Wednesday, October 19, 2016

कोपरी पूल रुंदीकरणासाठी मुख्यमंत्र्यांची २९५ कोटी रुपयांची मंजुरी.......


नमस्कार , आणि सुंदर संध्याकाळ ,

आमदार संजय केळकर यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश ...

ठाणेकर नागरिकांतर्फे आमदार श्री संजय केळकर व मा. मुख्यमंत्री यांचे त्रिवार अभिनंदन

कोपरी पूल रुंदीकरणासाठी मुख्यमंत्र्यांची २९५ कोटी रुपयांची मंजुरी.......

सन २००३ रोजी कोपरी , ठाणे पूर्व येथील पुलाच्या रुंदीकरणासाठी मंजुरी मिळून देखील २०१३ पर्यंत काहीच हालचाल झाली नव्हती. रेल्वे व P W D , एकमेकांकडे फक्त ढकलत होते.

श्री.निलेश आंबेकर - एक जागरूक ठाणेकर यांना या बद्दल माहितीच्या अधिकाराखाली हि माहिती मिळाल्यावर ती गोष्ट श्री. संजय केळकर यांना सांगितल्यावर , श्री. संजय केळकर यांनी , या प्रश्नात स्वतः लक्ष्य घालून P W D व रेल्वे च्या अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या व त्या दोन खात्यांमध्ये सु संवाद घडवून आणून , हा प्रकल्प पुढे सरकविला.

तोपर्यंत याचा खर्च वाढला होता , त्यामुळे हे रुंदीकरण पुन्हा अडकले होते.

भाजपा नेते आमदार संजय केळकर यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरी पुलाच्या रुंदीकरणाला मंजुरी दिली आहे. अनेक वर्षांपासून आमदार संजय केळकर हे या विषयाचा पाठपुरावा करत होते. जागरूक ठाणेकर नागरिक सत्यजित शहा, निलेश आंबेकर यांचा हि यात सहभाग होता. अगोदर या पुलासाठी ११३ कोटी मंजूर करण्यात आले होते. आता पुलाच्या रुंदीकरणाकरिता २९५ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. एम एम आर डी ए चे अधिकारी श्री. मदान यांच्याशी आ. केळकर यांनी चर्चा केली असता लवकरच या पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरु करणार असल्याची माहिती आ. केळकर यांना दिली.

पी डब्लू डी कडे बजेट नसल्याने हे काम एम एम आर डी कडे सोपवण्यात आले होते अशी माहिती आ. संजय केळकर यांनी यावेळी बोलताना दिली. यापूर्वी अनेक वेळा या विषयातील संबंधित अधिकारी, रेल्वे अधिकारी यांच्या बरोबर एकत्रित या पुलाचा पाहणी दौरा आ. केळकर यांनी केला होता तसेच बैठकाही केल्या होत्या. या पुलाच्या बॉटल नेक मुळे वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक, प्रवासी त्रस्त होते. हि वाहतूक कोंडी होऊ नये या करिता आ. केळकर हे पुलाच्या रुंदीकरणाकरिता पाठपुरावा करीत होते.

या पुलाच्या रुंदीकरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिल्यामुळे येथील वाहतूक कोंडी सुटणार असून लाखो प्रवाश्याना यामुळे दिलासा मिळणार आहे, फायदा होणार आहे.

आमदार श्री संजय केळकर यांचे व मा. मुख्यमंत्री यांना आम्ही ठाणेकर मनापासून धन्यवाद देतो.

गम्मत म्हणजे अनेक राजकीय पक्षाचे नेते मोठ्ठे मोठ् फलक ( HOARDINGS ) ठाण्यात जागो जागी लावून या सगळ्याचे श्रेय स्वतःकडे घेतील , पण या मागे आमदार श्री. संजय केळकर यांचे अथक प्रयत्न आहेत हे सगळ्यांना कळावं म्हणून या सोबत काही कागदपत्रे , छायाचित्रे जोडत आहे.






No comments:

Post a Comment