Wednesday, January 25, 2017

मुंबई सह उपनगरांवर कुत्र्यांची दहशत दैनिक जनशक्ति

नमस्कार , प्रसन्न सकाळ ,

" मुंबई सह उपनगरांवर कुत्र्यांची दहशत "

" दैनिक जनशक्ति " च्या गुरुवार , २६. ०१. २०१७ च्या अंकात आलेली हि माहितीपूर्ण बातमी .

या बातमीसाठी मी " दैनिक जनशक्ति " , तुलसीदास भोईटे , मनीषा मिठबावकर यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
या गहाण प्रश्नावर अजूनही जनजागृती होणे गरजेचे आहे.


लोकप्रभा - रेबीजचा वाढता धोका

नमस्कार , सुंदर सकाळ ,
" भटक्या कुत्र्यांच्या त्रासावर " मी गेली ५ ते ६ वर्षे गल्ली ते दिल्ली दारे ठोठावीत आहे. अनेक प्रकारच्या प्रसार माध्यमांना देखील वेळो वेळी या प्रश्नावरील माहिती , आकडेवारी आकडेवारी, छायाचित्रे , ध्वनिचित्रफित अश्या प्रकारे विविध माहीत पुरवीत आलो आहे , ज्या योगे या प्रश्नाचे गांभीर्य हे भारतीय जनतेसमोर पोहोचेल.

सुरवातीची काही वर्षे कोणत्याही प्रकारचे प्रसार माध्यम या प्रश्नावर काहीच करीत नव्हते, पण गेल्या ३ ते ४ वर्षांपासून वृत्तपत्रे , वृत्तवाहिन्या या प्रकारच्या प्रसार माध्यमांनी या प्रश्नावर अनेक वेळा आवाज उठविला आहे.

" लोकप्रभा " या साप्ताहिकाने देखील या समस्येला मुखपृष्ठावर जागा देऊन ( COVER STORY ) , या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

शुक्रवार , २७.०१. २०१७ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या ३ फेब्रुवारी ,२०१७ च्या " लोकप्रभा " च्या अंकाची आजच्या लोकसत्ता मध्ये आलेली हि जाहिरात .

आशा आहे , नजीकच्या भविष्यात भारत या देशातील नागरिकांना श्वान दंश विरहित आयुष्य जगायला मिळेल.


मोकाट कुत्र्यांमुळे होतोय त्रास - नागपूर

नमस्कार , प्रसन्न सकाळ ,
महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानी व माननीय मुख्यमंत्री यांचे गाव असलेल्या नागपूर या शहराची खरी परिस्थिती पहा .


भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे ही अभिनेत्री झाली गंभीर जखमी

आत्ताची ताजी खबर

"भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे ही अभिनेत्री झाली गंभीर जखमी"

तिला कुत्र्यांपासून वाचवण्यासाठी कोणीही आले नाही
लोकसत्ता ऑनलाइन | January 25, 2017 7:52 PM

अभिनेत्री पारुल यादव
कन्नड सिनेमांची अभिनेत्री पारुल यादव हिच्यावर भटक्या कुत्र्यांच्या एका झुंडीने हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, पारुल मुंबईमध्ये घराच्या जवळच आपल्या पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी इमारतीच्या बाहेर आली होती. तेव्हा तिच्या कुत्र्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला.
Singer Kailash Kher Chef Sanjeev Kapoor Virat Kohli Among 2017 Padma Award Full List Of Winners
आपल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी पारुलला या भटक्या कुत्र्यांचा सामना करावा लागला. तेव्हाच या कुत्र्यांच्या झुंडीने एकत्रित तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ती जखमीही झाली. कन्नड वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी सकाळी ५.३० वाजता जोगेश्वरी येथील तिच्या घराच्या जवळ ही घटना घडली.



तिच्यावर एकाचवेळी सहा कुत्र्यांनी एकत्र हल्ला केला. जेव्हा तिच्यावर हा हल्ला होत होता तेव्हा तिला वाचवण्यासाठी कोणीही आले नाही. तिच्या शेजाऱ्याने तिला वाचवण्याचे प्रयत्न केलेही, पण तोवर तिला कुत्र्यांनी जखमी केले होते. तिच्या डोक्यावर ३ इंच एवढी खोल जखम आहे. तिला कोकिलाबेन रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. इथे तिला अॅण्टी रेबीज इंजेक्शन देण्यात आले आहेत. पारुलवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरु असून डोक्यावरच्या जखमेसाठी तिच्यावर शस्त्रक्रियाही केली जाऊ शकते.


मॉडेल ते अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या पारुलने कन्नड सिनेमात आपले नाव कमवले आहे. कन्नडशिवाय पारुलने मल्याळम आणि तामिळ सिनेमातही काम केले आहे. गेल्या वर्षी पारुल, राम गोपाल वर्मा याच्या ‘वीरपन्न’ या सिनेमात दिसली होती.

बातमी वाचण्यासाठी येथे जाऊ शकता :
http://www.loksatta.com/manoranjan-news/kannada-actor-parul-yadav-attacked-by-stray-dogs-going-under-treatment-1391891/

Monday, January 23, 2017

नगरसेवक कसा नसावा , कसा असावा - दैनिक पुढारी

नमस्कार , सुंदर दुपार ,

" नगरसेवक कसा नसावा , कसा असावा "

दैनिक पुढारी - ता. २३ जानेवारी , २०१७

"दैनिक पुढारी" व "अनुपमा गुंडे" यांचे माझ्या भावनांना वाट करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद .

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Thursday, January 19, 2017

पेंच अभयारण्यातील कचरा

नमस्कार , 

" पेंच अभयारण्यातील कचरा " 

गेलो काही दिवस,  पेंच या अभयारण्यात मी टिपलेली पक्ष्यांची , प्राण्यांची , निसर्गाची  काही छायाचित्रे फेसबुक या माध्यमाद्वारे दर्शवली होती. 

या सोबत मी १५. ०१. २०१७ रोजी , " पेंच " अभयारण्यातील सकाळच्या अरण्य भ्रमणाच्या वेळी टिपलेले एक छायाचित्र जोडत आहे. 

आपण म्हणाल कि या छायाचित्रांमध्ये ना पक्षी , ना प्राणी , ना सरपटणारा प्राणी , ना कोणते झाड,ना निसर्ग दृश्य यातील काहीच दिसत नाही , 

काही म्हणत असतील कि  मी हे छायाचित्र चुकून टाकले असेल . पण तसं नाही , मी हे छायाचित्र मुद्दाम टाकले आहे . आपणाला या छायाचित्रांमध्ये हवाबंद खाद्यपदार्थाची एक रिकामी पिशवी दिसेल. हि पिशवी चक्क " पेंच " या अभयारण्यात पडली होती. त्याचप्रमाणे काही ठिकाणी पण मसाल्याच्या छोट्याश्या प्लास्टिक च्या पिशव्या देखील पाहायला मिळतात. 

गवत , पाने , खाताना अश्या प्लास्टिक च्या पिशव्या अरण्यातील प्राण्यांच्या पोटात जातात . त्या मुले त्या प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो . त्याचप्रमाणे अश्या प्राण्यांना मारून खाताना , वाघाच्या पोटात देखील  त्या पिशव्या जातात आणि वाघाचा मृत्यू देखील ओढवू शकतो. 

ज्या मानव प्राण्यांनी अश्या पिशव्या टाकल्या त्यांना काय म्हणणार ? 

तुम्हाला खोटे वाटेल, पण अरण्यातील सगळे प्राणी अगदी शिस्तीने राहतात . मानव प्राणीच असा बेशिस्त का वागतो याचे उत्तर भल्या भल्यांना अजूनही मिळालेले नाही. 

माझा नागपूरचा सारंग पिंपरकर जो अनेक वेळा अरण्यभ्रमणासाठी जातो , तो असा हा अरण्यातील कचरा उचलतो , व अरण्याबाहेर आल्यावर ठेवलेल्या कचरा कुंडीत टाकतो , अथवा नागपूरला परतल्यावर कचरा कुंडीत टाकतो. हि पिशवी त्यानेच उचलली. 

भारत या देशाचे दुर्दैव आहे , कि जेथे पंतप्रधानांना " स्वच्छ भारत " अभियान  चालवावे लागते. 

 कळ कळीची विनंती आहे कि करण्याला तरी कचरा कुंडी करू नकात . 


कुत्रा चावल्याने राष्ट्रपतीच्या मुलाचा मृत्यू - SON OF PRESIDENT KILLED BECAUSE OF DOG BITE

नमस्कार , प्रसन्न सकाळ ,

आपणा सर्वांचा दिवस / रात्र श्वानदंश विरहित जाओ हीच भारत प्रशासनास नम्र विनंती

कुत्रा चावल्याने राष्ट्रपतीच्या मुलाचा मृत्यू

First Published :18-January-2017 : 20:27:07
दैनिक लोकमत
ऑनलाइन लोकमत
बांजुल, दि. 17 -पश्‍चिम आफ्रिका भागातील गांबियाचे देशाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती आडमा बॅरो यांच्या मुलाचा कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नवनिर्वाचित राष्ट्रपती आडमा बॅरो यांचा आठ वर्षीय मुलगा हबीबू याचा एका कुत्र्याने चावा घेतला. यानंतर त्याला रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सुरक्षतेच्या मुद्दावरुन आडमा बॅरो हे सेनेगल येथे वास्तव्यास आहे. उद्या त्याचा राष्ट्रपदी पदासाठी शपथविधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आडमा बॅरो आपल्या मुलाच्या अंतिम विधीच्या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाहीत.
राष्ट्रपती पदाची निवडणूक गेल्यावर्षीच आडमा बॅरो यांनी जिंकली होती. मात्र, येथील याहया जामेह यांनी पदावरुन पायउतार होण्यास नकार दिला होता. त्यानंतर राष्ट्रपती पदावरुन हटविण्यासाठी लष्कराचा हस्तक्षेप करण्यात येणार होता. यासंदर्भात याहया जामेह यांनी सुप्रीम कोर्टाकडे दाद मागितली, परंतु कोर्टाने ती फेटाळून लावल्याने आडमा बॅरो यांचा शपथविधीचा मार्ग मोकळा झाला.

Wednesday, January 18, 2017

" हाताबाहेर जात असलेला भटक्या कुत्र्यांचा दहशतवाद " - STRAY DO MENACE IN INDIA

नमस्कार , सुंदर संध्याकाळ ,

" हाताबाहेर जात असलेला भटक्या कुत्र्यांचा दहशतवाद  " 

दिनांक ०५. ०१. २०१७ रोजी , पहाटे अंदाजे ४.०० वाजता ,  विमानतळावर पोहचण्यासाठी ,  मी राहत असलेल्या ठाणे येथील हाईड पार्क या  रहिवासी संकुलाच्या बाहेर , टॅक्सी ची वाट पाहत होतो . माझं सगळं लक्ष्य रस्त्यावर होते , कारण टॅक्सी अजूनही आलेली नव्हती. 

नेहमी प्रमाणे रस्त्यावर दिवे नव्हतेच .  रामसे बंधू यांच्या कोणत्याही चित्रपटात शोभेल असे भयावह वातावरण होते. आजूबाजूला भुंकणाऱ्या कुत्र्यांचा भरपूर आवाज येत होता . दिवसातील २४ तास , कोठे ना कोठे भटक्या कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येतच  असतो त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष्य करीत होतो. पण हळू हळू हा भुंकण्याचा आवाज माझ्या कडे सरकत होता . मी त्या आवाजाकडे पहिले तर , मला अक्षरशः थंडीत घाम फुटला . ८ ते १० भटके कुत्रे माझ्यावर , रिंगण बनवून हल्ला करण्यासाठी पुढे  पुढे सरकत होते ( जसे चित्रपटात पोलीस डाकू ला घेरून पुढे सरकतात अगदी त्याच प्रमाणे ) .मी न धावता , सावकाश पणे आमच्या रहिवासी संकुलाच्या आत आलो . आमच्या पहारेकरी असलेल्या व्यक्तीला बोलावले . त्यांच्या हातात भक्कम काठी असतेच . त्यांना घेऊन पुन्हा टॅक्सी ची वाट पाहण्यासाठी रस्त्यावर आलो . टॅक्सी येई पर्यंत त्यांना थांबण्यास सांगितले . काही वेळातच टॅक्सी आली आणि मी श्वानदंशाशिवाय माझ्या व्यावसायिक कामासाठी विमानतळावर पोहचलो. 

या सोबत दिलेले छायाचित्र मीच टिपले आहे , पण ते १६. ०१. २०१७ रोजी , रात्री अंदाजे ११.३०  वाजता मी राहत असलेल्या हाईड पार्क या  रहिवासी संकुलात शिरताना टिपले आहे. 

सध्या बहुसंख्य भारतीय या भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरत आहेत 

असो माझी लढ़ाई सुरु आहेच . 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet 





Wednesday, January 11, 2017

STRAY DOG MENACE " नवी मुंबई येथे दरमहा ८०० मानव प्राण्यांना होतो श्वान दंश "

नमस्कार , सुंदर संध्याकाळ ,


" नवी मुंबई येथे दरमहा ८०० मानव प्राण्यांना होतो श्वान दंश "


हे मी नाही म्हणत . अशी बातमी ११.०१.२०१७ च्या " लोकसत्ता " या वृत्तपत्रात छापून आली आहे .


काय ? तुम्हाला , तुमच्या मुलांना , तुमच्या आई , वडिलांना , तुमच्या आप्तेष्टांना अजूनही श्वान दंश झाला नाही ?



जर हे असेच चालू राहिले तर , तो दिवस दुर नाही कि भारत या देशातील प्रत्येक मानव प्राण्याला श्वान दंश झाला असेल , अगदी प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी यांना देखील.


Monday, January 9, 2017

" पिसाळलेल्या कुत्र्याचा १५ लोकांना चावा " , " वर्षभरात ४९०० जणांना श्वानदंश "

नमस्कार , 

" पिसाळलेल्या कुत्र्याचा १५ लोकांना चावा " ,  " वर्षभरात  ४९०० जणांना श्वानदंश " 

मानव प्राणी केंव्हा " श्वान दंश " मुक्त होणार आहे हे बहुतेक देवाला देखील माहित नसेल. 

या व अश्या प्रकारच्या अनेक घटना दररोज वाचायला , ऐकायला , पाहायला मिळतात , 

- ठाणे म न पा हद्दीत दररोज अंदाजे ६० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो. 
- महाराष्ट्र राज्यात दररोज अंदाजे ७,७७० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो. 
- भारत नावाच्या देशात दररोज अंदाजे १, ४१, ९६०  मानव प्राण्यांना श्वान दंश होतो. 

गेली ५ ते ६ वर्षे , माझा या प्रश्नांवर लढा , स्वतःचा पोटा पाण्यासाठीचा व्यवसाय सांभाळून  सुरु आहे. 

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !




Saturday, January 7, 2017

" मराठी भाषेचे संवर्धन गरजेचे ! "

" मराठी भाषेचे संवर्धन गरजेचे ! "

रविवार , ८ जानेवारी, २०१७ च्या " ठाणे वैभव " या वृत्तपत्रातील हि बातमी येथे देत आहे.
मी एक अमराठी ( जातीने ) असून देखील , गेली अनेक महिने , मी मराठी तील इंग्रजीच्या अतिक्रमणाविरुद्ध लढत आहे.
मी याद्वारे , प्रत्येक मराठी माणसाला एक विनंती करीत आहे.

प्रति ,
प्रत्येक मराठी माणूस ,
नमस्कार , आणि सुंदर दुपार ,
माझ्या मनातील खंत मी येथे मांडत ( ओकत ) आहे .
महाराष्ट्र राज्य शासन , " १ ते १५ जानेवारी , २०१७ या दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा " साजरा करणार आहे .
लक्ष्यात घ्या कि मराठी मातित मराठी भाषेचे संवर्धन करावी लागते , यात च सगळं सामावलं आहे. तामिळनाडू मध्ये कधीही तामिळ भाषेचे , गुजरात मध्ये कधीही गुजराथी भाषेचे , जर्मनी मध्ये जर्मन भाषेचे , चीन मध्ये चिनी भाषेचे , ........ कधीही संवर्धन आठवडा , पंधरवडा , महिना वगैरे साजरा करून भाषेचे पुनर्रुजीवन केलेले कधी ऐकिवात नाही .
मग मराठी भाषेलाच ते सुद्धा मराठीच्या मायभूमीत असे करण्याची का निकड भासते याचा कधी तरी मराठी माणसाने विचार केला आहे ?
याचे कारण एकदम सोप्प आहे ( हेच वाक्य मराठी माणूस कसे बोलेल ते पहा " याचे REASON एकदम SIMPLE आहे " ) . माझे हेच म्हणणे आहे की , दोन / अनेक मराठी व्यक्ती अव्यावसायिक कामासाठी एकत्र जमतात , तेंव्हा देखील ते संभाषणात शक्य तितके शुद्ध मराठी शब्द, वाक्ये का नाही वापरत ? दुसरा हसेल म्हणून ? याचा अर्थ अश्या व्यक्तींना स्वतःच्या आई ची देखील लाज वाटते ? अहो मराठी हि आपली मातृ भाषा आहे. या भाषेत बोलताना इंग्रजी शब्द , इंग्रजी वाक्ये याचा का हो भरमसाठ वापर करायचा करायचा ?
आजकाल , आकाशवाणी वरील मराठी कार्यक्रम , दूरदर्शनवरील मराठी कार्यक्रम , मराठी मालिका , मराठी बातम्या , मराठी जाहिराती , या व इतर अनेक ठिकाणी इंग्रजीचे भयावह असे अतिक्रमण झाले आहे. जसा संगणकात जंतू ( VIRUS ) शिरतो , अथवा शरीरात कर्करोगाचा जंतू ( CANCER ) शिरतो , व सगळ्याचा नायनाट करतो , तसे काही मराठी भाषेच्या बाबतीत झाले आहे.
अहो काही दिवसांपूर्वी , सकाळी आकाशवाणी वरील एका मराठी कार्यक्रमात एका वाक्यात ROMANTIC हा एक इंग्रजी शब्द त्याच प्रमाणे ENJOY हा एक इंग्रजी शब्द ऐकला आणि मला राहवलं नाही म्हणून हे लिहिण्याचा सगळा प्रपंच.
१. ) ROMANTIC = शृंगारिक , ( तुम्हाला काय वाटतं कि शृंगार हा ROMANTIC नसतो ? )
२. ) गाणे ENJOY करा = गाण्याचा आस्वाद लुटा ( तुम्हाला काय वाटतं कि गाण्याचा आवड घेतल्यावर ENJOY करता येत नाही ? )
अहो तुम्हाला जर झुणका भाकर खायची आहे आणि झुणका BREAD , दिल तर कसं वाटेल ?
अहो कधी तरी तुम्ही दोन व्यक्तींना इंग्रजी बोलताना १. ) COME ON WE WILL GO FOR नाश्ता / जेवण २. ) I WILL DROP YOU घरी ........ वगैरे असे ऐकले आहे ? नाही ना ? पण दोन मराठी व्यक्ती " अरे चल LUNCH ला जाऊया असे हमखास म्हणतात. मग मराठी माणसालाच , मराठी माणसात , १०० % मराठी बोलण्याची लाज का वाटते ? मराठीत शब्द नाहीत का ? अहो मराठी सारखी प्रघल्भ व गोड भाषा नाही . का हो मराठी माणसाला , मराठी बोलताना इंग्रजी शब्द , इंग्रजी वाक्ये याच्या सदा न कदा कुबड्या घ्याव्या लागतात ?


दुसरे उदाहरण जरा HAIRCUT करून येतो असे मराठी माणूस म्हणतो . त्या ऐवजी केस कापून असे का नाही म्हनत ?
अजून एक भन्नाट वाक्य अरे मी " टाईमावर " आलो होतो. " टाईमावर " हा शब्द कोणत्या शब्दकोशात आहे ?

असो, श्रि. अमिताभ बच्चन अथवा श्रि. अनुपम खेर हे हिंदी बोलताना शुध्द हिंदीतच बोलतात . इंग्रजीच्या कुबड्या घेत नाहित.

आज काल अतिक्रमण हा शब्द सगळ्यांच्याच परिचयाचा आहे व आपण आजूबाजूला अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेले उघड्या डोळ्याने, हताश होऊन पाहतो. पण आपल्या मातृभाषेवर होत असलेले अतिक्रमण मात्र शांतपणे सहन करतो व आपण त्या अतिक्रमणात आनंदाने सहभागी देखील होतो.
माझ्या सारखा एखादा अति सामान्य नागरिक या अतिक्रमणाविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा बाकीचे अरे हे असे होणारच म्हणून त्या अतिक्रमणास जणू मूक संमतीच देतात. काय म्हणालात जरा समजावून सांगू ? हे अतिक्रमण आहे इंग्रजी भाषेचे जे आपल्या ( मराठी माणसाच्या ) मातृभाषेवर ( आजच्या मराठी भाषेतील MOTHER TONGUE वर ) होत आहे , नव्हे वाढतच आहे.
उदाहरणार्थ - हि अनेक मराठी व्यक्तींची नेहमीची काही वाक्ये १. ) PAPER ( वर्तमानपत्र ) आला / आले का ? २. ) FAN ( पंखा ) लाव . ३. ) LIGHT ( दिवा ) बंद कर . ४. ) BREAKFAST ( नाश्ता ) करून येतो . ५. ) SORRY ( माफ कर ) LATE ( उशीर ) झाला .


यावर उपाय म्हणून मी नेहमी वापरले जाणारे इंग्रजी शब्द व त्यांना सोप्पे पर्यायी मराठी शब्द असा शब्द कोश बनवणे चालू केला आहे. आश्चर्य म्हणजे गेल्या १२ महिन्यात अंदाजे २५०० शब्द लिहून झाले आहेत. पोटा पाण्याचा व्यवसाय सांभाळून हे सगळ करीत असतो .
माझे असे म्हणणे आहे कि प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी पर्यायी शब्द मिळू शकणार नाही . उदाहरणार्थ - LAPTOP , FACEBOOK , WHATSAPP वगैरे .
माझे विचार वाचून चीड आली असेल तर मला माफ करा. पण मातृभाषेची हि दयनीय अवस्था पाहवत नाही .

एक शेवटचे , हे सगळं मी एक अमराठी माणूस असून देखील हि हि मला वाईट वाटते .
इंग्रजी शब्दांना समानार्थी शब्द हवे असतील तर मला विचारा , माझ्या पोतडीत अंदाजे २५०० नेहमी वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांचे मराठी शब्द आहेत.
मराठी माणसा मराठी माणसाशी तरी मराठीची बोल , मराठीत लिही , मराठीला जगव ,

भविष्यात असे देखील घडू शकेल कि , , राज्य शासन एखाद्या अमराठी परदेशी संस्थेला भरपूर परकीय चलन मोजून
मराठीच्या संवर्धनाचे काम देतील ही .

त्याचप्रमाणे माझ्या सारख्या अमराठी माणसाकडे , मराठी माणूस भविष्यात त्यांच्या पुढच्या पिढीला शुद्ध मराठी ( इंग्रजी विरहित ) शिकवायला भरपूर पैसे देऊन पाठवतील देखील.


या सोबत , माझा ( मी स्वतः लिहिलेला ( कोणाच्या लिखाणाची चोरी न करता ) " मराठीचे इंग्रजीकरण " हा लेख ४ मार्च, २०१६ च्या " लोकप्रभा " च्या अंकात छापून आला आहे तो जोडत आहे. 
 
 

 

" वाहतूक पोलिसांचे " लाच " कार्ड

" वाहतूक पोलिसांचे " लाच " कार्ड

७ जानेवारी , २०१७ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या वृत्तपत्रातील हि धक्कादायक बातमी वाचली . यातील बऱ्याच गोष्टी ऐकून होतो .

पैसे घेणाऱ्या पोलिसांची मी छायाचित्रे देखील टिपली होती , पण त्या पोलिसांची नोकरी जाईल म्हणून ती , छायाचित्रे तत्कालीन वाहतूक पोलीस आयुक्त यांच्या ताब्यात दिली नव्हती.

पण आत्ता एक पोलीस कर्मचारीच , या विरुद्ध न्यायालयीन लढाई लढत आहे , याचाच अर्थ हि एक खोलवर रुजलेली अप प्रवृत्ती आहे.

वाहतूक पोलिसांवर नागरिकांकडून अनेकदा हल्ले होतात , त्याचे एक महत्वाचे कारण हे देखील असू शकेल अशी दाट शक्यता वाटते.

गम्मत म्हणजे अनेक पोलीस , वाहतूक पोलीस , वाहतुकीचे अनेक नियम न पाळताना जागो जागी दिसतात . त्यांच्यावर कार्यवाही का होत नाही ?

कायद्याच्या रक्षकांनी हे असे करणे कितपत योग्य आहे ?


Monday, January 2, 2017

मराठी भाषा संवर्धन ऐवजी स्मृती पंधरवडा होतोय


प्रति ,
प्रत्येक मराठी माणूस ,

नमस्कार , आणि सुंदर दुपार ,

माझ्या मनातील खंत मी येथे मांडत ( ओकत ) आहे .

महाराष्ट्र राज्य शासन , " १ ते १५ जानेवारी , २०१७ या दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा " साजरा करणार आहे .

कृपया खाली दिलेल्या दोन बातम्या वाचा .
________________________________________________
बातमी क्रमांक . १
मुंबई, १७ डिसेंबर (हिं.स.) : मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व संवर्धनासाठी तसेच अमराठी भाषिकांना मराठी भाषेचा परिचय व्हावा, यासाठी १ ते १५ जानेवारी २०१७ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मराठी भाषा विभागामार्फत साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये राज्यातील सर्व शासकीय, निम-शासकीय कार्यालय, महामंडळे तसेच राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील सर्व कार्यालये, मंडळे सार्वजनिक उपक्रम सर्व खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये आदी सर्व संस्थांमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.
या पंधरवड्यात विविध परिसंवाद, व्याख्याने, विविध स्पर्धा, कार्यशाळा, शिबीरे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, काव्य वाचन आणि कथाकथन स्पर्धा, अमराठी भाषिकांसाठी मराठी भाषेचा सुलभ पद्धतीने परिचय करुन देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन आदी कार्यक्रम होणार आहेत.
बातमीचा स्रोत ( SOURCE ) ( SOURCE ) : ( http://m.dailyhunt.in/news/india/marathi/hindusthan+samachar+marathi-epaper-hsmara/marathi+bhasha+sanvardhan+pandharavada+1+te+15+janevari+daramyan+sajara+honar-newsid-61523100 )

बातमी क्रमांक . २
मुंबई/ठाणे/रायगड
मराठी भाषा संवर्धन ऐवजी स्मृती पंधरवडा होतोय
By pudhari | Publish Date: Dec 28 2016 1:00AM | Updated Date: Dec 28 2016 1:00AM
मुंबई : प्रतिनिधी
वर्षाची सुरवात मराठी भाषा संवर्धनाच्या पंधरवड्यातून करुन वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे असे असताना मात्र राज्यात पहिल्या पंधरा दिवसात कार्यक्रम केले जात आहेत. त्यामुळे मराठी भाषेचा स्मृती पंधरवडा म्हणून राज्यभर साजरा केला जात आहे अशी टिका मराठी अभ्यास केंद्राने केली आहे.
2008 साली मुंबई विद्यापीठाकडे पाठपुरावा करून मराठी अभ्यास केंद्राने सर्व महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठाच्या सर्व विभागांमध्ये मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळ अनिवार्य करण्यासंबंधातले परिपत्रक काढून घेतले. त्याचा पुढचा टप्पा म्हणून विद्यापीठाने 2013 साली मराठी अभ्यास केंद्राने तयार केलेली मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळांच्या उपक्रमांची वर्षभराच्या उपक्रमाची यादी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे जारी करण्यात आली. 50हून अधिक असलेले हे उपक्रम वर्षभर राबवायचे आहेत. पण भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने त्यातले काही उपक्रम अग्रक्रमाने करता येणे शक्य आहे. तरीही काही मोजके कार्यक्रम पंधरवड्यात उरकले जात आहेत.
भाजप सेनेचे युती सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 1 जानेवारी ते 15 जानेवारी केला जात आहे. राज्य शासनाच्या वतीने सर्व विद्यापीठांना पत्रे पाठवली जातात. विद्यापीठांकडून याबाबत महाविद्यालयांनाही सूचना दिली जाते. नववर्षाच्या पहिल्या 15 दिवसात व्याख्याने वगैरे आयोजित करून पंधरवडा साजरा केला जातो. त्यामुळे मराठी भाषा स्मृती पंधरवड्याचे रूप आले आहे. हा जुलमाचा रामराम नको असेल तर शासनाला नेहमीच्या सोहळे करण्याच्या मानसिकतेतून बाहेर यायला हवे असेही मराठी अभ्यास केंद्राने म्हटले आहे.
केवळ पंधरवड्यात विविध परिसंवाद, व्याख्याने, विविध स्पर्धा, कार्यशाळा, शिबीरे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, काव्य वाचन आणि कथाकथन स्पर्धा, अमराठी भाषिकांसाठी मराठी भाषेचा सुलभ पद्धतीने परिचय करुन देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन आदी कार्यक्रम करण्याबरोबर वर्षभर विविध कार्यक्रम राबवावेत अशी मागणी मराठी अभ्यास केंद्राने केली आहे.विद्यापीठाने तयार केलेल्या विविध कार्यक्रमाची यादी सरकारने घेवून त्यांची वर्षभर अंमलबजावणी करावी अशी मागणीही मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी केली आहे.

बातमीचा स्रोत ( SOURCE ) : ( http://www.pudhari.com/news/mumbai/115733.html )
________________________________________________

लक्ष्यात घ्या कि मराठी मातित मराठी भाषेचे संवर्धन करावी लागते , यात च सगळं सामावलं आहे. तामिळनाडू मध्ये कधीही तामिळ भाषेचे , गुजरात मध्ये कधीही गुजराथी भाषेचे , जर्मनी मध्ये जर्मन भाषेचे , चीन मध्ये चिनी भाषेचे , ........ कधीही संवर्धन आठवडा , पंधरवडा , महिना वगैरे साजरा करून भाषेचे पुनर्रुजीवन केलेले कधी ऐकिवात नाही .

मग मराठी भाषेलाच ते सुद्धा मराठीच्या मायभूमीत असे करण्याची का निकड भासते याचा कधी तरी मराठी माणसाने विचार केला आहे ?
याचे कारण एकदम सोप्प आहे ( हेच वाक्य मराठी माणूस कसे बोलेल ते पहा " याचे REASON एकदम SIMPLE आहे " ) . माझे हेच म्हणणे आहे की , दोन / अनेक मराठी व्यक्ती अव्यावसायिक कामासाठी एकत्र जमतात , तेंव्हा देखील ते संभाषणात शक्य तितके शुद्ध मराठी शब्द, वाक्ये का नाही वापरत ? दुसरा हसेल म्हणून ? याचा अर्थ अश्या व्यक्तींना स्वतःच्या आई ची देखील लाज वाटते ? अहो मराठी हि आपली मातृ भाषा आहे. या भाषेत बोलताना इंग्रजी शब्द , इंग्रजी वाक्ये याचा का हो भरमसाठ वापर करायचा करायचा ?

आजकाल , आकाशवाणी वरील मराठी कार्यक्रम , दूरदर्शनवरील मराठी कार्यक्रम , मराठी मालिका , मराठी बातम्या , मराठी जाहिराती , या व इतर अनेक ठिकाणी इंग्रजीचे भयावह असे अतिक्रमण झाले आहे. जसा संगणकात जंतू ( VIRUS ) शिरतो , अथवा शरीरात कर्करोगाचा जंतू ( CANCER ) शिरतो , व सगळ्याचा नायनाट करतो , तसे काही मराठी भाषेच्या बाबतीत झाले आहे.

अहो आज सकाळी आकाशवाणी वरील एका मराठी कार्यक्रमात एका वाक्यात ROMANTIC हा एक इंग्रजी शब्द त्याच प्रमाणे ENJOY हा एक इंग्रजी शब्द ऐकला आणि मला राहवलं नाही म्हणून हे लिहिण्याचा सगळा प्रपंच.

१. ) ROMANTIC = शृंगारिक , ( तुम्हाला काय वाटतं कि शृंगार हा ROMANTIC नसतो ? )
२. ) गाणे ENJOY करा = गाण्याचा आस्वाद लुटा ( तुम्हाला काय वाटतं कि गाण्याचा आवड घेतल्यावर ENJOY करता येत नाही ? )

अहो तुम्हाला जर झुणका भाकर खायची आहे आणि झुणका BREAD , दिल तर कसं वाटेल ?

अहो कधी तरी तुम्ही दोन व्यक्तींना इंग्रजी बोलताना १. ) COME ON WE WILL GO FOR नाश्ता / जेवण २. ) I WILL DROP YOU घरी ........ वगैरे असे ऐकले आहे ? नाही ना ? मग मराठी माणसालाच , मराठी माणसात , १०० % मराठी बोलण्याची लाज का वाटते ? का मराठीत शब्द नाहीत ? अहो मराठी सारखी प्रघल्भ व गोड भाषा नाही . का हो मराठी माणसाला , मराठी बोलताना इंग्रजी शब्द , इंग्रजी वाक्ये याच्या सदा न कदा कुबड्या घ्याव्या लागतात ?

एक शेवटचे , हे सगळं मी एक अमराठी माणूस असून देखील हि हि मला वाईट वाटते .

इंग्रजी शब्दांना समानार्थी शब्द हवे असतील तर मला विचारा , माझ्या पोतडीत अंदाजे २५०० नेहमी वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांचे मराठी शब्द आहेत.

मराठीची बोला , मराठीत लिहा , मराठीला जगवा ,