतो.
ज्या मानव प्राण्यांनी अश्या पिशव्या टाकल्या त्यांना काय म्हणणार ?
तुम्हाला खोटे वाटेल, पण अरण्यातील सगळे प्राणी अगदी शिस्तीने राहतात . मानव प्राणीच असा बेशिस्त का वागतो याचे उत्तर भल्या भल्यांना अजूनही मिळालेले नाही.
माझा नागपूरचा सारंग पिंपरकर जो अनेक वेळा अरण्यभ्रमणासाठी जातो , तो असा हा अरण्यातील कचरा उचलतो , व अरण्याबाहेर आल्यावर ठेवलेल्या कचरा कुंडीत टाकतो , अथवा नागपूरला परतल्यावर कचरा कुंडीत टाकतो. हि पिशवी त्यानेच उचलली.
भारत या देशाचे दुर्दैव आहे , कि जेथे पंतप्रधानांना " स्वच्छ भारत " अभियान चालवावे लागते.
कळ कळीची विनंती आहे कि करण्याला तरी कचरा कुंडी करू नकात .
No comments:
Post a Comment