Friday, October 28, 2016

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातील पीडितेला नुकसान भरपाई द्या ! उच्च न्यायालयाचे आदेश

नमस्कार ,

" भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातील पीडितेला नुकसान भरपाई द्या ! उच्च न्यायालयाचे आदेश " - नवा काळ
" कुत्र्याने बळी घेतलेल्या मुलाच्या कुटुंबाला भरपाई " - पुढारी
" श्वान दंशाबाबत भरपाईची सूचना " - महाराष्ट्र टाईम्स

या अश्या मथळ्याच्या बातम्या शुक्रवार , २८. १०. २०१६ च्या वृत्तपत्रांमध्ये झळकल्या आहेत.त्या बातम्या येथे देत आहे.

याच आशयाची विनंती मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना १२. ०४. २०१५ रोजी केली होती . श्वान दंश ग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याबद्दल मी केलेल्या मागणीची बातमी २६. ०४. २०१५ च्या " पुढारी " या वर्तमान पत्रात व २७. ०४. २०१५ च्या नागपूर " दैनिक भास्कर " या हिंदी वृत्त पत्रात देखील छापून आले होते. किती गम्मत आहे ना , अवैध दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसदारांना शासन भरपाई देते , पण श्वान दंश ग्रस्तांना मात्र वाऱ्यावर सोडते.

दुखः एवढेच आहे कि एवढे मानवी प्राण्यांचे बळी जाऊन देखील " भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बंध अश्या वाढणाऱ्या संख्येवर " व त्यामुळे वाढत जाणाऱ्या श्वान दंशाच्या घटनांवर
शासन दरबारी काहीच हालचाल सुरु नाही.

भारत कोठे चालला आहे ?

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet





No comments:

Post a Comment